AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Anshuman Vichare: एप्रिल फूल करणं पडलं महागात; अखेर अंशुमन विचारेच्या पत्नीने मागितली माफी

'एप्रिल फूल' (April Fool) करण्यासाठी 1 एप्रिल रोजी अनेकांकडून विविध युक्त्या लढवल्या जातात. अशीच युक्ती मराठी अभिनेता अंशुमन विचारेच्या (Anshuman Vichare) पत्नीने लढवली. मात्र हीच युक्ती त्यांना चांगलीच महागात पडली आहे.

Anshuman Vichare: एप्रिल फूल करणं पडलं महागात; अखेर अंशुमन विचारेच्या पत्नीने मागितली माफी
अंशुमन विचारेच्या पत्नीने मागितली माफी Image Credit source: Instagram
| Updated on: Apr 06, 2022 | 10:17 AM
Share

‘एप्रिल फूल’ (April Fool) करण्यासाठी 1 एप्रिल रोजी अनेकांकडून विविध युक्त्या लढवल्या जातात. अशीच युक्ती मराठी अभिनेता अंशुमन विचारेच्या (Anshuman Vichare) पत्नीने लढवली. मात्र हीच युक्ती त्यांना चांगलीच महागात पडली आहे. आपल्या घरी चिमुकल्या पाहुण्याचं आगमन झाल्याचं अंशुमनच्या सोशल मीडिया अकाऊंटवर 1 एप्रिल रोजी जाहीर करण्यात आलं. या पोस्टमध्ये त्यांची मुलगी अन्वीचा फोटो आहे. या फोटोमध्ये अन्वीच्या हातात बाळसुद्धा पहायला मिळत आहे. ‘अन्वीला झाला भाऊ’ असं त्यावर लिहिलेलं आहे. ही पोस्ट पाहताच सर्वसामान्यांसोबत कलाविश्वातील मंडळीसुद्धा अंशुमनवर शुभेच्छांचा वर्षाव करू लागले. काही क्षणांतच ही पोस्ट व्हायरल झाली आणि अंशुमनच्या कुटुंबीयांना शुभेच्छांचे फोन कॉल्स आणि मेसेजेस येऊ लागले. इतकंच काय, तर काही वेबसाइट्सवरही अंशुमनला मुलगा झाल्याची बातमी देण्यात आली. इतरांना एप्रिल फूल करण्यासाठी वापरलेली ही युक्ती अंशुमन आणि त्याच्या कुटुंबीयांसाठी महागात पडली. (Anvi Vichare)

आता अंशुमनच्या पत्नीने तिच्या युट्यूब चॅनलवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. आपल्याला मुलगा झाला नसल्याचं त्यांनी या व्हिडीओत स्पष्ट केलं आहे. एप्रिल फूलचा प्रँक अत्यंत चुकीचा ठरला आणि आम्हाला लोकांचे फोनकॉल्स, मेसेजेस येऊ लागले, असं त्यांनी या व्हिडीओत सांगितलं.

एप्रिल फूलची पोस्ट-

“1 एप्रिल रोजी आम्ही आमच्या मुलीचा फोटो सोशल मीडियावर अपलोड केला. यामध्ये तिच्या हातात लहान बाळ दिसत आहे. अन्वीला भाऊ झाला, असं कॅप्शन त्याला देण्यात आलं. मात्र असं काहीच घडलं नाहीये. 1 एप्रिल रोजी सहज एप्रिल फूल करण्यासाठी मी तो फोटो पोस्ट केला होता. अंशुमन त्यावेळी शूटमध्ये व्यग्र होता आणि त्याला याविषयी काहीच माहित नव्हतं. अचानक त्याला शुभेच्छांचे फोन कॉल्स आणि मेसेज येऊ लागले. आता त्या घटनेला चार-पाच दिवस होऊनसुद्धा आम्हाला अजूनही कॉल्स आणि मेसेजेस येत आहेत. याचा आम्हाला खूप त्रास होतोय. अंशुमन आणि माझी एकच मुलगी आहे. अन्वीनंतर दुसऱ्या बाळाचा विचारसुद्धा आम्ही केला नाही. फक्त एका प्रँक पोस्टमुळे आमच्यासमोर मोठी समस्या उभी राहिली”, असं अंशुमनच्या पत्नीने स्पष्ट केलं.

“माझ्यामुळे अंशुमनला भयंकर त्रास होतोय, कृपया थांबवा हे सगळं”

अंशुमनची मुलगी अन्वी हिचे व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होतात. अन्वीचा सोशल मीडियावर मोठा चाहतावर्ग आहे. अंशुमन आणि त्याची पत्नी हे अन्वीचे व्हिडीओ फेसबुक आणि युट्यूबवर शेअर करत असतात.

हेही वाचा:

Shahid Kapoor: “मला तुझ्यासोबत राहायचं नाही”; पत्नी मीराचे हे शब्द ऐकताच शाहिदला बसला धक्का!

Hrithik Roshan: ‘ही हृतिकची गर्लफ्रेंड आहे की मुलगी?’; हातात हात घालून चालतानाचा VIDEO पाहिल्यावर नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.