इंदिरा गांधी यांची सून असती कपूर कुटुंबाची लेक, पण का जुळले नाहीत संबंध? तुम्हाला माहितीये आतली गोष्ट…
कपूर कुटुंबाची लेक आपली सून असावी... इंदिरा गांधी यांची प्रबळ इच्छा का नाही झाली पूर्ण, का नाही जुळले कपूर आणि गांधी कुटुंबियांचे संबंध? तुम्हाला माहिती नसेल आतली गोष्ट...

सिनेविश्वातील सेलिब्रिटी आणि राजकारणी व्यक्ती यांच्यातील मैत्री आणि नाती अत्यंत सामान्य गोष्य आहे. पण तुम्हाला माहिती आहे, कपूर आणि गांधी कुटुंबियांची देखील चांगली मैत्री होती? ही गोष्ट फार कमी लोकांना माहिती आहे की, 60 व्या दशकाच्या शेवटच्या काही वर्षांची ही गोष्ट आहे, सांगायचं झालं तर, देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी आणि राज कपूर यांच्यामध्ये मैत्री आणि आदराचं नातं होतं. इंदिरा गांधी या नात्याला प्रचंड सन्माम देत होत्या आणि याच कारणामुळे राज कपूर यांनी मोठी मुलगी ऋतू कपूर आपल्या कुटुंबाची सून व्हावी अशी इच्छा इंदिरा गांधी यांची होती. ज्येष्ठ जर्नलिस्ट रशाद किदवाई यांनी लिहिलेल्या ‘नेता अभिनेता : बॉलिवूड स्टार पॉवर इन इंडियन पॉलिटिक्स’ या पुस्तकात इंदिरा गांधी यांच्या या इच्छेचा उल्लेख करण्यात आला आहे…
रशीद यांनी पुस्तकात लिहिल्यानुसार, इंदिरा गांधी आणि राज कपूर यांच्यामध्ये चांगली मैत्री होती आणी याच मैत्रीचं रुपांतर नात्यात व्हावं अशी देखील त्यांची इच्छा होती. राजीव गांधी यांचं लग्न राज कपूर यांची मोठी मुलगी ऋतू कपूर यांच्यासोबत झालं पाहिजे… अशी इंदिरा गांधी यांची इच्छा होती. रशीद यांनी पुस्तकात असं देखील लिहिलं आहे की, सून बॉलिवूड विश्वातील हवी असे इंदिरा गांधी यांचे विचार नव्हते. फक्त राज कपूर यांच्यासोबत असलेल्या मैत्रीच्या नात्यामुळे हे लग्न व्हावं असं त्यांना वाटत होतं. पण तसं काहीही घडलं नाही… कारण राजीव गांधी यांच्या आयुष्यात सोनिया गांधी यांची एन्ट्री झाली होती.
राजीव गांधी यांनी केलं सोनिया गांधी यांच्यासोबत लग्न
राजीव गांधी ब्रिटेन याठिकाणी शिक्षण पूर्ण करण्यासाठी गेले होते. तेव्हाच त्यांची ओळख सोनिया गांधी यांच्यासोबत झाली आणि दोघांनी लग्न केलं. फेब्रुवारी 1968 मध्ये राजीव गांधी आणि सोनिया गांधी यांनी लग्न केलं. या लग्नानंतर हैदराबाद हाउसमध्ये भव्य पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. पार्टीमध्ये राजीव गांधी यांचे शाळेतील आणि कॉलेजमधील मित्र उपस्थित होते. तर दुसरीकड, राज कपूर यांची लेक ऋतू यांचे लग्न उद्योजक राजन नंदा यांच्यासोबत झालं..
कपूर कुटुंब
कपूर कुटुंबाबद्दल सांगायचं झालं तर, राज कपूर यांची तीन मुलं रणधीर कपूर, राजीव कपूर आणि ऋषी कपूर यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. पण यश आणि प्रसिद्धी फक्त ऋषी कपूर यांना मिळाली. तर दोन मुली ऋतू आणि रीमा झगमगत्या विश्वापासून दूर राहिल्या. त्यांनी त्यांचा संपूर्ण वेळ कुटुंबाला दिला. राज कपूर यांच्या मुलांपैकी ऋषी, राजीव आणि ऋतू यांचं निधन झालं आहे. तर ऋषी कपूर यांचा मुलगा आणि अभिनेता रणबीर कपूर बॉलिवूडमध्ये सक्रिय आहे. आता त्यांची लेक रिद्धिमा हिने देखील बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे. तर रणधीर कपूर यांच्या मुली करिश्मा आणि करीना यांनी तर बॉलिवूडमध्ये एक काळ गाजवला आहे. दोघी कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात.