Honey Singh : इथे पाक वेब सीरीजवर बंदीची मागणी तिथे हनी सिंह पाकिस्तानी क्रिकेटरच्या लग्नात..तुम्हीच बघा VIDEO

Honey Singh : 'जो बचे हैं संग समेट लो' 4 डिसेंबरला नेफफ्ल्क्सिवर रिलीज होणार आहे. फवाद खान आणि माहिरा खान यांच्या या वेब सीरीजमध्ये प्रमुख भूमिका आहेत. दोघांनी भारतीय चित्रपटांमध्ये काम केलं आहे.

Honey Singh : इथे पाक वेब सीरीजवर बंदीची मागणी तिथे हनी सिंह पाकिस्तानी क्रिकेटरच्या लग्नात..तुम्हीच बघा VIDEO
Honey Singh Dance
| Updated on: Nov 26, 2026 | 7:30 AM

पाकिस्तानी वेब सीरीज ‘जो बचे हैं संग समेट लो’भारतात रिलीज करण्यावरुन वाद वाढत चालला आहे. नेटफ्लिक्स वर ही वेब सीरीज येणार आहे. भारतात पाकिस्तानी कलाकारांना मोठ्या प्रमाणात विरोध होत आहे. भारतात पुन्हा एकदा पाकिस्तानी कलाकार, त्यांचा शो आणि कंटेटची चर्चा सुरु झाली आहे. पाकिस्तानी वेब सीरीजला आपल्या देशात विरोध होत असताना भारतीय सिंगर यो यो हनी सिंह आणि आतिफ अस्लम एकत्र दिसले. हनी सिंह प्रमाणे आतिफ अस्लम सुद्धा प्रसिद्ध पाकिस्तानी गायक आहे. दोघे दुबईच्या वेडिंगमध्ये एकत्र दिसले. हनी आणि आतिफ या लग्नात खास पाहुणे होते.

इंटरनेटवर हनी सिंह आणि आतिफ अस्लम यांचा व्हिडिओ व्हायरल होतोय. पाकिस्तानी ऑलराऊंडर बिलाल आसिफचं लग्न होतं. त्या लग्नात हनी सिंह आणि आतिफ अस्लम यांनी भरपूर मस्ती केली. सोबत डान्स केला. लग्नाच्या रात्री पाकिस्तानी सिंगर अबरार उल हकच्या गाण्यावर हनी आणि आतिफने ठेका धरला. हनीने पंजाबी गाण्यांवर भांगडा केला. मनापासून तो नाचताना दिसला. एका व्हिडिओत हनी सिंह पाकिस्तानी लेडीचा हात पकडून नाचताना दिसतोय. या लग्नाचा व्हिडिओ सादिक अलीने इन्स्टाग्रामवर शेअर केलाय. एका व्हिडिओत बिलाल आपल्या नवरीसोबत डान्स करताना दिसतोय. या दरम्यान आतिफ आणि हनी टाळ्या वाजवतायत. लग्नात हनी आणि आतिफने सोबत पोज दिली. दोघांची दोस्ती पाहून फॅन्स नक्कीच आनंदी झालेत. आतिफ आणि हनीचा स्टायलिश अंदाज दिसला.

Loading...

भारताच्या AICWA ला काय टोला लगावला?

भारत-पाकिस्तानमध्ये कलाकारांवरुन तणाव निर्माण झाल्यानंतर फारच असे कमी प्रसंग असतात, जेव्हा दोन्ही देशाचे कलाकार एका छताखाली दिसतात. बिलालच्या लग्नात म्यूझिकचे दोन लेजेंड्सना एकत्र पाहून फॅन्सच्या चेहऱ्यावर आनंद दिसत आहे. काही लोकांनी हनी आणि आतिफच्या भेटीवर प्रश्नचिन्ह निर्माण केलं आहे. सादिकने आपल्या पोस्टमध्ये AICWA ला टोला लगावला आहे. “एकाबाजूला पाकिस्तानी सीरीज रोखण्याची मागणी होत आहे, दुसरीकडे आम्ही म्यूझिक, मैत्री आणि आनंद साजरा करत आहोत. हे फक्त दुबईमध्येच होऊ शकतं” असं सादिकने लिहिलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिलं

जो बचे हैं संग समेट लो’ या शो संदर्भात 24 नोव्हेंबरला AICWA ने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिलं. भारतात या वेब सीरीजवर बंदी घालण्याची मागणी केली. शिवसेना नेते आनंद दुबे यांनी पाकिस्तानी शो वर बंदी घालण्याच्या मागणीचं समर्थन केलं आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us