
सत्तरच्या दशकात आपल्या अभिनयातून चाहत्यांना घायाळ करणाऱ्या अभिनेत्री मौसमी चटर्जी वादाच्या भोवऱ्यात अडकल्या. जेव्हा जावई डिक्की सिन्हा याने मौसमी चटर्जी यांच्यावर गंभीर आरोप लावले. डिक्की सन्हा म्हणाला, मौसमी चटर्जी यांनी लेकीच्या निधनानंतर तिचं तोंड देखील पाहिलं नाही आणि अंत्यसंस्काराला देखील आले नाहीत. तेव्हा हे प्रकरण कोर्टात पोहोचलं. मौसमी चटर्जी यांनी नुकताच झालेल्या एका मुलाखतीत लेक पायल हिला गमावण्याचं दुःख व्यक्त केलं. पायलच्या सासरच्या मंडळींनी तिचं रुग्णालयाचं बिल देखील भरलं नव्हतं आणि अभिनेत्रीच्या लेकीचा मृतदेह शवगृहात ठेवण्यात आलेला. एवढंच नाही तर, मौसमी चटर्जी यांच्या पतीला देखील अपमान सहन करावा लागलेला.
मौसमी चटर्जी यांची 45 वर्षांच्या लेकीचं 2019 निधन झालं. मौसमी चटर्जी यांची लेक पायल हिला डायबीटीजने ग्रस्त होती. पायल बराच काळ आजारी होती आणि तिच्या मृत्यूपूर्वी दोन वर्षे कोमात होती. मुलाखतीत, मौसमी म्हणाल्या, कुटुंब अजूनही मुलगी गमावण्याच्या दुःखातून सावरलेलं नाही. अभिनेत्रीने जावई डिक्की सिन्हा आणि त्याच्या कुटुंबाशी असलेल्या मतभेदांबद्दल देखील सांगितले.
मुलाखतीत मौसमी म्हणाल्या, ‘मला नाही वाटत की पायलचे वडीलांनी आजही लेकीच्या निधनाचं सत्य मान्य केलं आहे. ते अनेकदा रात्री झोपेतून उठतात आणि पायलच्या नावाने ओरडत असतात. मी देखील माझ्या लेकीला विसरु शकलेली नाही. ही पोकळी आयुष्यभर राहील. आपण या दुःखातून सावरू शकत नाही. जेव्हा एखाद्याच्या लेकाचं निधन होतं तेव्हा कोणीही कुटुंब ते दुःख सावरू शकत नाही. पायल मेघाबद्दल खूप प्रेमळ होती कारण त्यांच्यात आठ वर्षांचा फरक होता.’
‘पायलच्या सासरच्या मंडळींनी कधी आम्हाला आमच्या लेकीला भेटू देखील दिलं नाही. याचा माझ्या लहान मुलीवर वाईट परिणाम झाला. पायलच्या सासरच्या मंडळींनी माझ्या पतीचा देखील अपमान केला.’ असं देखील
मौसमीची मुलगी पायलने व्यावसायिक डिक्की सिन्हाशी लग्न केलं. मौसमी आणि डिक्कीचे कुटुंब व्यवसायिक भागीदार होते. परंतु व्यवसायात झालेल्या तोट्यामुळे दोन्ही कुटुंबांमधील संबंध बिघडले. त्या काळात पायल कोमात गेली. त्यानंतर 2018 मध्ये, मौसमीने तिचा जावई डिक्की सिन्हा विरुद्ध पायलची योग्य काळजी घेत नसल्याची तक्रार दाखल केली. यावर डिक्की सिन्हा याने मौसमी विरुद्ध मानहानीचा खटला दाखल केला आणि त्यामध्ये जावयाचा विजय झाला.
डिक्की याने मौसमी यांच्यावर अनेक आरोप केलं. पण सर्व आरोपांना मौसमी यांनी फेटाळलं आणि म्हणाले, ‘मी रुग्णालयात पोहोचली तेव्हा पायलचं निधन झालं होतं. तिला शवगृहात ठेवलं होतं कारण रुग्णालयाचं बिल कोणीच भरलं नव्हतं. या घटनेवरुन कळतं की जगात किती प्रकारचे लोकं राहतात.’