सानिया मिर्झाला पश्चाताप? थेट म्हणाली, विचित्र लोकांच्या घरी केले लग्न, अखेर ते विधान..

सानिया मिर्झा हे नाव गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत असणारे एक नाव आहे. सानिया मिर्झाची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग बघायला मिळते. विशेष म्हणजे सानिया मिर्झा ही सध्या तिच्या खासगी आयुष्यामुळेही चर्चेत आहे. नुकताच सानिया मिर्झा ही कपिल शर्माच्या शोमध्ये पोहचली.

सानिया मिर्झाला पश्चाताप? थेट म्हणाली, विचित्र लोकांच्या घरी केले लग्न, अखेर ते विधान..
Sania Mirza
| Updated on: Jun 10, 2024 | 10:55 AM

सानिया मिर्झा हे गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत असणारे एक नाव आहे. सानिया मिर्झाची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग बघायला मिळते. सानिया मिर्झाच्या खासगी आयुष्यात मोठे वादळ आल्याचे बघायला मिळाले. सानिया मिर्झाचा पती आणि पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिक याने काही दिवसांपूर्वीच लग्न केले. हेच नाही तर या लग्नाचे फोटोही त्याने सोशल मीडियावर शेअर केले. शोएब मलिक याचे हे तिसरे लग्न आहे. पाकिस्तानी अभिनेत्रीसोबत शोएबने लग्न केले. सानिया मिर्झा आणि शोएब मलिकमधील वाद टोकाला गेल्याचे देखील सांगितले जातंय.

सानिया मिर्झा हिच्यासोबत घटस्फोट घेतल्यानंतर शोएब मलिक याला सोशल मीडियावर खडेबोल सुनावले गेले. लोक सतत त्याला टार्गेट करताना देखील दिसले. सानिया मिर्झा हिने शोएब मलिक याच्या लग्नानंतर काही पोस्ट सोशल मीडियावर शेअर केल्या. सानिया मिर्झाच्या या पोस्ट पाहून तिला शोएब मलिकच्या लग्नाचा धक्का बसल्याचे दिसत होते.

घटस्फोटानंतर सानिया मिर्झा ही चांगलीच सक्रिय झाल्याचे बघायला मिळतंय. सानिया मिर्झा ही नुकताच कपिल शर्मा याच्या शोमध्ये पोहचली. विशेष म्हणजे यावेळी सानिया मिर्झा ही कपिल शर्मा याच्यासोबत धमाल करताना दिसली. सानिया मिर्झा ही सुनेच्या भूमिकेत तर कपिल शर्मा हा सासूच्या भूमिकेत दिसला. यावेळी दोघे धमाका करताना दिसले.

कपिल शर्मा हा सासू म्हणून सानिया मिर्झा हिला चहा आणण्यास सांगतो. चहा आणण्यास उशीर होतो, म्हणून सानिया मिर्झाला (सुनेला) खडेबोल सुनावताना कपिल शर्मा (सासू) दिसते. यावेळी चक्क सानिया मिर्झा म्हणते की, विचित्र लोकांच्या घरी लग्न मी केले. म्हणजेच लग्न करून सानिया मिर्झाला पश्चाताप होताना दिसतोय.

आता सानिया मिर्झा हिच्या याच विधानाची जोरदार चर्चा रंगताना दिसत आहे. भलेही सानिया मिर्झा हे मस्तीमध्ये म्हटली. परंतू आता सानिया मिर्झा हिच्या याच विधानाची जोरदार चर्चा ही रंगताना दिसत आहे. सानिया मिर्झा ही आज कोट्यवधी संपत्तीची मालकीन आहे. सानिया मिर्झा आणि शोएब मलिक यांचा एक मुलगा देखील आहे. लग्नानंतर सानिया मिर्झा ही दुबईमध्ये शिफ्ट झाली होती. मात्र,आता परत भारतामध्ये सानिया मिर्झा परतली आहे.