Arjun Malaika | ‘हे दोघं 100% एकमेकांशी भांडून आले आहेत’; अर्जुन-मलायकाच्या व्हिडीओवर कमेंट्सचा पाऊस

मलायकाने 2017 मध्ये अरबाज खानला घटस्फोट दिला. या दोघांना 20 वर्षांचा अरहान हा मुलगा आहे. विभक्त झाल्यानंतरही मुलासाठी या दोघांना नेहमीच एकत्र आल्याचं पाहिलं गेलं.

Arjun Malaika | हे दोघं 100% एकमेकांशी भांडून आले आहेत; अर्जुन-मलायकाच्या व्हिडीओवर कमेंट्सचा पाऊस
Arjun Kapoor and Malaika Arora
Image Credit source: Instagram
| Updated on: Mar 05, 2023 | 12:17 PM

मुंबई : अभिनेता अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा ही बॉलिवूडमधील सर्वाधिक चर्चेत राहणाऱ्या जोड्यांपैकी एक आहे. विविध कार्यक्रमांमध्ये आणि पार्ट्यांमध्ये हे दोघं अनेकदा एकत्र दिसतात. तर सोशल मीडियावर दोघं एकमेकांविषयी मोकळेपणे प्रेम व्यक्त करताना दिसतात. मात्र नुकताच या दोघांचा असा व्हिडीओ व्हायरल होतोय, ज्यामुळे अर्जुन-मलायकामध्ये काहीतरी बिनसल्याची चर्चा सुरू झाली आहे. रिया कपूरच्या बर्थडे पार्टीला या दोघांनी एकत्र हजेरी लावली होती. एकाच कारमधून एकत्र येताना पापाराझींनी हा व्हिडीओ शूट केला. मात्र कारमध्ये अर्जुन आणि मलायका ज्याप्रकारे बसले होते, त्यावरून नेटकऱ्यांमध्ये चर्चेला उधाण आलं आहे.

नेमकं काय घडलं?

अर्जुन आणि मलायका नेहमीच पापाराझींना एकत्र फोटोसाठी पोझ देतात. तर कधी एकमेकांचा हात पकडून चालताना दिसतात. मात्र यावेळी त्यांचा वेगळाच अंदाज पहायला मिळाला. व्हायरल व्हिडीओमध्ये हे दोघं त्यांच्या कारमध्ये बसलेले दिसत आहेत. मात्र एकीकडे मलायकाच्या चेहऱ्यावरील नाराजी स्पष्ट दिसतेय. तर दुसरीकडे अर्जुन त्याच्या डोक्यावर हात ठेवून बसला होता. हे पाहून दोघांमध्ये काहीतरी बिनसल्याची चर्चा सुरू आहे.

अर्जुन आणि मलायका यांच्यामध्ये काहीतरी भांडण झालं असावं, असा अंदाज नेटकरी वर्तवत आहेत. ‘आपापसांत भांडलात का’, असा सवाल एका युजरने केला. तर ‘असं वाटतंय की दोघांमध्ये खूप मोठं भांडण झालंय आणि त्यामुळे अर्जुनचं डोकं दुखतंय’, असं दुसऱ्याने लिहिलं आहे. ‘हे जर खरं प्रेम आहे तर दोघं आनंदी का नाहीत’, असाही प्रश्न नेटकऱ्याने केला. तर ‘नक्कीच दोघांमध्ये भांडण झालंय’, असं काहींनी म्हटलंय.

पहा व्हिडीओ

मलायकाने 2017 मध्ये अरबाज खानला घटस्फोट दिला. या दोघांना 20 वर्षांचा अरहान हा मुलगा आहे. विभक्त झाल्यानंतरही मुलासाठी या दोघांना नेहमीच एकत्र आल्याचं पाहिलं गेलं. अरहान अमेरिकेत फिल्म मेकिंगचं शिक्षण घेतोय. विमानतळावर त्याला सोडायला जाताना किंवा तो परतल्यावर त्याला आणायला जाताना नेहमीच मलायका आणि अरबाजला एकत्र पाहिलं जातं. ‘मूव्हिंग इन विथ मलायका’ या तिच्या शोमध्येही मलायकाने अरबाजचा उल्लेख केला होता. अपघातानंतर त्याने कशी साथ दिली, याविषयीही ती मोकळेपणे व्यक्त झाली होती.

अर्जुन कपूरसोबतच्या रिलेशनशिपमुळे मलायकाला अनेकदा ट्रोलिंगचा सामना करावा लागला. या दोघांच्या वयातील अंतरामुळे नेटकऱ्यांनी त्यांची खिल्ली उडवली तर कधी टीका केली. आपल्या शोमध्ये स्टँडअप कॉमेडी करताना मलायका ट्रोलर्सना उपरोधिक उत्तर दिलं होतं. “दुर्दैवाने मी फक्त वयाने मोठी नाही तर माझ्यापेक्षा छोट्या व्यक्तीला डेट करतेय. माझ्यात हिंमत आहे. मी त्याचं आयुष्य उद्ध्वस्त करतेय, बरोबर बोलली ना? मी सर्वांना सांगू इच्छिते की मी त्याचं आयुष्य उद्ध्वस्त करत नाहीये”, असं ती म्हणाली होती.