AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Kiran Mane: ‘अख्खी सिरीयलच प्राईम टाईममधून लाथ घालून हाकलली’; ‘मुलगी झाली हो’ मालिकेविषयी किरण मानेंची पोस्ट चर्चेत

सोशल मीडियावर राजकीय भूमिका घेतल्याने अभिनेते किरण माने (Kiran Mane) यांना स्टार प्रवाह (Star Pravah) वाहिनीवरील 'मुलगी झाली हो' (Mulgi Zali Ho) या मालिकेतून काढून टाकण्यात आल्याचं प्रकरण चांगलंच गाजलं होतं.

Kiran Mane: 'अख्खी सिरीयलच प्राईम टाईममधून लाथ घालून हाकलली'; 'मुलगी झाली हो' मालिकेविषयी किरण मानेंची पोस्ट चर्चेत
Kiran ManeImage Credit source: Facebook
| Updated on: Apr 07, 2022 | 9:02 AM
Share

सोशल मीडियावर राजकीय भूमिका घेतल्याने अभिनेते किरण माने (Kiran Mane) यांना स्टार प्रवाह (Star Pravah) वाहिनीवरील ‘मुलगी झाली हो’ (Mulgi Zali Ho) या मालिकेतून काढून टाकण्यात आल्याचं प्रकरण चांगलंच गाजलं होतं. किरण मानेंच्या राजकीय भूमिकेची चर्चा असतानाच मालिकेच्या प्रॉडक्शन हाऊसकडून त्यांच्यावर वेगळेच आरोप करण्यात आले होते. सेटवरील गैरवर्तणुकीमुळे त्यांना मालिकेतून काढण्यात आल्याचं प्रॉडक्शन हाऊसकडून सांगण्यात आलं. या संपूर्ण प्रकरणावर विविध क्षेत्रातून प्रतिक्रिया उमटल्या होत्या. आता पुन्हा एकदा किरण माने यांनी फेसबुकवर मालिकेविषयी एक पोस्ट लिहिली आहे. ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. अवघ्या तीन महिन्यात ही मालिका रसातळाला गेल्याचं त्यांनी या पोस्टमध्ये लिहिलंय. मुलगी झाली हो या मालिकेला प्राइम टाइममधून काढून टाकण्यात आलं असून आता ही मालिका दुपारी प्रसारित होणार असल्याचंही त्यांनी यात म्हटलंय.

किरण माने यांची पोस्ट

‘प्रेक्षक लै लै लै नादखुळा असत्यात भावांनो… मला काल वाढदिवसाची सगळ्यात मोठी गिफ्ट कुनी दिली आसंल, तर ती प्रेक्षकांनी! जी गोष्ट भलेभले करू शकले न्हाईत, ती त्यांनी एका रट्ट्यात केली. एका माजोरड्या प्रॉडक्शन हाऊसचा नक्षाच उतरवला. कटकारस्थान रचून मला बाजूला केल्यानंतर त्या सिरीयलचा टीआरपी असा काय घसरला की चॅनलनं ती अख्खी सिरीयलच ‘प्राईम टाईम’मधून लाथ घालून हाकलली. जी सिरीयल शहरी आणि ग्रामीण विभागात मिळून सलग दीड वर्ष बहुतांश एक नंबरवर आनि बर्‍याचदा पहिल्या तीन नंबरमध्ये असायची. ती तीन म्हैन्यात रसातळाला गेली. आता मे महिन्यापासून ती सिरीयल, अतिशय महत्त्वाच्या समजल्या जानार्‍या ‘स्पेशल प्राईम टाईम’ला दिसनार नाय. फक्त तीन म्हैन्यात हे घडलं. ह्याला म्हन्त्यात ‘पोएटिक जस्टिस’.

ही गोष्ट साधी नाय भावांनो. सर्वसामान्य जन्तेनं मनावर घेतलं तर काय होऊ शकतं याचं लै लै लै खतरनाक उदाहरन हाय. ‘खरा न्याय’ सर्वसामान्य जन्तेच्या दरबारात असतो. लोकप्रतिनिधी निवडतानाबी जन्तेनं अशीच ताकद दाखवली तर भल्याभल्यांना धोबीपछाड बसू शकते, हे इतिहासानं दाखवून दिलंय. “ये पब्लीक है ये सब जानती है” असं त्यो राजेश खन्ना डोळं मिचकावत म्हनत नाचायचा, ते काय खोटं न्हाय. कुनाला वाटत आसंल आता किरन माने नाचत आसंल, खुश झाला आसंल. नाय भावांनो. लढाई संपलेली नाय. मी कायदेशीर मार्गानं लढून तो न्यायबी मिळवनारच हाय. सुट्टी देनार नाय या भंगारांना. पन काही ‘बिकाऊ’ कलाकारांनी माझ्यावर जे आरोप केले, त्या सगळ्यांना प्रेक्षकांनीच सनसनीत, कचकटून थोबाडीत देऊन उत्तर दिलं याचं समाधान मात्र नक्की हाय.

कुनीतरी सांगीतलं की ती सिरीयल आता दुपारी दाखवनारेत. हे तर लै बेक्कार भावांनो. एखाद्या यशस्वी पोलीस इन्स्पेक्टरचं अचानक एक दिवस डिमोशन करून त्याला ट्रॅफिक हवालदारची ड्यूटी द्यावी तसं हाय हे. यातही समाधान हे की जे बिचारे हातावर पोट असनारे असत्यात ते स्पॉटबॉयपासून मेकअपमन हेअरड्रेसरपर्यन्त त्यांचं पोट सुरू र्‍हानार. बाकी माजोरडे कलाकार कर्मानं मरनार. धरलं तर चावतंय, सोडलं तर पळतंय अशी गत हुनार. जिथं फुलं वेचली तिथं गवर्‍या वेचायची वेळ येनार. असो. माझ्यावर कटकारस्थान रचून फायदा कुनाचा झाला आनि नुकसान कुनाचं झालं यावर एक चिंतन शिबीर घ्यावं त्यांनी. बाकी वाढदिवस लैच भारी गेला. तुमच्या शुभेच्छांच्या वर्षावानं भारावून गेलो. या वर्षीचा वाढदिवस ‘स्पेशल’ बनवला तुमी. एकेक पोस्ट वाचताना आनंदाश्रू येत होते. लब्यू लब्यू लब्यू लैच मित्रमैतरनींनो. तुमाला अभिमान वाटंल आसंच काम माझ्या हातनं होत र्‍हाईल याची खात्री देतो. मनापास्नं आभार,’ अशी पोस्ट त्यांनी लिहिली.

किरण मानेंच्या या पोस्टवर विविध प्रतिक्रिया नेटकऱ्यांकडून व्यक्त केल्या जात आहेत. ‘तुम्ही त्या मालिकेतून निघाल्यापासून ती बघाविशी वाटत नाही’, अशी कमेंट एका युजरने केली. तर ‘चांगलंच झालं’ असं दुसऱ्याने म्हटलं.

हेही वाचा:

Anshuman Vichare: एप्रिल फूल करणं पडलं महागात; अखेर अंशुमन विचारेच्या पत्नीने मागितली माफी

‘कोणाच्या तरी मागे मागे करा, काम मिळत राहणार’; मराठी इंडस्ट्रीतील गटबाजीबद्दल अभिनेत्रीची संतप्त पोस्ट

कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.
अनिल परब शिवतीर्थवर राज ठाकरेंच्या भेटीला... कुठं ठाकरेंची युती होणार?
अनिल परब शिवतीर्थवर राज ठाकरेंच्या भेटीला... कुठं ठाकरेंची युती होणार?.
मीराभाईंदरमधील इमारतीत शिरलेल्या बिबट्याला पकडण्यासाठी शर्थीचे प्रयत्न
मीराभाईंदरमधील इमारतीत शिरलेल्या बिबट्याला पकडण्यासाठी शर्थीचे प्रयत्न.
आरोपींना शिंदेंच्या भावाच्या हॉटेलमधून जेवण, अंधारेंचा सनसनाटी आरोप
आरोपींना शिंदेंच्या भावाच्या हॉटेलमधून जेवण, अंधारेंचा सनसनाटी आरोप.
कोकाटे यांच्या जागी नव्या मंत्र्यांची नेमणूक कधी? मोठी अपडेट समोर
कोकाटे यांच्या जागी नव्या मंत्र्यांची नेमणूक कधी? मोठी अपडेट समोर.