AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sara Tendulkar: सर्वच मुली जे सांगणं टाळतात, ते सचिनची कन्या असं बोलून गेली…

Sara Tendulkar: सारा आणि क्रिकेटपटू शुभमन गिलच्या डेटिंगच्या मध्यंतरी चर्चा होत्या. या अफवांनंतर गिलने आपण सिंगल असल्याचा दावा केला होता. गिलने इन्स्टावर लोकांशी संवाद साधला होता. तेव्हा एका प्रश्नाला उत्तर देताना त्याने हा दावा केला होता.

Sara Tendulkar: सर्वच मुली जे सांगणं टाळतात, ते सचिनची कन्या असं बोलून गेली...
सर्वच मुली जे सांगणं टाळतात, ते सचिनची कन्या असं बोलून गेली...Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Aug 27, 2022 | 3:27 PM
Share

मुंबई: मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) यांची मुलगी सारा तेंडुलकर (Sara Tendulkar) नेहमी काही ना काही कारणामुळे चर्चेत असते. सोशल मीडियावर (social media) सतत सक्रिय असल्याने ती नेहमीच चर्चेत असते. सोशल मीडियावरील तिच्या फोटोंना नेटकऱ्यांचा चांगला प्रतिसादही मिळत असतो. तिचे इन्स्टाग्रामवरील डान्सचे फोटो तर नेहमीच चर्चेत असतात. सारा तेंडुलकरची लाईफस्टाईल प्रचंड ग्लॅमरस आहे. तिने तिच्या इन्स्टावर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. त्यात तिने तिच्या मनातील एक गोष्ट जाहीर केली आहे. खरंतर ही तिच्या एकटीच्या मनातील गोष्ट नाही. तर तिच्या वयातील सर्वच मुलींच्या मनातील ही गोष्ट आहे. सेलिब्रिटी असूनही तिने ही गोष्ट शेअर करून सर्वच मुलींच्या भावनाच जणू काही सोशल मीडियावर व्यक्त केल्या आहेत. त्यामुळे तिच्या या व्हिडीओला चांगला प्रतिसादही मिळत आहे.

सारा नेमकं काय म्हणाली?

साराने या व्हिडीओत ती लग्न कधी करणार आहे, याचा खुलासा केला आहे. इन्स्टाग्रामवर तिने हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. त्यात ती तिची मैत्रीण अलिशासोबत दिसत आहे. आपल्या मैत्रीणीवर भरपूर पैसे खर्च करत असल्याचं तिनं म्हटलं आहे. आपल्या मैत्रीणीच्या आधीच लग्न करणार असल्याचंही तिने म्हटलं आहे. आपली राहणीमान अत्यंत साधी असल्याचंही तिने या व्हिडीओत म्हटलं आहे. सारा या व्हिडीओत मनमोकळेपणाने बोलताना दिसत आहे. साराचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

सोशल मीडियावर अॅक्टिव्ह

सारा सोशल मीडियावर प्रचंड अॅक्टिव्ह असते. तिचे इन्स्टाग्रामवर 2.2 मिलियन फॉलोअर्स आहेत. तिने मॉडेलिंगच्या क्षेत्रात पाऊलही ठेवलं आहे. ती बॉलिवूडमध्येही येण्याची शक्यता आहे. तिने नुकतीच क्लोदिंग ब्रॉन्डसाठी मॉडेलिंग केली होती. त्यामुळे ती चर्चेत आली होती. साराने गिफ्टसह तिचा फोटो इन्स्टावर टाकला आहे. त्यावर तिचे फॅन्स कमेंटचा पाऊस पाडत आहेत. एका यूजर्सने मस्त म्हटलंय. तर दुसऱ्याने क्या बात है, असं म्हणत दाद दिली आहे.

ब्रेकअपच्या चर्चा

सारा आणि क्रिकेटपटू शुभमन गिलच्या डेटिंगच्या मध्यंतरी चर्चा होत्या. या अफवांनंतर गिलने आपण सिंगल असल्याचा दावा केला होता. गिलने इन्स्टावर लोकांशी संवाद साधला होता. तेव्हा एका प्रश्नाला उत्तर देताना त्याने हा दावा केला होता. गिल आणि साराने इन्स्टावर एकमेकांना अनफॉलो केल्याचा अनेक मीडियांचा दावा आहे.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.