
Shilpa Shetty and Raj Kundra : अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि पती राज कुंद्रा यांच्या अडचणींमध्ये दिवसागणिक वाढ होताना दिसत आहे… आता शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा विरोधात दाखल गुन्ह्यात आयपीसी कलम 420 जोडला असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे याप्रकरणी अभिनेत्रीची अधिक कसून चौकशी होईल असं देखील कळत आहे… मुंबई पोलीस आर्थिक गुन्हे शाखेने अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांच्या विरोधात 60 कोटी रुपयांच्या कथित फसवणूक प्रकरणात भारतीय दंड संहितेच्या कलम 420 अंतर्गत लावला
शिल्पा आणि राज यांच्या विरोधात दाखल करण्यात आलेल्या एफआयआरमध्ये भारतीय दंड संहितेच्या (आयपीसी) कलम 420 अंतर्गत फसवणुकीचा गंभीर आरोप लावून त्यांच्यावरील कारवाई अधिक तीव्र केली आहे. उद्योजक दीपक कोठारी यांच्या तक्रारीवरून हा एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
तपासादरम्यान समोर आलेल्या तथ्यांच्या आधारे, ईओडब्ल्यूने आयपीसीचे हे कठोर कलम जोडले आहे आणि या घडामोडीबद्दल संबंधित दंडाधिकाऱ्यांना योग्यरित्या माहिती दिली आहे… असं वक्तव्य दीपक कोठारी यांच्या कायदेशीर प्रतिनिधींनी जारी केलेल्या निवेदनात केलं आहे. एवढंच नाही तर, प्रकरणाचा तपास लागत नाही तोपर्यंत न्यायालयाने शिल्पा शेट्टी आणि कुटुंबाली परदेशात जाण्यासाठी बंदी घातली आहे.
संविधानात प्रत्येक गुन्हावर कायदा सांगण्यत आला आहे. त्यापैकी एक म्हणजे 420… या कायद्याचा अर्थ एखाद्या व्यक्तीची फसवणूक करणं, अप्रामाणिकपणं मालमत्ता मिळवणं किंवा अप्रामाणिकपणं कोणतीही मालमत्ता हस्तांतरित करणं याच्याशी संबंधित आहे.
शिल्पा शेट्टी आणि कुंद्रा यांच्याबद्दल सांगायचं झालं तर, ही पहिली वेळ नाही जेव्हा दोघे वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. याआधी देखील अनेकदा शिल्पा आणि राज यांना कोर्टाची पायरी चढवी लागली आहे. पॉर्नोग्राफी प्रकरणामुळे वादाच्या भोवऱ्यात असलेल्या राज याला जवळपास महिनाभर तुरुंगात राहावं लागलं. पण याप्रकरणी त्याची जामिनावर सुटका झाली. त्यानंतर अनेकदा संपत्तीमुळे देखील राज आणि शिल्पा वादाच्या भोवऱ्यात अडकलेले… सध्या सर्वत्र शिल्पा – राज यांच्या वादग्रस्त प्रकरणांची चर्चा सुरु आहे.