जेठालाल आणि बबिताने 17 वर्षांनंतर सोडली ‘तारक मेहता’ मालिका? चर्चांना उधाण
‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ मालिकेच्या नुकताच प्रदर्शित झालेल्या भागामुळे बबिता आणि जेठालाल एग्झिट घेणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. यावर निर्मात्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

सर्वात जास्त काळ चालणारा कॉमेडी शो ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ याचा ट्रॅक सध्या खूपच रंजक झाला आहे. ‘भूतनी’च्या एपिसोडमध्ये गोकुळधाम सोसायटीतील अनेकजण दिसले नाहीत. यात जेठालाल आणि बबीता जी यांचाही समावेश आहे. यामुळे चाहते चिंतेत पडले आणि सोशल मीडियावर असे म्हटले जात आहे की कदाचित या दोघांनी शोला अलविदा तर केले नाही ना? गेल्या काही वर्षांत तारक मेहता शोमधून अनेक कलाकारांनी एग्झिट घेतली आहे. जेठालाल आणि बबीता जी यांनी शो सोडल्याच्या चर्चांवर मेकर्सनी प्रतिक्रिया दिली आहे.
जेठालाल आणि बबीता जी यांनी शोला अलविदा केले का?
खरं तर, प्रेक्षकांना ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’च्या नवीनतम ट्रॅकमध्ये जेठालाल आणि बबीता जी दिसले नाहीत. त्यांच्या शोमधील अनुपस्थितीमुळे चाहते अस्वस्थ झाले आहेत. एबीपी न्यूजच्या एका अहवालानुसार, प्रोडक्शन हाऊसने स्पष्ट केले आहे की, मुनमुन दत्ता अजूनही मालिकेचा हिस्सा आहे. तसेच, जेठालालदेखील शोमध्ये आहे. शोमध्ये दाखवण्यात आले की, बबीता जी अय्यरसोबत महाबळेश्वरला सुट्ट्यांसाठी गेली आहे, तर जेठालाल एका बिझनेस ट्रिपवर आहे. याशिवाय, नवीनतम ट्रॅकमध्ये डॉक्टर हत्ती आणि मिसेस हत्तीही दिसले नाहीत.
वाचा: नव्या बाबा वेंगाच्या भविष्यवाणीने जग हादरलं, 80 टक्के फ्लाइट्स बुकिंग रद्द
View this post on Instagram
तारक मेहता का उल्टा चश्मामध्ये चकोरीची एन्ट्री
तारक मेहता का उल्टा चश्माच्या मेकर्सनी एक प्रोमो शेअर केला होता, ज्यामध्ये त्यांनी चकोरी नावाच्या नव्या पात्राची ओळख करून दिली. ती पोपटलालशी एका विहिरीपाशी बोलताना दिसते. पोपटलाल तिला सांगतो की, त्याला लहानपणापासूनच विहीर खूप आवडते. पोपटलाल म्हणतो की, त्यांच्या दोघांच्या आवडी किती जुळतात. तो तिच्या बोलण्यात हरवून जातो. पोपटलालला शोधत गोकुळधामच्या महिला तिथे येतात आणि चकोरी घाबरते.
