AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Imran Khan : मुंबईत आंदोलनादरम्यान धरपकड, आमिर खानचा भाचा पोलिसांच्या ताब्यात, म्हणाला…

Imran Khan : दिल्लीतील सीजेपी आंदोलनाच्या पार्शवभूमीवर मुंबईतही ऑगस्ट क्रांती मैदानावर आंदोलन करण्यात आलं आहे. या आंदोलनात अभिनेता इम्रान खान सहभागी झालेला. मात्र, अभिनेत्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

Imran Khan : मुंबईत आंदोलनादरम्यान धरपकड, आमिर खानचा भाचा पोलिसांच्या ताब्यात, म्हणाला...
| Updated on: Oct 10, 2026 | 6:41 PM
Share

दिल्लीतील जंतरमंतर येथे आयोजित करण्यात आलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मुंबईतील ऑगस्ट क्रांती मैदानावर आंदोलन करण्याचं नियोजन करण्यात आलं होतं. तुषार गांधी यांनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या ‘कॉकरोच जनता पार्टी’च्या (CJP) आंदोलनाला पाठिंबा दिला होता. या पार्श्वभूमीवर त्यांनी नागरिकांना मुंबईतील ऑगस्ट क्रांती मैदानावर एकत्र येण्याचं आवाहन केलं होतं. या आंदोलनात बॉलिवूड अभिनेता इम्रान खानसुद्धा सहभागी झालेला. मात्र, अभिनेत्याला त्याच्या टीमसह पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

काय म्हणाला अभिनेता इम्रान खान?

माध्यमांशी बोलताना इम्रान खान म्हणाला की, ‘माझ्या कोणत्याही मागण्या नाही आहेत. मी एक नागरिक म्हणून आंदोलनाला पाठिंबा द्यायला आलोय. कायम सामान्य जनतेचा आवाज दाबण्याचा प्रयत्न का केला जातो? मी कोणत्याच संस्थेचा भाग नाहीये. त्यामुळे, मी कोणत्याही संस्थेचं प्रतिनिधित्व करत नाही. मी फक्त पाठिंबा द्यायला आलोय.’

आंदोलनाच्या परवानगीवरून वाद

ऑगस्ट क्रांती मैदानावर आंदोलन आयोजित करण्यासाठी आवश्यक परवानगी घेण्यात आली नसल्याचं मुंबई पोलिसांनी सांगितलं. न्यायालयीन निर्देशांनुसार या ठिकाणी आंदोलनास परवानगी देण्यात अडचणी असल्याचंही पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आलं.दुसरीकडे, आंदोलनाच्या आयोजकांनी पोलिसांना ई-मेलद्वारे परवानगीसाठी विनंती केल्याचा दावा केला. मात्र, त्यावर उत्तर मिळालं नसल्याचं त्यांनी म्हटलं. त्यामुळे आंदोलनाच्या परवानगीवरून आयोजक आणि पोलीस यांच्यात मतभेद निर्माण झाल्याचे दिसून आले.

इतर कार्यकर्त्यांवरही कारवाई

या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी इतर काही कार्यकर्त्यांनाही ताब्यात घेतल्याचं वृत्त आहे. ‘कॉकरोच जनता पार्टी’च्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी विविध ठिकाणी नागरिकांना एकत्र येण्याचं आवाहन करण्यात आलं होतं.

दिल्लीतील जंतरमंतर येथे होणाऱ्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईसह अन्य भागांतही पोलिसांनी खबरदारी घेतली होती. तुषार गांधी यांना ताब्यात घेतल्यानंतरही नियोजित आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार आयोजकांनी व्यक्त केला होता. या संपूर्ण घटनेमुळे मुंबईतील आंदोलन, पोलिसांची प्रतिबंधात्मक कारवाई आणि आंदोलनासाठी आवश्यक परवानगीचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.

Follow Us
तुषार गांधींना ताब्यात घेतल्याने राजकीय वातावरण तापलं! आदित्य ठाकरे...
तुषार गांधींना ताब्यात घेतल्याने राजकीय वातावरण तापलं! आदित्य ठाकरे, संजय राऊत पोलीस ठाण्यात दाखल
दिल्लीतील आंदोलकांच्या धरपकडीवर राज ठाकरे आक्रमक; सरकारवर साधला निशाणा
दिल्लीतील आंदोलकांच्या धरपकडीवर राज ठाकरे आक्रमक; सरकारवर साधला निशाणा
कधीकाळी ऐतिहासिक वारसा म्हणून ओळख; चालुक्यकालीन महादेव मंदिर बारव...
कधीकाळी ऐतिहासिक वारसा म्हणून ओळख; चालुक्यकालीन महादेव मंदिर बारव नष्ट होण्याच्या मार्गावर
इथे आजीचं निधन, तिथे अभिजीत दिपके पोलिसांच्या ताब्यात; अंत्यदर्शनाला..
इथे आजीचं निधन, तिथे अभिजीत दिपके पोलिसांच्या ताब्यात; अंत्यदर्शनालाही मुकणार, कुटुंबिय म्हणाले आता...
अरविंद केजरीवाल, सिसोदीया यांना ताब्यात घेतलं, दिल्लीतील आंदोलनात...
मोठी बातमी! अरविंद केजरीवाल, सिसोदीया यांना ताब्यात घेतलं, दिल्लीतील आंदोलनात धरपकड सुरूच
सोलापूरमध्ये दुष्काळाची भीषण स्थिती! 10 तालुक्यांत केंद्रीय पथकाची...
सोलापूरमध्ये दुष्काळाची भीषण स्थिती! 10 तालुक्यांत केंद्रीय पथकाची पाहणी, खरीप पिकांचे मोठे नुकसान
Mamata Banerjee | दिल्ली पोलिसांनी ममता बॅनर्जीना ताब्यात घेतलं
Mamata Banerjee | दिल्ली पोलिसांनी ममता बॅनर्जीना ताब्यात घेतलं, मोठं कारण समोर
नाशिकच्या कांदा उत्पादकांसाठी चिंतेची बातमी! येत्या काळात कांद्याचे दर
नाशिकच्या कांदा उत्पादकांसाठी चिंतेची बातमी! येत्या काळात कांद्याचे दर वाढणार?
कोल्हापूरच्या अंबाबाई दर्शनासाठी हायटेक नियोजन! QR कोड स्कॅन करताच...
कोल्हापूरच्या अंबाबाई दर्शनासाठी हायटेक नियोजन! QR कोड स्कॅन करताच मिळणार 'ही' सुविधा
काँग्रेसच्या काळातील SIRवर आक्षेप का नाही घेतला? - नितेश राणे
Nitesh Rane | काँग्रेसच्या काळातील SIRवर आक्षेप का नाही घेतला? - नितेश राणे