Hrithik Roshan : ऋतिक रोशनचा सिंटासाठी पुढाकार, कोरोनाच्या दूसऱ्या लाटेत पुन्हा मदतीचा हात!

| Updated on: Jun 04, 2021 | 12:57 PM

दारिद्र रेषेखालील सदस्यांसाठी रेशन किट देखील प्रदान करणार आहे. या मदतीचा फायदा सिंटाच्या 5 हजार सदस्यांना होणार आहे. (Hrithik Roshan's initiative for CINTAA, helped again in the second wave of Corona!)

Hrithik Roshan : ऋतिक रोशनचा सिंटासाठी पुढाकार, कोरोनाच्या दूसऱ्या लाटेत पुन्हा मदतीचा हात!
Follow us on

मुंबई : बॉलिवूड अभिनेता ऋतिक रोशन (Hrithik Roshan) नेहमीच अनेक कारणांमुळे चर्चेत असतो. आता ऋतिकनं पुन्हा मदतीचा हात पुढे केला आहे. त्यानं पुन्हा एकदा सिने एंड टीवी आर्टिस्ट्स एसोसिएशन (CINTAA) सदस्यांच्या मदतीसाठी पुढाकार घेतला आहे. ऋतिक रोशननं असोसिएशनला 20 लाख रुपयांची देणगी दिली असून दारिद्र रेषेखालील सदस्यांसाठी रेशन किट देखील प्रदान करणार आहे. या मदतीचा फायदा सिंटाच्या 5 हजार सदस्यांना होणार आहे.

अभिनेता ऋतिक रोशनकडून कोरोनाच्या या संकटात दुसऱ्यांदा मदत

अभिनेता ऋतिक रोशन कोरोनाच्या या संकटकाळात गरजू लोकांना पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतोय. सोबतच त्यांना सर्वतोपरी मदत करण्याचा कायम प्रयत्न करत आहे. एवढंच नाही तर कोरोनाच्या पहिल्या लाटेत देखील, ऋतिकनं सिंटा (CINTAA) साठी मदत केली होती. त्यावेळी त्यानं  25 लाखाची आर्थिक मदत केली होती. त्यानं केलेल्या या मदतीमधून सुद्धा 4 हजार दैनंदिन कारागिरांना आणि त्यांच्या कुटुंबांना मदत करण्यात आली होती.

ऋतिककडून अनेक पद्धतीनं मदतीचा हात

या व्यतिरिक्त ऋतिककडून अनेक प्रकारे मदत कार्य सुरू आहे. मुंबई पोलिसांसाठी हँड सॅनिटाइजर्सपासून ते फ्रंट लाइन वॉरिअर्सच्या आरोग्य सुरक्षेमध्ये योगदान  याबरोबरच कोरोना रुग्णांसाठी ऑक्सिजन सिलेंडर आणि कॉसेंट्रेटर्सपर्यंत, ऋतिक अनेक गरजू लोकांची सक्रियपणे मदत करत आहे.

सिंटाचे महासचिव अमित बहल यांनी मानले आभार

ऋतिककडून करण्यात आलेल्या मदतीसाठी त्याचे आभार मानण्यात आले आहेत. या पुढकराविषयी ऋतिक रोशनचे आभार मानताना सिंटा (CINTAA)चे महासचिव, अमित बहल म्हणाले की, ‘ऋतिक रोशनने मागच्या लॉकडाउनच्या वेळेस देखील आमची मदत केली होती. या वेळी, त्यांनी केलेल्या मदतीतून असोसिएशनच्या 5000 सदस्यांचे लसीकरण करण्यात येणार असून दारिद्र रेषेखालील सभासदांना रेशन किट पुरवण्यात येणार आहे.’

संबंधित बातम्या

Lookalike: सुपरस्टार रजनीकांतचा ड्युप्लिकेट बघून तुम्हालाही वाटेल आश्चर्य, अभिनयातही दाखवली जादू

Happy Birthday Ashok Saraf | बँकेची नोकरी ते अभिनयाची आवड, नाटकांमधून कारकिर्दीची सुरुवात करत अशोक सराफांनी गाजवला मोठा पडदा!

SP Balasubrahmanyam Birth Anniversary | इंजिनीअरऐवजी संगीतकार बनले, वाचा ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड’मध्ये नाव कोरणाऱ्या एस.पी. बालासुब्रमण्यम यांचा प्रवास!