केसांना खूप जपणाऱ्या हिना खानला अखेर करावं लागलं टक्कल; नेटकरी म्हणाले ‘खूप हिंमत..’

टेलिव्हिजनवरील लोकप्रिय आणि आघाडीची अभिनेत्री हिना खान सध्या तिच्या आयुष्यातील सर्वांत कठीण काळाचा सामना करतेय. हिनाला तिसऱ्या स्टेजच्या ब्रेस्ट कॅन्सरचं निदान झालं आहे. किमोथेरेपी सुरू असताना हिनाने टक्कल केलं आहे.

केसांना खूप जपणाऱ्या हिना खानला अखेर करावं लागलं टक्कल; नेटकरी म्हणाले 'खूप हिंमत..'
Hina KhanImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Jul 31, 2024 | 9:15 AM

‘ये रिश्ता क्या कहलाता है’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री हिना खान स्तनाच्या कर्करोगाशी झुंज देत आहे. कर्करोग निदान झाल्यापासून त्यावर विविध उपचार घेण्यापर्यंतची प्रत्येक अपडेट ती सोशल मीडियाद्वारे चाहत्यांसोबत शेअर करतेय. त्याचप्रमाणे या कठीण परिस्थितीला ती कशी सामोरं जातेय, हे दाखवत इतरांनाही प्रेरणा देतेय. हिनाला तिसऱ्या स्टेजच्या ब्रेस्ट कॅन्सरचं निदान झालं आहे. मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू आहेत. आरोग्याशी संबंधित अनेक आव्हानं झेलत ती खंबीरपणे उपचारांना सामोरी जातेय. ज्या परिस्थितीत अनेकजण खचून जातात किंवा आशा गमावून बसतात, अशा स्थितीत हिना अत्यंत सकारात्मकपणे सर्व काही सहन करताना दिसतेय. कॅन्सरवरील उपचार सुरू असताना हिनाने तिचे केस कापले होते. आता किमोथेरेपी सुरू असताना तिने पूर्णपणे टक्कल केलंय.

हिनाने नुकताच तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. यामध्ये तिच्या डोक्यावर टोपी दिसत आहे. तिने तिच्या डोक्यावरील सर्व केस कापले असून टक्कल केलं आहे. अशा स्थितीतही ती चेहऱ्यावर हास्य ठेवून एका स्किनकेअर ब्रँडचं प्रमोशन करताना दिसतेय. हिनाच्या या व्हिडीओवर टीव्ही इंडस्ट्रीतील विविध सेलिब्रिटी आणि चाहत्यांकडून लाइक्स, कमेंट्सचा वर्षाव होतोय. अभिनेता नकुल मेहताने तिला ‘चॅम्पियन’ असं म्हटलंय. तर दुसऱ्या युजरने ‘सिंहीण’ असं लिहिलं आहे.

हे सुद्धा वाचा

हिना सध्या कर्करोगावरील उपचार घेत आहे. सर्जरीनंतर तिच्यावर किमोथेरेपी सुरू आहे. पहिल्या किमोनंतर हिनाच्या शरीरावर काही डागसुद्धा दिसून आले. याविषयी नेटकऱ्यांनी काळजी व्यक्त केली. मात्र सकारात्मक विचार डोक्यात ठेवून या सर्व गोष्टींना सामोरं जात असल्याचं हिनाने चाहत्यांना सांगितलं आहे. किमोथेरेपी सुरू करण्यापूर्वी हिनाने तिचे केससुद्धा कापले. किमोथेरेपीमुळे केस गळतात. त्यामुळे आधीच हिंमत दाखवत हिनाने तिचे केस छोटे केले. त्याचा व्हिडीओसुद्धा तिने सोशल मीडियावर पोस्ट केला होता. हिनाला पाहून तिची आई भावूक झाल्याचं या व्हिडीओमध्ये दिसलं होतं.

साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिका डॉ. तारा भवाळकर
साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिका डॉ. तारा भवाळकर.
अलर्ट राहा, कधीही ब्रेकिंग मिळू शकेल, नीलम गोऱ्हेंचं सूचक वक्तव्य
अलर्ट राहा, कधीही ब्रेकिंग मिळू शकेल, नीलम गोऱ्हेंचं सूचक वक्तव्य.
शिंदेंना धक्का, माजी नगरसेवकांसह शेकडो कार्यकर्त्यांच्या हाती 'मशाल'
शिंदेंना धक्का, माजी नगरसेवकांसह शेकडो कार्यकर्त्यांच्या हाती 'मशाल'.
राऊतांचा गुलाबराव पाटलांवर निशाणा, 'रेडे गुवाहाटीलाच मारले, डुक्कर..'
राऊतांचा गुलाबराव पाटलांवर निशाणा, 'रेडे गुवाहाटीलाच मारले, डुक्कर..'.
तुम्ही खुनी; कोणत्या तोंडाने मतं मागणार? सुळेंचा कोणावर हल्लाबोल?
तुम्ही खुनी; कोणत्या तोंडाने मतं मागणार? सुळेंचा कोणावर हल्लाबोल?.
शिवरायांचं स्मारक पाहण्यास मुंबईत संभाजीराजे अन् पोलिसांकडून धरपकड
शिवरायांचं स्मारक पाहण्यास मुंबईत संभाजीराजे अन् पोलिसांकडून धरपकड.
'त्यांची दादागिरी संपली', बच्चू कडू यांचा अजित पवारांवर निशाणा
'त्यांची दादागिरी संपली', बच्चू कडू यांचा अजित पवारांवर निशाणा.
शिंदेंच्या मंत्र्यानं वाटलेल्या साड्यांची संतप्त महिलांनी केली होळी
शिंदेंच्या मंत्र्यानं वाटलेल्या साड्यांची संतप्त महिलांनी केली होळी.
'... तर मी 2 वेळेचं जेवले असते', लाडकी बहीण'चं आशा भोसलेंकडून कौतुक
'... तर मी 2 वेळेचं जेवले असते', लाडकी बहीण'चं आशा भोसलेंकडून कौतुक.
नवनीत राणांचा तुफान गरबा, तरुणींसोबत लुटला गरबा खेळण्याचा आनंद
नवनीत राणांचा तुफान गरबा, तरुणींसोबत लुटला गरबा खेळण्याचा आनंद.