इब्राहिमचा रोमँटिक अंदाज पाहून सर्वांना सैफची आठवण; इब्राहिम-खुशीचा डान्सला वन्समोअर

इब्राहिम अली खान आणि खुशी कपूर यांचा 'नादानियां' चित्रपटाचा प्रमोशन व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यात इब्राहिमचा रोमँटिक अंदाज पाहून अनेकांना सैफ अली खानची आठवण झाली. व्हिडीओमधील इब्राहिम आणि खुशीचा डान्स चाहत्यांना खूप आवडला आहे.

इब्राहिमचा रोमँटिक अंदाज पाहून सर्वांना सैफची आठवण; इब्राहिम-खुशीचा डान्सला वन्समोअर
| Updated on: Feb 03, 2025 | 8:59 PM

एकीकडे सैफ अली खान हल्ल्यानंतर पुन्हा एकदा उत्साहात कामावर परतला आहे. नेटफ्लिक्स OTT रिलीज होणाऱ्या त्याच्या ज्वेल थीव्हचं प्रमोशन करण्यात तो व्यस्त आहे.तर दुसरीकडे त्याचा लेक इब्राहिम अली खान देखील त्याच्या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त असलेला दिसत आहे.

इब्राहिम अली आणि खुशी कपूर ‘नादानियां’च्या प्रमोशनमध्ये व्यस्त

इब्राहिम अली आणि खुशी कपूर यांचा ‘नादानियां’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. हा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार असून या चित्रपटाचे दिग्दर्शन शौना गौतम करणार आहेत. तर धर्मा प्रॉडक्शन्सद्वारे या चित्रपटाची निर्मिती होणार आहे. चित्रपटाची टीम प्रमोशनसाठी पूर्ण जोर लावताना दिसत आहे.

चित्रपटाच्या पोस्टरला भरभरून प्रतिसाद

दरम्यान या चित्रपटाचे पोस्टरही ही रिलीज करण्यात आलं आहे. पोस्टरला नेटकऱ्यांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. सध्या इब्राहिम अली आणि खुशी कपूर देखील ‘नादानियां’च्या प्रमोशनसाठी व्यस्त आहेत.

प्रत्येक इव्हेटला हे दोघेही हजेरी लावताना दिसत आहे. चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यानचाच एक व्हिडीओ समोर आला आहे. ज्यात इब्राहिम अली आणि खुशी कपूरने त्यांच्या चित्रपटातील एका गाण्यावर डान्सही केला. मात्र त्यांनी त्यांच्या भूमिकांबद्दल फारशी माहिती दिली नाही.

डान्स करताना इब्राहिम आणि खुशीचा रोमँटिक अंदाज

मात्र या व्हिडीओला चाहत्यांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. या व्हिडीओमध्ये इब्राहिम आणि खुशीचा रोमँटिक अंदाज पाहायला मिळाला. तसेच इब्राहिम अलीच्या डान्सची झलक पाहून अनेकांना सैफ अली खानची आठवण झाली. त्याचा हा कूल अंदाज सर्वांच्याच पसंतीस पडला आहे.

‘नादानियां’ हा एक रोमँटिक ड्रामा

‘नादानियां’ हा एक रोमँटिक ड्रामा आहे जो पहिल्या प्रेमाची जादू, वेडेपणा आणि निरागसता दाखवतो. या सर्वांच्या केंद्रस्थानी पिया (खुशी) आहे, जी दक्षिण दिल्लीतील एक धाडसी मुलगी आणि नोएडाचा मुलगा अर्जुन (इब्राहिम) एकमेकांना तेव्हा पहिल्या प्रेमाच्या गोड प्रवासाला सुरुवात होते. अशी माहिती या चित्रपटातील कथेबद्दल निर्मात्यांनी दिली आहे. मात्र टीझर रिलीज होण्याची सर्वजण आतुरतेने वाट पाहत आहेत. टीझरनंतर चित्रपटाची कथा आणि इब्राहिम-खुशीच्या भूमिकांबद्दल अजून माहिती समोर येईल.