VIDEO | आई, तुला मी म्हातारी होऊच देणार नाही! अभिनेता अंशुमन विचारेच्या छकुलीचा मम्माशी वादा

सोशल मिडियात अन्वीच्या व्हिडिओवर लाईक्स आणि कमेंट्सचा जणू तुफान पाऊस पडत आहे. तितक्याच प्रमाणात व्हिडिओ व्हायरलही होत आहे. (Mom, I won't let you grow old! Actor Anshuman Vichare's Chhakuli's promise to Mamma)

VIDEO | आई, तुला मी म्हातारी होऊच देणार नाही! अभिनेता अंशुमन विचारेच्या छकुलीचा मम्माशी वादा
अंशमन विचारेची मुलगी अन्वीचा एक नवा व्हिडिओ व्हायरल

मुंबई : अभिनेता अंशुमन विचारेची छकुली अन्वी हिचे व्हिडिओही सोशल मिडियात भलतेच लोकप्रिय ठरत आहेत. ती क्यूट, गोंडस दिसण्याबरोबरच तिचं बोलणे चाहत्यांच्या काळजाला भिडत आहे. तिचे सर्वच नवनवीन व्हिडिओच चाहत्यांच्या मनावर अधिराज्य करीत आहेत. अन्वीचा नुकताच एक नवीन व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओत तिने आईशी साधलेला संवाद मायलेकीच्या नात्याचा धागा आणखी भक्कम करीत आहे. दोघींच्या संवादात भावनिक ओलावा आहे. आई ही तुला म्हातारी होऊच देणार नाही, यातून अन्वीचं मम्मावरचं नितांत प्रेम ओसंडून वाहत आहे. आईच्या कामात मदत म्हणून अन्वीने स्वतः जेवण बनवण्यास सुरुवात केली आहे. तिचा आईसोबतचा संवाद आजच्या जमान्यातील मायलेकींचेच चित्र दाखवून देत आहे. सोशल मिडियात अन्वीच्या व्हिडिओवर लाईक्स आणि कमेंट्सचा जणू तुफान पाऊस पडत आहे. तितक्याच प्रमाणात व्हिडिओ व्हायरलही होत आहे. (Mom, I won’t let you grow old! Actor Anshuman Vichare’s Chhakuli’s promise to Mamma)

अन्वीने व्हिडिओतून साधलेला संवाद

तू म्हातारी होणार मग मी घाबरणार, पण मी म्हातारीला घाबरते. मी तुला म्हातारी होऊच नाही देणार, कारण तू माझी मम्मा आहे आणि तू मला सुंदर दिसते. आता मी साबुदाण्याची खिचडी करते.

लॉकडाऊनमध्येही व्हायरल व्हिडिओला तुफान पसंती

लॉकडाऊनमध्येही अंशुमन विचारे फॅमिलीसोबत एन्जॉय करताना दिसला. कोरोना काळातही अंशुमन लेकीसोबत एन्जॉय करताना दिसला. याकाळातही अन्वीचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. यात अन्वी पार्टीला जायचे असा हट्ट करताना पहायला मिळते. तेव्हा तिची आई कोरोना काळात पार्टी करु शकत नाही असे समजावून सांगतेय. या व्हिडिओलाही रसिकांची तुफान पसंती मिळाली. आठवडाभरापूर्वी अंशुमनने आपल्या गोड, कॉमेडी आठवणींना उजाळा दिला आहे. अन्वीची लहानपणीची छायाचित्रे त्याने शेअर केली होती. (Mom, I won’t let you grow old! Actor Anshuman Vichare’s Chhakuli’s promise to Mamma)

इतर बातम्या

सोनू सूदच्या ‘त्या’ ट्विटवर संतापले नेटकरी! सोशल मीडियावर ट्रेंड केला #WhoTheHellAreUSonuSood 

Top 5 Marathi Serial | मालिकांच्या शर्यतीत ‘मुलगी झाली हो…’ ठरली अव्वल, पाहा या आठवड्याच्या टॉप 5 मराठी मालिका

Published On - 11:46 pm, Thu, 11 March 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI