
अभिनेत्री हिना खान मागील काही दिवसांपासून तिच्या खासगी आयुष्यामुळे अधिक चर्चेत आहे. हिनाने मोठा काळ मालिकांमध्ये गाजवलाय. अभिनेत्रीची जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. आजही लोक हिना खानपेक्षा अक्षरा या नावाने ओळखतात. टीव्ही मालिकांमधील प्रसिद्ध चेहरा हिना खान आहे. हिनाने फक्त मालिकाच नाही तर काही चित्रपटांमध्येही महत्वाच्या भूमिका केल्या आहेत. बिग बॉसमध्ये अभिनेत्री धमाका करताना दिसली. अभिनेत्री कॅन्सरवर मात करताना दिसतंय. मात्र, हिना खान सध्या चांगलीच वादात सापडल्याचे बघायला मिळतंय. आपल्यापेक्षा तब्बल आठ वर्षांनी लहान अभिनेत्याला किस करतानाचा हिनाचा व्हिडीओ व्हायरल होतोय. पतीचे लक्ष नसताना अभिनेत्रीने चक्क दुसऱ्या अभिनेत्याला किस केले.
शोमध्ये अभिनेता अभिषेक हिना खानकडे बघून म्हणतो की, कदाचित तुम्हाला मी अजिबात आवडत नाही. अभिषेकचे बोलणे ऐकून हिना खान मागे वळते आणि चक्क अभिषेकला किस करते. हिना खानने किस घेतल्यानंतर अभिषेक लाजताना दिसतोय. त्यानंतर हिना खानचा पती रॉकी जयस्वाल याला कळते की, अभिषेकला हिनाने किस दिलीये. यादरम्यान रॉकीचा चेहरा बरेच काही सांगून जाताना दिसतोय.
यानंतर अभिषेक रॉकीला बोलतो की, मला खरोखरच माफ कर… हे सर्वकाही तुझ्यासमोर झाले. यानंतर रॉकी शांत न बसता थेट म्हणतो की, एक्सचेंज ऑफर आहे..तिने तुला किस केले… मी आता तुझ्या गर्लफ्रेंडला किस करतो बघ… अभिषेकला ज्याप्रकारे हिना खानने किस केले, हे अजिबातच रॉकील आवडल्याचे दिसले नसल्याचे स्पष्ट दिसतंय. अभिषेक हा हिना खानपेक्षा तब्बल 8 वर्षांची लहान आहे.
अभिषेकला हिना खान हिने मस्तीमध्ये किस केल्याचे त्यांच्या व्हिडीओवरून स्पष्ट दिसतंय. मात्र, हे रॉकीला अजिबातच पटले नसल्याचे दिसतंय. हिना खानला कॅन्सरचे निदान झाल्यानंतर रॉकी प्रत्येकवेळी तिच्यासोबत उभा असल्याचे बघायला मिळाले. यादरम्यान काही दिवसांपूर्वीच लग्न केले. हिना खान हिने आपल्या लग्नाचे खास फोटो सोशल मीडियावर शेअर केली. हिना खान मोठ्या संपत्तीची मालकीन आहे.