AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Honey Singh: हनी सिंगच्या कार्यक्रमात गोंधळ घालून धमकी देणाऱ्यांविरोधात FIR दाखल

रॅपर आणि गायक हनी सिंग (Honey Singh) याने चार ते पाच अज्ञात व्यक्तींविरोधात तक्रार दाखल केली. 27 मार्च रोजी साऊथ दिल्ली क्लबमध्ये (South Delhi club) या अज्ञात व्यक्तींनी धक्काबुक्की केल्याचा आरोप त्याने केला आहे.

Honey Singh: हनी सिंगच्या कार्यक्रमात गोंधळ घालून धमकी देणाऱ्यांविरोधात FIR दाखल
Honey SinghImage Credit source: Facebook
| Updated on: Apr 07, 2022 | 3:43 PM
Share

रॅपर आणि गायक हनी सिंग (Honey Singh) याने चार ते पाच अज्ञात व्यक्तींविरोधात तक्रार दाखल केली. 27 मार्च रोजी साऊथ दिल्ली क्लबमध्ये (South Delhi club) या अज्ञात व्यक्तींनी धक्काबुक्की केल्याचा आरोप त्याने केला आहे. हनी सिंगच्या या तक्रारीनंतर दिल्ली पोलिसांनी (Delhi Police) याप्रकरणी एफआयआर दाखल केली आहे. हनी सिंग आणि त्याचा वकील इशान मुखर्जी यांनी संबंधित व्यक्तींवर गैरवर्तणूक, धमकी देणं आणि उच्छाद मांडण्याचा आरोप केला आहे. 28 मार्च रोजी त्याने ही तक्रार दाखल केली होती. ही घटना 27 मार्च रोजी साउथ एक्स्टेंशन-2 मधील स्कॉल क्लबमध्ये घडली, अशी माहिती पोलिसांनी दिली. एफआयआरमध्ये उल्लेख केल्यानुसार, हनी सिंग हा 26 आणि 27 मार्चच्या मध्यरात्री क्लबमध्ये परफॉर्म करत होता, त्यावेळी चार ते पाच जणांच्या एका गटाने मंचावर जाऊन गोंधळ घातला.

“4-5 अज्ञात लोकांनी गैरवर्तन करण्यास सुरुवात केली आणि शोमध्ये व्यत्यय आणला. त्यांनी जमलेल्या लोकांच्या गर्दीकडे दारूची बाटली दाखवत कलाकारांना स्टेजवरून खाली ढककलं. त्यानंतर चेक शर्ट घातलेल्या एका व्यक्तीने माझा (हनी सिंग) हात पकडला आणि मला धक्काबुक्की करण्यास सुरुवात केली. मी त्याचा हात सोडवण्याचा प्रयत्न करत होतो पण तो व्यक्ती मला सातत्याने धमक्या देत होता. त्याच्याकडे शस्त्र असल्याचंही मी पाहिलं. लाल शर्ट घातलेला आणखी एक व्यक्ती व्हिडिओ शूट करत ‘भगा दिया हनी सिंह को’ असं म्हणत होता,” असं FIR मध्ये नमूद करण्यात आलं आहे.

परफॉर्मन्सदरम्यान हा सगळा गोंधळ झाल्याने हनी सिंगसह इतर सर्व कलाकारांना स्टेज सोडून तिथून जावं लागलं, असंही तक्रारीत म्हटलं आहे. स्वेच्छेने इतरांना त्रास देणे, धमकी देणे यांसह इतर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी हनी सिंगने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.

हेही वाचा:

‘यालाच मिक्स बिर्याणी म्हणतात’; हृतिक-सबा आणि सुझान-अर्सलानच्या एकत्र फोटोवर नेटकऱ्यांचे कमेंट्स

“राजकारणात आले तरी राजकारण न करता काम करेन”; राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केल्यानंतर आसावरी जोशींचं विधान

Follow Us
मोठी बातमी! सचिन अहिर यांनी उपसभापती पदाचा अर्ज दाखल केल्यानंतर संजय
मोठी बातमी! सचिन अहिर यांनी उपसभापती पदाचा अर्ज दाखल केल्यानंतर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया; थेट म्हणाले...
मुंबईत मुसळधार पावसाची दमदार हजेरी; मरीन ड्राईव्हवर उसळल्या प्रचंड....
Marine Drive Rain Updates | मुंबईत मुसळधार पावसाची दमदार हजेरी; मरीन ड्राईव्हवर उसळल्या प्रचंड लाटा, पर्यटकांची गर्दी वाढली
24 तास महत्त्वाचे रेड आणि ऑरेंज अलर्ट जारी... धो धो पाऊस कोसळणार;
Latest Rain Update | 24 तास महत्त्वाचे रेड आणि ऑरेंज अलर्ट जारी... धो धो पाऊस कोसळणार; तुमच्या शहरात कोणता अलर्ट?
मोठी खळबळ! अरे असा पराभव.... ओमराजेंची ती ऑडिओ क्लिप व्हायरल; राजकीय
मोठी खळबळ! अरे असा पराभव.... ओमराजेंची 'ती' ऑडिओ क्लिप व्हायरल; राजकीय वर्तुळात मोठं घडणार?
ठाकरे गटाकडून डॅमेज कंट्रोलचा प्रयत्न, तातडीने उचलली मोठी पावलं
ठाकरे गटाकडून डॅमेज कंट्रोलचा प्रयत्न, तातडीने उचलली मोठी पावलं, थेट वरळीतच....
राज्यभर धो धो धो बरसतोय पाऊस! मुसळधार पावसामुळे कल्याण-डोंबिवलीला मोठा
राज्यभर धो धो धो बरसतोय पाऊस! मुसळधार पावसामुळे कल्याण-डोंबिवलीला मोठा फटका; तब्बल 18...
सचिन अहेर यांची आमदारकी राहणार की जाणार? कायदा काय सांगतो? असीम सरोदें
सचिन अहेर यांची आमदारकी राहणार की जाणार? कायदा काय सांगतो? असीम सरोदेंनी सगळं सांगितलं!
महापौर रितू तावडे यांची दुर्घटना स्थळाला भेट, दोषींवर कारवाई करणार
महापौर रितू तावडे यांची दुर्घटना स्थळाला भेट, दोषींवर कारवाई करणार
केतन-सिया प्रकरणाला वेगळंच वळण; तब्बल 10 कोटी... वकिलांच्या दाव्याने
केतन-सिया प्रकरणाला वेगळंच वळण; तब्बल 10 कोटी... वकिलांच्या दाव्याने एकच खळबळ
चेंबूर स्कुलबस अपघातानंतर शिंदे अ‍ॅक्शन मोडमध्ये, फोन करून दिला तातडीच
Eknath Shinde | चेंबूर स्कुलबस अपघातानंतर शिंदे अ‍ॅक्शन मोडमध्ये, फोन करून दिला तातडीचा आदेश!