AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Asawari Joshi: “राजकारणात आले तरी राजकारण न करता काम करेन”; राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केल्यानंतर आसावरी जोशींचं विधान

मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयाचा ठसा उमटविणारी अभिनेत्री आसावरी जोशी (Asawari Joshi) यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात (NCP) प्रवेश केला आहे.

Asawari Joshi: राजकारणात आले तरी राजकारण न करता काम करेन; राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केल्यानंतर आसावरी जोशींचं विधान
Asawari Joshi in NCPImage Credit source: Tv9
| Updated on: Apr 07, 2022 | 12:33 PM
Share

मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयाचा ठसा उमटविणारी अभिनेत्री आसावरी जोशी (Asawari Joshi) यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात (NCP) प्रवेश केला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या उपस्थितीत मुंबईत हा पक्षप्रवेश कार्यक्रम पार पडला. आसावरी यांनी अनेक मराठी, हिंदी चित्रपट आणि मालिकांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. सध्या त्या स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘स्वाभिमान: शोध अस्तित्त्वाचा’ या मालिकेत भूमिका साकारत आहेत. चित्रपटसृष्टी, कलाकार आणि त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करत असल्याचं आसावरी यांनी एका वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं होतं. “गेल्या अनेक वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा अत्यंत गांभीर्याने आणि संवेदनशीलपणे कलाकार, लोककलाकारांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करत आहे. त्यामुळे मला हा पर्याय योग्य वाटतो”, असं त्या म्हणाल्या. त्याचप्रमाणे पक्षातील वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली कलाविश्वातील प्रश्न सोडवण्यासाठी कटीबद्ध राहणार असल्याचं आश्वासन त्यांनी दिलं.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात का प्रवेश केला?

“राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मी प्रवेश का केला, असा सगळ्यांना प्रश्न पडला असेल. मी हा पक्ष का निवडला असा प्रश्न सगळ्यांच्या मनात नक्कीच असेल. मी कलाकार आहे आणि कलाकारांसाठी झटणारा असा पक्ष राष्ट्रवादी काँग्रेसशिवाय दुसरा कुठला पक्ष आता माझ्या नजरेत नाही. म्हाडाच्या सोडतीमध्ये कलाकारांसाठी असलेला कोटा असो किंवा मराठी चित्रपटाला उद्योकाचा दर्जा देण्याची गोष्ट असो किंवा लोककलावंत, इतर कलावंत ज्यांना पेन्शन चालू आहे त्यांचं पेन्शनवाढ करण्याची गोष्ट असो.. कलाकारांचे प्रश्न मांडले जातात आणि समस्यांवर उत्तरं शोधली जातात. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. यासाठी झटणारा हा एकच पक्ष आहे. म्हणून मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. कलाकारांचे प्रश्न सोडवण्यासाठी मी काम करेन. माझ्यावर जो विश्वास टाकण्यात आलाय, तो मी नक्की पूर्ण करेन. मी एकच ठरवून आलेय की, राजकारणात आले असले तरी राजकारण न करता काम करेन,” असं वक्तव्य आसावरी यांनी यावेळी केलं.

गेल्या वर्षी आसावरी यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. मात्र वर्षभर काँग्रेसमध्ये राहिल्यानंतर त्यांनी आता राष्ट्रवादीची निवड केली आहे. आसावरी यांनी 1986 मध्ये ‘माझं घर माझा संसार’ या मराठी चित्रपटातून पदार्पण केलं. 2001 मध्ये त्यांची ‘ऑफिस ऑफिस’ ही हिंदी मालिका चांगलीच गाजली.

अलीकडच्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मराठी आणि हिंदी कलाविश्वातील अनेक दिग्गज कलाकार प्रवेश करत आहेत. सविता मालपेकर, प्रिया बेर्डे, विजय पाटकर, वैशाली माडे, सुरेखा पुणेकर, सुरेखा कुडची आणि आता आसावरी जोशी यांसारख्या कलाकारांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे.

हेही वाचा:

“मी कोणत्याही धर्माविरोधात नाही पण भारतातंच..”; लाऊडस्पीकरवरील अजानबद्दल अनुराधा पौडवाल यांचं वक्तव्य

‘अख्खी सिरीयलच प्राईम टाईममधून लाथ घालून हाकलली’; ‘मुलगी झाली हो’ मालिकेविषयी किरण मानेंची पोस्ट चर्चेत

मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र
मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र.
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?.
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला.
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी.
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्....
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्.....
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य.
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी.
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले...
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले....
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन.
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर..
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर...