Tukaram Mundhe : नाना पाटेकर आले, माझ्या घरी…शोकसभेत तुकाराम मुंढे भावूक, नानांच्या त्या भेटीची आठवण काढली
नाना पाटेकर आणि माझी अधून-मधून भेट होत राहिली. आपल्या माणसांना आपण मदत करू शकत नसू तर आपण कसले माणूस असे नाना पाटेकर म्हणायचे, अशी आठवण तुकाराम मुंढे यांंनी सांगितली.

Tukaram Mundhe : अभिनेते नाना पाटेकर यांचे 8 ऑक्टोबर 2026 रोजी हृदयविकाराच्या झटक्यामुळे निधन झाले. त्यांच्या जाण्याने संपूर्ण बॉलिवूडमध्ये हळहळ व्यक्त करण्यात आली. अमिताभ बच्चन यांच्यापासून ते शाहरुख खानपर्यंत अनेक दिग्गज कलाकारांनी नाना पाटेकर यांच्या कुटुंबाप्रती संवेदना व्यक्त केल्या. दरम्यान, आज मुंबईत नाना पाटेकर यांच्या निधनानंतर शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेला मराठी सिनेसृष्टीतील अनेक दिग्गज कलाकार सहभागी झाली होते. एफडीएचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनीदेखील सभेला उपस्थित राहात नाना पाटेकर यांच्या आठवणी सांगितल्या. यावेळी तुकाराम मुंढे भावूक झाले.
नाना पाटेकर जेव्हा शेतकऱ्यांच्या बांधावर जायचे तेव्हा…
तुकाराम मुंढे यांनी यावेळी नाना पाटेकर यांच्या स्वभाविषयी सांगितले. तसेच नाना पाटेकर सामान्यांना कशी मदत करायचे, याबाबतही त्यांनी सांगितले. “नाना पाटेकर हे रागीट स्वभावाचे वाटायचे. पण नाना पाटेकर जेव्हा दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर जायचे. तेव्हा त्यांचा अभिनय संपायचा आणि त्यांच्यातील माणूस जागा व्हायचा, अशा भावना तुकाराम मुंढे यांनी व्यक्त केल्या.
माझ्या शासकीय निवासस्थानी येत त्यांनी…
तसेच, 2015 साली दुष्काळ पडला होता. तेव्हा मी सोलापूर जिल्ह्याचा जिल्हाधिकारी होतो. तेव्हा नाम संस्थेच्या वतीने नाना पाटेकर आणि अभिनेते मकरंद अनासपुरे सोलापुरात आले होते. मला समजताच मी नाना पाटेकरांना भेटण्याची विनंती केली. माझ्या विनंतीनंतर ते माझ्या कार्यालयात आले होते. माझ्या शासकीय निवासस्थानी येत त्यांनी माझ्यासोबत दुपारचे जेवण केले होते. आमच्या भरपूर गप्पा झाल्या. आमची पहिली भेट होती ती, अशी आठवणही तुकाराम मुंढे यांनी सांगितली.
#WATCH | Mumbai: On the demise of veteran actor Nana Patekar, Maharashtra FDA Commissioner Tukaram Mundhe says, “He was a truly wonderful person. He was a sensitive individual. His views on society were very straightforward. He was a man of great utility and purpose. He was an integral part of society, deeply concerned with how to help others—especially the poor—and how to uplift them… To me, this statement holds the utmost importance… We are trying to follow that same path…”
— ANI (@ANI) October 14, 2026
नाना पाटेकरांची मदत हजारो, लाखो…
नाना पाटेकर आणि माझी अधून-मधून भेट होत राहिली. आपल्या माणसांना आपण मदत करू शकत नसू तर आपण कसले माणूस असे नाना पाटेकर म्हणायचे. नाना पाटेकरांची मदत हजारो, लाखो, कोट्यवधी शेतकऱ्यांपर्यंत गेली, शासन व्यवस्थेतही आपण तेवढी मदत करू शकत नाही, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या. आपल्या भावना व्यक्त करताना यावेळी तुकाराम मुंढे भावुक झाले.
