
नुकताच क्रिकेटर केएल राहुल याने मोठा खुलासा केलाय. आपल्याला आजही एका गोष्टीची प्रचंड भीती वाटत असल्याचे केएल राहुल याने म्हटले. केएल राहुल आणि हार्दिक पांड्या हे काही वर्षांपूर्वी करण जोहर याच्या चॅट शोमध्ये पोहोचले होते. यावेळी केएल राहुल याने असे काही भाष्य केले होते की, त्याच्यावर जोरदार टीका करण्यात आली. फक्त टीकाच नाही तर थेट त्याला भारतीय क्रिकेट टीममधून काही दिवसांसाठी निलंबित देखील करण्यात आले. मोठा वाद त्यानंतर बघायला मिळाला. आता त्यावरच पहिल्यांदा बोलताना केएल राहुल हा दिसलाय.
नुकताच दिलेल्या मुलाखतीमध्ये केएल राहुल म्हणाला की, ती मुलाखत खूप जास्त वेगळी होती आणि त्यानंतर सर्वच काही बदलून गेले. मला खरोखरच लाज वाटत होती. त्यावेळी मी टीममधून निलंबित झालो होतो. मला माझ्या शाळेच्या आयुष्यातही कधीच कोणतीही शिक्षा मिळाली नव्हती. यामुळे मला हे कळत नव्हते की, परिस्थितीला नेमके कसे सामोरे जाऊ.
2019 मध्ये केएल राहुल आणि हार्दिक पांड्या हे करण जोहरच्या चॅट शोमध्ये पोहोचले होते. यावेळी त्यांनी असे काही भाष्य केले होते की, ते लोकांना अजिबातच आवडले नव्हते. लोकांनी त्यांचा जोरदार विरोध केला. हा विषय इतका जास्त वाढला होता की, त्यांना टीममध्ये निलंबित करण्यात आले.
फक्त निलंबितच नाही तर करण जोहर याच्या शोचा तो एपिसोड देखील सोशल मीडियावरून हटवण्यात आला. आता त्याच वादाबद्दल बोलताना केएल राहुल हा दिसतोय. हेच नाही तर केएल राहुल याने हे देखील मान्य केले की ते चुकीचे होते. त्यावेळी केएल राहुल याच्या समस्यांमध्ये चांगलीच वाढ झाली होती.
लोक सतत केएल राहुल याच्यावर टीका करताना दिसले. केएल राहुल हा मोठ्या संपत्तीचा मालक आहे. मुंबईमध्ये अत्यंत आलिशान असे घर देखील केएल राहुल याचे आहे. काही दिवसांपूर्वीच केएल राहुल याची पत्नी आणि अभिनेता सुनील शेट्टीची लेक अथिया शेट्टी हिने त्यांच्या घराची खास झलक आपल्या चाहत्यांना दाखवली होती.