AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सोहेल खानने हॉटेलमध्येच घेतला शेवटचा श्वास, सकाळी नाश्ता केला अन् काही वेळातच… सिनेसृष्टीवर शोककळा

शुटिंगसाठी गेलेल्या सोहेल खान याने हॉटेलमध्येच शेवटचा श्वास घेतला आहे. नष्टा केल्यानंतर तो हॉटेलमध्ये गेला अन् त्यानंतर परतलाच नाही. हॉटेलमध्येच हृदयविकाराचा झटका आल्याने सोहेल खान याने अखेरचा श्वास घेतला आहे. त्याच्या निधनाने सिनेविश्वात शोककळा पसरली आहे.

सोहेल खानने हॉटेलमध्येच घेतला शेवटचा श्वास, सकाळी नाश्ता केला अन् काही वेळातच... सिनेसृष्टीवर शोककळा
sohel khan
| Updated on: Nov 25, 2026 | 7:33 AM
Share

झगमगत्या विश्वातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. बांगलादेशचा लोकप्रिय टीव्ही आणि फिल्म स्टार सोहेल खान आता आपल्यात राहिलेला नाही. सोहेल खान याने मंगळवारी सकाळी या जगातून कायमची एक्झिट घेतली. समोर आलेल्या माहितीनुसार सोहेल खान ‘नसीब’ सिनेमाच्या शुटिंगमध्ये व्यस्त होता. पण शुटिंग दरम्यान असं काही घडलं, त्यानंतर तो पुन्हा घरी आलाच नाही. हॉटेलमध्ये नाष्टा केल्यानंतर अभिनेत्याला हृदय विकाराचा झटका आला आणि त्याने अखेरचा श्वास घेताल. अभिनेत्याच्या निधनानंतर कुटुंबियांवर देखील दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

दिग्दर्शकाने दिली निधाची माहिती…

सोहेल खान याच्या निधनाची माहिती ‘नसीब’ सिनेमाचे दिग्दर्शक आणि निर्माते मोहम्मद इक्बाल यांनी दिला. दिग्दर्शकाने दिलेल्या माहितीनुसार, सोहेल सिनेमाच्या 18 नोव्हेंबर रोजी शुटिंगसाठी आलेला आणि सिनेमाच्या टीमसोबत एका हॉटेलमध्ये थांबलेला.

इक्बाल म्हणाले, ‘सोहेल खान याने सकाळी साडेआठ वाजता ब्रेकफास्ट केला आणि अभिनेता सर्वांसोबत आनंदी होता. त्यानंतर काही वेळातच हॉटेलच्या खोलीत त्याला हृदय विकाराचा झटका आला. प्रकृती खालावल्यानंतर सोहेल याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण तोपर्यंत उशीर झालेला. डॉक्टरांनी सोहेल खान याला मृत घोषित केलं…’

सोहेल खान याने वयाच्या 66 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे. बुधवारी सोहेल सिनेमाचं शुटिंग पूर्ण करणार होता. मंगळवारीच अभिनेत्याने अखेरचा श्वास घेतला… असं देखील दिग्दर्शकाने सांगितलं, दुसरीकडे, अभिनेता शहरियार नाझीम जॉय याने एका सोशल मीडिया पोस्टमध्ये सांगितलं की, त्याने पांढरा शर्ट आणि पांढरी पँट घातली होती. तो शूटिंगसाठी जाणार होता. मात्र, त्यापूर्वीच ही दुःखद घटना घडली.

सोहेल खान याचं करियर

सोहेल खान याच्या करियरबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्याने त्याच्या करियरची सुरुवात ‘बांग्लालिंक’च्या टीव्ही जाहिरातीपासून केली होती. त्यानंतर अभिनेता ‘420’ या कॉमेडी शोमध्ये दिसला. त्यानंतर त्याने कधीच मागे वळून पाहिलं नाही. ‘गुलाब जामुन’, ‘जंगल’, ‘फॅमिली क्रायसिस’ आणि ‘लीडर’ यांसारखे हिट सिनेमे दिले. आता अभिनेत्याला अखेरच ‘नसीब’ सिनेमात पाहता येणार आहे.

Follow Us
काशी नगरी सजली! लक्ष लक्ष दिव्यांनी उजळणार वाराणसी, नमो घाटावर देव...
काशी नगरी सजली! लक्ष लक्ष दिव्यांनी उजळणार वाराणसी, नमो घाटावर देव दिवाळीची जय्यत तयारी
शक्तिपीठ महामार्गाच्या जमीन मोजणीला शेतकऱ्यांचा उद्रेक; अधिकाऱ्यांना..
शक्तिपीठ महामार्गाच्या जमीन मोजणीला शेतकऱ्यांचा उद्रेक; अधिकाऱ्यांना मारहाण, वाहनांची तोडफोड!
जे कुणालाच जमलं नाही ते करून दाखवलं! वैभव सूर्यवंशीची द्विशतकी खेळी
जे कुणालाच जमलं नाही ते करून दाखवलं! बॅट हातात घेतली अन् विक्रमांचा पाऊस पाडला; वैभव सूर्यवंशीची ५२ चेंडूंत द्विशतकी खेळी
धंगेकरांच्या सुचक पोस्टने राजकीय वर्तुळात खळबळ; चंद्रकांत पाटलांनी...
धंगेकरांच्या सुचक पोस्टने राजकीय वर्तुळात खळबळ; चंद्रकांत पाटलांनी मौन का बाळगलं?
नीरा खोऱ्यात पाणी संकट गडद! तीन धरणांमधून पाणी सोडण्यास शेतकऱ्यांचा...
नीरा खोऱ्यात पाणी संकट गडद! तीन धरणांमधून पाणी सोडण्यास शेतकऱ्यांचा तीव्र विरोध
सातारा जिल्हा बँकेवरून महायुतीत जुंपली! जयकुमार गोरेंच्या आरोपांवर...
सातारा जिल्हा बँकेवरून महायुतीत जुंपली! जयकुमार गोरेंच्या आरोपांवर शंभूराज देसाईंचं प्रत्युत्तर
शरद पवार आजही सक्रिय, निवृत्तीची चर्चा करणं...- CM फडणवीस
Sharad Pawar : शरद पवार आजही सक्रिय, निवृत्तीची चर्चा करणं... मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच म्हणाले...
कोकणाची तहान आधी भागवा, मगच मुंबईला पाणी द्या! कोयनेच्या पाण्यावरून...
कोकणाची तहान आधी भागवा, मगच मुंबईला पाणी द्या! कोयनेच्या पाण्यावरून शेखर निकम आक्रमक
शेतकरी आंदोलनात पक्षीय राजकारणाला थारा नाही! रोहित पवारांचं विधान...
शेतकरी आंदोलनात पक्षीय राजकारणाला थारा नाही! रोहित पवारांचा मोठा निर्णय, म्हणाले...
रामदास आठवलेंची प्रकाश आंबेडकरांना मोठी ऑफर! थेट रिपब्लिकन पक्षाचे...
रामदास आठवलेंची प्रकाश आंबेडकरांना मोठी ऑफर! थेट रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्षपद देण्याची तयारी