बिग बॉस प्रोजेक्ट हेडचा मोठा खुलासा, शोमध्ये अभिनेत्रीचा आत्महत्येचा प्रयत्न, 3 तास बाथरुममध्ये…
Bigg Boss Show: जेव्हा बिग बॉसच्या घरात अभिनेत्रीने केला स्वतःला संपवण्याचा प्रयत्न, 3 तास बाथरुममध्ये होती बंद त्यानंतर..., बिग बॉस प्रोजेक्ट हेडचा मोठा खुलासा

Bigg Boss Show: भारतातील वादग्रस्त शो ‘बिग बॉस’ कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. आता ‘बिग बॉस 19’ शोची लवकरच सुरुवात होणार आहे. शोचे अपडेट्स देखील आता हळूहळू समोर येवू लागले आहे. पण नुकताच झालेल्या एका मुलाखतीत बिग बॉसच्या प्रोजेक्ट हेडने धक्कादायक खुलासा केला आहे. बिग बॉसचे प्रोजेक्ट हेट अभिषेक मुखर्जी सध्या तुफान चर्चेत आहेत. गेल्या 17 वर्षांच्या अनुभवात घडलेली एक धक्कादायक गोष्ट त्यांनी सांगितली आहे. बिग बॉसमध्ये एका अभिनेत्रीने आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला होता. बॉयफ्रेंडसोबत ब्रेकअप झाल्यामुळे अभिनेत्रीने आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय घेतला.
यावेळी अभिनेत्री नाव आणि बिग बॉसच्या कोणत्या सीझनमध्ये ही धक्कादायक घटना घडली… याबद्दल काहीही सांगण्यात आलेलं नाही. अभिषेक याने बिग बॉसला आवाज देणाऱ्या विजय सिंग यांच्या पॉडकास्टमध्ये सांगितलं, ‘बिग बॉस रिजिनलमध्ये एक स्पर्धक आली होती. बिग बॉसमध्ये येण्याआधी तिचं ब्रेकअप झालं होतं. ब्रेकअपमुळे अभिनेत्रीने बिगबॉसमध्ये येण्याचा निर्णय घेतला होता.’
‘शोच्या दरम्यान अभिनेत्रीचा अन्य स्पर्धकावर जीव जडला. पण जेव्हा अभिनेत्रीला कळलं की तो स्पर्धक तिची फसवणूक केली आहे तेव्हा अभिनेत्रीने रात्रभर स्वतःला बाथरुममध्ये बंद करुन ठेवण्यात आलं होतं. आपण शोमध्ये आहोत… हे देखील अभिनेत्रीच्या लक्षात नव्हतं.’
पुढे अभिषेक म्हणाला, ‘प्रोजेक्ट टीमला जेव्हा कळलं तेव्हा ते तात्काळ सेटवर पोहोचले. सेटवर कायम डॉक्टर उपस्थित असतात. तेव्हा टीमने डॉक्टरांना तेथे बालावलं. तेव्हा टीमने जवळपास रात्री 3.30 पासून पहाटे 6.45 पर्यंत त्या अभिनेत्रीची समज काढण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर मेडिकल कारण देत स्पर्धक अभिनेत्रीला बिग बॉसमधून बाहेर काढण्यात आलं.’ सांगायचं झालं तर, बिग बॉस अनेक अनेक स्पर्धकांमध्ये प्रेम बहरतं पण घराबाहेर आल्यानंतर ते ब्रेकअपची घोषणा करतात.
‘बिग बॉस’चा 19 वा सीझन कधी येणार?
रिपोर्ट्समध्ये असा दावा करण्यात आला होता की ‘बिग बॉस 19’ यंदा ऑक्टोबरमध्ये नाही तर 19 जुलैपासून सुरू होणार आहे, पण त्याची कोणीही पुष्टी केलेली नव्हती, मात्र आता ताज्या रिपोर्ट्सनुसार, ‘बिग बॉस 19’ या सीझनची प्रसतावित तारीख समोर आली असून तो 3 ऑगस्टपासून सुरू होऊ शकतो अशी चर्चा आहे. एवढंच नाही तर, या सीनमध्ये कोणताही YouTuber किंवा Instagram इन्फ्लुएंसर्स या शोचा भाग नसतीला, असाही दावा करण्यात आला हे.
