४९ गाणी एकापाठोपाठ लिहिली, पण एकही पसंत पडेना, अखेर रात्री २ वाजता गाणं सुचलं..इतकं गाजलं की..

गाणं हे आतून आले पाहिजे, तुम्ही अजून वेळ घ्या, हवंतर समुद्री किनारी तरुणींना पाहून या, बघा काही सुचतं का असे व्ही. शांताराम आपल्याला म्हणाल्याचे गीतकार जगदीश खेबुडकर यांनी सांगितले.

४९ गाणी एकापाठोपाठ लिहिली, पण एकही पसंत पडेना, अखेर रात्री २ वाजता गाणं सुचलं..इतकं गाजलं की..
V. Shantaram and Jagdish Khebudkar
| Updated on: Oct 08, 2026 | 7:08 PM

दिग्गज चित्रपट निर्माते व्ही. शांताराम यांचा एक महत्वाच्या चित्रपटाच्या गाण्याच्या निर्मितीचा एका किस्सा व्हायरल होत आहे. गीतकार जगदीश खेबुडकर यांनी अलिकडेच समाजमाध्यमावर या संबंधीचा अनुभव सांगितल्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. व्ही.शांताराम यांना एका महत्वाकांक्षी चित्रपटासाठी गाणं हवं होतं. ते गाणे धड लावणी नको. लावणी डान्स त्यात नव्हता. असं गाणं सुचलं की सांग असा निरोप जगदीश खेबुडकरांनी सांगितला आहे. खेबुडकर जे लिहायचे ते व्ही. शांताराम चांगले म्हणायचे, पण आतून आलेले नाही असे म्हणायचं अशी खेबुडकरांनी ४९ गाणी एका दिवसात लिहिली. पण एकही व्ही. शांताराम यांना पसंत पडेना…

व्ही. शांताराम त्यांच्या चित्रपटातील गाणे आणि संगिताबद्दल प्रचंड आग्रही असायचे. गीतकार जगदीश खेबुडकर यांना त्यांनी गाणं लिहिण्यास सांगतले. जे गाणं ते लिहियाचं ते शांताराम चांगले म्हणायचे पण मला आते हे नको असे ते म्हणायचं. अशी ४९ गाणी लिहून झाली तर काही उपयोग झाला नाही, तेव्हा खेबुडकर यांनी मी रात्रीपर्यंत लिहितो असे त्यांना म्हणाले. त्यावर व्ही. शांताराम म्हणाले आजचा दिवस जाऊ द्या.सायंकाळी चौपाटीवर फिरुन या. तेथे सुंदर तरुणींना पाहून एखादं गाणं सुचेल असा सल्ला त्यांनी दिला. नंतर त्यांनी मी तुम्हाला रात्री दोन वाजता फोन करतो असेही ते म्हणाले. या रुममध्ये त्यांच्या सोबत संगितकार राम कदम होते. ते रात्री जेवून मस्तपैकी सुरात घोरत झोपले होते. आणि खेबुडकर काय करु कोणते गाणं लिहू असा विचार करत राहिले होते.

Loading...

अखेर रात्री ठरल्या प्रमाणे दोन वाजता व्ही.शांताराम यांचा जगदीश खेबुडकरांना फोन आला. आणि त्यांनी खेबुडकरांना गाणं सुचलं होते.त्यानंतर त्यांनी मुखडा ऐकवण्याची विनंती केली. व्ही.शांताराम यांनी व्वा हेच तर मला हवं होतं. तुम्ही गाण्याच्या खाली तुमची मस्त लांबलचक सही करा असा सल्ला त्यांनी दिल्याचे खेबुडकर यांनी सांगितले.तेवढ्यात झोपलेले संगीतकार राम कदम उठले आणि म्हणाले माझी चाल तयार आहे. मी तुमचं गाणं ऐकले आहे. त्यावर जगदीश खेबुडकर झोपेत तुम्ही चाल कशी लावली, सुरपेटी घेऊन झोपला होतात की काय ? असा सवाल त्यांना केला. हे बैठकीचं गाणं गाजलेल्या तमाशा पट’पिंजरा’ चित्रपटातील होतं.. ‘तुम्हावर केली मी मर्जी बहाल, नका सोडून जाऊ रंग महाल’..या गाण्याची कहाणी जगदीश खेबुडकर यांनी अशी सांगितली.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us