AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sunny Kaushal : कतरिनाच्या बहिणीसोबत सनी कौशलचं जुळलं? इसाबेलसोबत डेटिंगच्या चर्चांना उधाण

Sunny Kaushal : अभिनेता विकी कौशलचा भाऊ सनी कौशल हा त्याच्या करिअरमुळे आणि पर्सनल लाइफमुळेही चर्चेत आहे. अभिनेत्री शर्वरीशी त्याचं बऱ्याच काळापूर्वी त्याचं ब्रेकअप झालं होतं. आता त्याचं नाव कतरिनाच्या बहिणीशी जोडलं जात आहे.

Sunny Kaushal : कतरिनाच्या बहिणीसोबत सनी कौशलचं जुळलं? इसाबेलसोबत डेटिंगच्या चर्चांना उधाण
| Updated on: Sep 19, 2026 | 3:57 PM
Share

Sunny Kaushal : फिल्म इंडस्ट्रीमधल्या अशा अनेक जोड्या आहेत, जी जोडपी आता एकत्र नाहीत. पण ते जेव्हा रिलेशनमध्ये होते तेव्हा चाहत्यांच्या फेव्हरिट लिस्टमध्ये होते. या लिस्टमध्ये विकी कौशलचा भाऊ आणि अभिनेता सनी कौशल (Sunny Kaushal) याच्याही नावाचा समावेश आहे. त्याच्या प्रोफेशनल आयुष्याप्रमाणेच पर्सनल आयुष्याची देखील बरीच चर्चा असते. त्याच्या डेटिंगच्या चर्चा पुन्हा सुरू झाल्या आहेत. जवळपास 6 वर्ष डेट केल्यानंतर गेल्यावर्षी फेब्रुवारी 2025 मध्ये सनी कौशल आणि शर्वरी वाघ हे दोघे वेगळे झाले. त्यांनी कधीच आपल्या रिलेशनबद्दल खुलेपणाने भाष्य केले नाही, त्यांचं नातं कबूल केलं नाही पण ते दोघे वेगळे झाल्यावर मात्र सोशल मीडियावर खूपच चर्चा झाली. आता सनी कौशल पुन्हा चर्चेत आला असून तो त्याची वहिनी, अभिनेत्री कतरिना कैफ (Katrina Kaif) हिची बहीण इसाबेल कैफ (Isabelle Kaif) हिला डेट करतोय अशा जोरदार चर्चा सुरू झाल्या आहेत. पण अचानक हा मुद्दा चर्चेत कसा आला ?

खरं तर ब्रेकअपच्या चर्चांदरम्यान सनी कौशलच्या नव्या अफेअरच्या अफवा सुरू झाल्या आहेत. विकी कौशल आणि कतरिना कैफ यांच्या लग्नानंतर कतरिनाची बहीण इसाबेलही प्रत्येक सणाला कुटुंबासोबत दिसते. मात्र, त्याव्यतिरिक्त काही सिमीलर फोटोंनीही लक्ष वेधून घेतलं आहे, जे दोघांनी आपापल्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केले होते.

इसाबेलला डेट करतोय सनी कौशल?

सनी कौशल आणि इसाबेल कैफ यांच्या तुर्की व्हेकेशनचे फोटो समोर आल्यानंतर या डेटिंगच्या चर्चांना सुरुवात झाली. चाहते दोघांच्या सोशल मीडिया पोस्टवर बारकाईने लक्ष ठेवत असतात. अशातच यूजर्सना दोघांच्या पोस्टमधील ठिकाणं, बॅकग्राउंड आणि व्हेकेशनच्या काही गोष्टी एकसारख्या असल्याचं आढळलं. त्यामुळे कदाचित दोघांनी एकत्र व्हेकेशन एन्जॉय केली असावी, असा अंदाज व्यक्त होत आहे.

मात्र, आतापर्यंत इसाबेलने किंवा सनी कौशल या दोघांपैकी कोणीच या डेटिंगच्या अफवांवर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. दोघं अनेकदा कुटुंबासोबतही दिसले होते. पण यापूर्वी त्यांच्या डेटिंगबाबत दोघांकडूनही असं काहीही सांगण्यात आलं नव्हतं. ते फक्त मित्रही असू शकतात, असंही काहींचं म्हणणं आहे. मात्र, बहुतेक लोकांनी त्यांच्या डेटिंगबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत.

सनी-शर्वरीचं नातं

खरं तर 2020 मध्ये ‘द फॉरगॉटन आर्मी’ या वेबसीरिजच्या शूटिंगदरम्यान सनी कौशल आणि शरवरी वाघ यांचं नातं सुरू झालं होतं. याच सीरिजच्या सेटवर दोघांची पहिली भेट झाली होती. मीडिया रिपोर्ट्सनुसार, एकत्र काम करताना दोघांची चांगली मैत्री झाली आणि पुढे या मैत्रीचं प्रेमात रूपांतर झालं. मात्र, 2025 मध्ये त्यांच्या ब्रेकअपच्या बातम्या समोर आल्या. नुकत्याच आलेल्या एका रिपोर्टमध्ये असा दावा करण्यात आला होता की, शरवरीच्या वेगाने वाढणाऱ्या करिअरमुळे सनी कौशलला असुरक्षित वाटू लागलं होतं. त्यामुळे त्यांच्या नात्यात दुरावा निर्माण झाला.

Follow Us
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं...
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम...
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम पावसाचा पर्याय
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, ‘डिजिटल सापळ्यात...
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, 'डिजिटल सापळ्यात’ नागरिकांना अडकवले
नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी
Nanded | नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी
दुष्काळ आढावा बैठकीत बदाम खाणारे संजय जाधव पत्रकारांवरच संतापले...
Nanded | दुष्काळ आढावा बैठकीत बदाम खाणारे संजय जाधव पत्रकारांवरच संतापले...
8 ते 10 दिवस थांबा, सर्व बाहेर येईल, सतीश सालियांन यांच्या सुचक...
8 ते 10 दिवस थांबा, सर्व बाहेर येईल, सतीश सालियांन यांच्या सुचक विधानाचा अर्थ काय?
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू-बदामावरून संजय शिरसाट संतापले; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदामावरून संजय शिरसाट संतापले; म्हणाले, आम्ही बदनाम...
शेतकऱ्यांची पिकं दुष्काळामुळे करपली अन् आढावा बैठकीत नेत्यांचा बदामावर
शेतकऱ्यांची पिकं दुष्काळामुळे करपली अन् आढावा बैठकीत नेत्यांचा काजु-बदामावर ताव
सर्वोच्च न्यायालयाची NTA ला पेपरफुटीप्रकरणी कडक ताकीद, उपाययोजनांची तप
सर्वोच्च न्यायालयाची NTA ला वरंवार पेपरफुटीप्रकरणी कडक ताकीद, उपाययोजनांची तपासणी
दिशा सालियान प्रकरण अपघात म्हणून मिटलं तरी... संजय राऊतांचां दावा
दिशा सालियान प्रकरण अपघात म्हणून मिटलं तरी... संजय राऊतांच्या मोठ्या दाव्याने खळबळ