AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘कोणाच्या तरी मागे मागे करा, काम मिळत राहणार’; मराठी इंडस्ट्रीतील गटबाजीबद्दल अभिनेत्रीची संतप्त पोस्ट

बॉलिवूड असो किंवा मराठी इंडस्ट्री.. घराणेशाही, गटबाजी, पक्षपात या मुद्द्यांनी अनेकदा लक्ष वेधून घेतलं आहे. कलाविश्वातील या मुद्द्यांकडे काही कलाकार दुर्लक्ष करतात, काहीजण त्यातच सामील होऊ पाहतात किंवा काहीजण त्याविरोधात आवाज उठवतात. (Marathi Industry)

'कोणाच्या तरी मागे मागे करा, काम मिळत राहणार'; मराठी इंडस्ट्रीतील गटबाजीबद्दल अभिनेत्रीची संतप्त पोस्ट
actress Minal BalImage Credit source: Facebook
| Updated on: Apr 06, 2022 | 11:51 AM
Share

बॉलिवूड असो किंवा मराठी इंडस्ट्री.. घराणेशाही, गटबाजी, पक्षपात या मुद्द्यांनी अनेकदा लक्ष वेधून घेतलं आहे. कलाविश्वातील या मुद्द्यांकडे काही कलाकार दुर्लक्ष करतात, काहीजण त्यातच सामील होऊ पाहतात किंवा काहीजण त्याविरोधात आवाज उठवतात. अशाच एका मराठी अभिनेत्रीने इंडस्ट्रीतील गटबाजीबद्दल संताप व्यक्त केला आहे. मराठी मालिकांमध्ये (Marathi Serial) काम करणारी अभिनेत्री मिनल बाळ (Minal Bal) हिने फेसबुकवर यासंदर्भातील पोस्ट लिहिली आहे. ‘प्रामाणिकपणे काम करणं, विचार करून चांगलं काम करण्याची धडपड, संयम, श्रद्धा, मेहनतीचं फळ वगैरे सब झूट है’, असं तिने या पोस्टमध्ये म्हटलंय. या पोस्टद्वारे मिनलने इंडस्ट्रीत गटबाजी करणाऱ्यांना उपरोधिक टोलासुद्धा लगावला आहे. (Marathi Actress)

अभिनेत्रीची पोस्ट-

‘प्रामाणिकपणे खूप मनापासून सिंसीयरली काम करणं, विचार करून चांगलं काम करण्याची धडपड, संयम, श्रध्दा, मेहनतीचं फळ वगैरे सब झूट है! कोणाच्या तरी मागे मागे करा, करेक्ट लोकांच्या संपर्कात रहा, एखाद्या ग्रुपशी संलग्न रहा, खूप गोड (खोटं खोटं) वागा आणि बास झालं काम. मग काय कामावर काम मिळत राहणार आणि मग वर वर काम केलं तरीही किंवा काम येत नसेल तरीही फरक पडणार नाही. तुमच्या डोक्यावर क्राऊन हा असणारच आणि मग त्याचाच रुबाब (attitude) करायचा. आहे की नाही वर जाण्याचा म्हणजे प्रसिद्ध होण्याचा मार्ग. शू… कोणाला सांगू नका हा, हा मार्ग मी तुम्हाला सांगितला.. ते आपलं सिक्रेट. रामचंद्र कह गए सिया से ऐसा कलयुग आएगा हंस चुगेगा दाना तुन का कौआ मोती खाएगा ता. क.- वरील मजकूर हा कोणालाही म्हणजे कोणालाही उद्देशून नाही किंवा सर्वांनाच लागू होत नाही, किंवा मला आक्षेप नाही,’ अशी पोस्ट मिनलने फेसबुकवर लिहिली आहे.

मिनलच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट्स करत प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. ‘तुझी मेहनत अशी वाया जाऊ देऊ नकोस. जर तुझ्यावर अन्याय झाला असेल किंवा होत असेल तर तू यावर बोललेलंच बरं, अगदी नाव घेऊन…अन्याय सहन करणं हा पण गुन्हाच आहे,’ असं एकाने म्हटलं. ‘हे तर प्रत्येक क्षेत्रात आहेच. आपण प्रामाणिकपणे आपले काम करत राहायचे,’ असं दुसऱ्याने लिहिलं.

हेही वाचा:

Anshuman Vichare: एप्रिल फूल करणं पडलं महागात; अखेर अंशुमन विचारेच्या पत्नीने मागितली माफी

Shahid Kapoor: “मला तुझ्यासोबत राहायचं नाही”; पत्नी मीराचे हे शब्द ऐकताच शाहिदला बसला धक्का!

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.