karan Johar Party Video : आता करण जोहरच्या पार्टीचा व्हिडीओ व्हायरल, 'शिरोमणी'च्या आमदाराची NCB कडे तक्रार

चित्रपट निर्माता करण जोहरने होस्ट केलेल्या एका पार्टीत अनेक दिग्गज कलाकारांनी हजेरी लावली होती. (NCB to investigate Karan Johars party video )

karan Johar Party Video : आता करण जोहरच्या पार्टीचा व्हिडीओ व्हायरल, 'शिरोमणी'च्या आमदाराची NCB कडे तक्रार

मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणानंतर अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. या प्रकरणाच्या तपासात ड्रग्ज अँगल समोर आल्यानंतर NCB म्हणजेच नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने या संबंधित तपास हाती घेतला आहे. या तपासात ड्रग्ज कनेक्शनमध्ये बॉलिवूडच्या अनेक कलाकारांची नावे समोर येत आहेत. यात आता एक वर्ष जुन्या व्हिडीओसंदर्भात चौकशी करण्याची मागणी केली जात आहे. (NCB to investigate Karan Johars party video)

चित्रपट निर्माता करण जोहरने होस्ट केलेल्या एका पार्टीत अनेक दिग्गज कलाकारांनी हजेरी लावली होती. याच पार्टीमधला एका व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. या व्हिडीओमध्ये निर्माता-दिग्दर्शक करण जोहर, अभिनेता विक्की कौशल, शाहिद कपूर, दीपिका पादुकोण, मलायका अरोरा, अर्जुन कपूर आणि वरुण धवनसह अनेक कलाकार दिसून आले होते.

या पार्टीमध्ये या सर्व कलाकारांनी अमली पदार्थांचे सेवन केले असल्याचा दावा शिरोमणी अकाली दलाचे आमदार मनजिंदर सिंह सिरसा यांनी केला आहे. एव्हढंच नाही तर त्यांनी एनसीबीच्या अध्यक्षांची भेट घेतली आहे.

मनजिंदर सिंह सिरसा यांनी ट्विटरवरुन ही माहिती दिली. या ट्विटमध्ये त्यांनी “मी एनसीबीचे अध्यक्ष राजेश अस्थाना यांची भेट घेतली असून, व्हायरल झालेल्या व्हिडीओमधील पार्टीचे आयोजन केल्याप्रकरणी करण जोहर आणि इतरांविरुद्ध चौकशीची मागणी मी अस्थाना यांना केली आहे” असे म्हटलं.

त्यांनी आणखी एक ट्विट करत हा व्हिडीओ पुन्हा एकदा शेअर केला आहे. “हा व्हिडीओ आठवा, या व्हिडीओमध्ये दिसणारे चेहरे लवकरच एनसीबीच्या कार्यालयाबाहेर दिसतील ” असेही मनजिंदर सिंह म्हणाले.

बॉलिवूड ड्रग्ज कनेक्शनमध्ये आतापर्यंत अभिनेत्री रकुलप्रित, सारा अली खान यांच्याही नावांची चर्चा आहे. अभिनेत्री रिया चक्रवर्तीच्या चौकशीत ही नावे समोर आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

(NCB to investigate Karan Johars party video)

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *