लतादीदी होत्या बिझी, तरीही संगीतकार बधले नाहीत, नंतर अवघ्या 6 रिहर्सलमध्ये तयार झाले मराठीतील हे अजरामर गीत
लता दीदी हे गायकीतील स्वप्नच जणू भारतभूमीला पडले होते. या स्वप्नातून कधी जागेच होऊ नये असे प्रत्येक रसिकाला वाटते. लता दीदींच्या अजरामर गाण्यांचा ठेवा आपल्याकडे ठेवून त्या गेल्या आहेत. अशाच एका गाण्याची ही कहाणी....

मराठी चित्रपटसृष्टीत एकाहून एक मराठी संगीतकार आणि गायक लाभले आहेत. संगीतकार मोठा की गायक मोठा असा वाद नेहमी होत असतो. पूर्वी निर्माता आणि संगीतकारालाच गाण्याची रॉयल्टी मिळायची, परंतू लता दीदींनी हा ट्रेंड बदलून टाकला.गायक आणि संगीतकार एकमेकांना पूरक असतात दोघांच्या मेहनतीतून एखादे गाणे उंचीवर पोहचते. तर आपण अशा एका गाण्याची कहाणी वाचणार आहोत.ज्या गाण्यासाठी लता दीदींकडे वेळच नव्हता. लता दीदींना संगीतकाराने एकच अट घातली या गाण्याची चाल ऐकून तरी पाहा, मग हवे तर नकार द्या.लता दीदी चाल ऐकण्यास तयार झाल्या आणि मराठी चित्रपटसृष्टीतील हे अजरामर गीत तयार झाले. ज्या गाण्यावरुन राजकारणातही वादंग झाला होता..
६० च्या दशकात संगीतकार श्रीनिवास खळे यांनी गायक अरुण दाते यांच्यासमवेत अनेक अवीट गोडीची भाव गीताचा काळ होता. श्रीनिवास खळे यांना शुक्रतारा मंदवारा आणा हात तुझा हातात अन् धुंद ही हवा या गाण्यांसाठी गायक म्हणून लता दीदींचा आवाज हवा होता. पण योग काही जुळून आला नाही. अखेर सुधा मल्होत्रा यांनी आवाज दिला. १९६५ च्या सुमारास पुन्हा खळे यांना लता दीदींच्या आवाजाची गरज लागली. चित्रपट होता ‘जिव्हाळा’ आणि गीतकार होते ग.दि.माडगुळकर. या चित्रपटाच्या गाण्यासाठी लता दीदींना तयार करण्याचा विडाच जणू खळे यांनी उचलला.
लता दीदींनी या गाण्यासाठी वेळ नव्हता. त्यांचे शेड्युल प्रचंड बिझी होते.अखेर श्रीनिवास खळे म्हणाले तुमच्याकडे वेळ नसेल तर तुम्हाला वेळ मिळेत तेव्हा हे गाणे करु, पण गाणे एकदा ऐका तरी. लता दीदींनी अखेर या गाण्याची चाल ऐकवण्यात आली. चाल आणि गाणे लता दीदींना अतिशय आवडले. मग तरीही लता दीदींनी खळे यांना प्रश्न केला की तुम्ही हे गाणे किती दिवसात रेकॉर्ड कराल. त्यानंतर खळे यांनी सहा दिवसात असे उत्तर दिले. लता दीदी म्हणाल्या नक्की ? खळे पुन्हा हो म्हणाले. त्याकाळात आजच्या सारखे आधुनिक स्टुडिओ आणि रेकॉर्डिंगचे तंत्र नव्हते. अखेर सहा दिवसांच्या तालीमीनंतर हे गीत रेकॉर्डही झाले.
हे गीत होते ‘या चिमण्यांनो परत फिरा रे’. ..आजही हे गाणे मराठीतील एक क्लासिक कल्ट साँग आहे. या गाण्यात अतिशय कमी तालवाद्य वापरुन सुरेख चाल आणि गायकी या गाण्यात ऐकायला मिळते. नंतर श्रीनिवास खळे यांनी लता दीदींसोबत अनेक कल्ट गाणी तयार केली. त्यात श्रावणात घन निळा बरसला, भावनांचा तू भूकेला रे मूरारी, जाहल्या काही चूका अशी अजरामर गीते दिली.