AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘मुलगी झाली हो’ मालिकेतून अभिनेते किरण माने यांना बाहेरचा रस्ता, माने संतप्त! नेमकं कारण काय?

स्टार प्रवाह वाहिनीवरील 'मुलगी झाली हो' या मालिकेतील अभिनेते किरण माने (Actor Kiran Mane) यांच्याबाबत एक धक्कादायक प्रकार समोर आलाय. किरण माने हे आपल्या सोलश मीडियावरील परखड मतप्रदर्शनामुळे नेहमीच चर्चेत असतात. मात्र, आता त्यांना राजकीय भाष्य नडल्याचं पाहायला मिळत आहे. त्यांना 'मुलगी झाली हो' या मालिकेतून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. माने यांनी त्याबाबत टीव्ही 9 मराठीशी बोलताना तीव्र संताप व्यक्त केलाय.

'मुलगी झाली हो' मालिकेतून अभिनेते किरण माने यांना बाहेरचा रस्ता, माने संतप्त! नेमकं कारण काय?
किरण माने, अभिनेते
| Edited By: | Updated on: Jan 14, 2022 | 12:46 AM
Share

मुंबई : सोशल मीडिया (Social Media) किंवा एखाद्या जाहीर व्यासपीठावर कुठल्याही क्षेत्रातील एखादा कलाकार किंवा सामान्य माणसाने राजकारणाबाबत परखड मत व्यक्त केल्यास त्याला त्याचे परिणाम भोगावे लागल्याच्या अनेक घटना घटना ऐकायला किंवा पाहायला मिळत असतील. असाच एक प्रकार महाराष्ट्रात पाहायला मिळत आहे. स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘मुलगी झाली हो’ या मालिकेतील अभिनेते किरण माने (Actor Kiran Mane) यांच्याबाबत एक धक्कादायक प्रकार समोर आलाय. किरण माने हे आपल्या सोलश मीडियावरील परखड मतप्रदर्शनामुळे नेहमीच चर्चेत असतात. मात्र, आता त्यांना राजकीय भाष्य नडल्याचं पाहायला मिळत आहे. त्यांना ‘मुलगी झाली हो’ या मालिकेतून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. माने यांनी त्याबाबत टीव्ही 9 मराठीशी बोलताना तीव्र संताप व्यक्त केलाय.

किरण माने यांनी काही वेळापूर्वी एक फेसबुक पोस्ट टाकली. त्यात काल टो जुबान, आंसुओं से गाऊंगा… गाड दो, बीज हूँ मैं. पेड बन ही जाऊंगा! असी माने यांची पोस्ट आहे. या पोस्टनंतर आता सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया उमटताना पाहायला मिळत आहे. माने यांच्या भूमिकेचं त्यांच्या चाहत्यांकडून जोरदार समर्थन केलं जात आहे.

‘…नाहीतर तुमच्या पोटावर पाय आणू, ही प्रवृत्ती बोकाळतेय’

‘देशातील नागरिकांच्या दुर्दैवानं बातमी खरी आहे. तुम्ही सत्ताधाऱ्यांविरोधात आवाज उठवायचा नाही किंवा तुम्ही कुठल्या विचारधारेविरोधात आवाज उठवायचा नाही. नाहीतर आम्ही तुमच्या पोटावर पाय आणू, तुमचं जगणं मुश्किल करु असा एक संदेश देण्याचा प्रयत्न यातून झाला आहे. याचं कारण आहे की मी राजकीय पोस्ट म्हणता येणार नाही. पण मी एक विचारधारा मानणारा माणूस आहे आणि तशा पोस्ट मी करत असतो. बऱ्याच पोस्ट माझ्या या तुकाराम महाराजांचे विद्रोही जे अभंग आहेत, त्याचं आताच्या परिस्थितीला जोडून निरुपण मी करत असतो. तुम्ही फेसबुकवर शोधलं, #तुकाआशेचाकिरण तर त्यावर तुम्हाला माझ्या अनेक पोस्ट सापडतील. ज्या तुकाराम महाराजांचे अभंग घेऊन त्यातील विद्रोही विचारांची उकल मी आज्या परिस्थितीशी जोडून केलेली आहे. त्याच्या विरुद्ध विचारधारा जी आहे, ज्या विचारधारेनं तुकाराम महाराजांना त्रास दिला, ज्या विचारधारेनं ज्ञानोबांना त्रास दिला, ज्या विचारधारेनं शिवरायांच्या राज्याभिषेकाला नकार दिला. त्या विचारधारेचे लोक पेटून उठतात. मला खूप त्रास झाला या ट्रोलर्सचा, असं माने म्हणाले.

कुणी आलं नाही तर एकटा लढेन- माने

‘मला कुठल्याही राजकीय नेत्याचा फोन आला नाही. पण राजकीय पक्षाशी संबंधित अनेक पक्षाच्या कार्यकर्त्यांचे मला फोन आले. मला बाकी काही म्हणायचं नाही पण ही झुंडशाही किती दिवस सहन करायची? आपण महाराष्ट्रात राहतो, यूपी किंवा बिहारमध्ये राहत नाही. तुम्ही तुमचं मत मांडायचं नाही, नाहीतर बघा आम्ही काय करु तुम्हाला, हे किती दिवस आपण सहन करायचं? हे प्रत्येक नागरिकानं आता स्वत: ठरवायचं आहे. तुम्ही बोलायचं काय यावर बंधन, तुम्ही खायचं काय यावर बंधन, तुम्ही कपडे कुठले घालायचे यावर बंधन, तुमच्या सगळ्याच गोष्टींवर जर बंधनं यायला लागली. ज्या गोष्टीसाठी आपल्या देशानं लढा दिला. डॉ. बाबासाहेबांनी जे संविधान लिहिलं, ते पायदळी तुडवलं जात आहे. तर ही माझ्यासाठी प्रत्येक नागरिकासाठी धोक्याची घंटा आहे. बघू आता एका कलाकारासाठी किती लोक, कोणता राजकीय पक्ष माझ्या मागे उभा राहतो. आणि जर कुणीही नाही माझ्यामागे उभा राहिला तरी मी तुकाराम महाराजांचा भक्त आहे, शिवाजी महाराजांचा भक्त आहे, वारकरी संप्रदायाचा आहे. मी एकटा लढेन. माझं अभिव्यक्ती स्वातंत्र्य कुणी हिरावून घेऊ शकणार नाही’, अशी संतप्त प्रतिक्रिया किरण माने यांनी टीव्ही 9 मराठीशी बोलताना व्यक्त केली आहे.

इतर बातम्या :

कांद्याची आवक घटली; दरात मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा
कांद्याची आवक घटली; दरात मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा.
मुंबईची हवा झाली खराब! श्वास घेणेही कठीण, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर
मुंबईची हवा झाली खराब! श्वास घेणेही कठीण, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर.
प्रश्नचिन्ह निर्माण होईल असं...; वडेट्टीवारांचं मोठं विधान
प्रश्नचिन्ह निर्माण होईल असं...; वडेट्टीवारांचं मोठं विधान.
शिवसेना-संघाची विचारसरणी मिळतीजुळती! शिंदेंच्या विधानाची चर्चा
शिवसेना-संघाची विचारसरणी मिळतीजुळती! शिंदेंच्या विधानाची चर्चा.
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक.
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:.
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज.
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा.
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई.
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल.