‘तासंतास विनाकारण रडायचे’, बॉलिवूड अभिनेत्री डिलीवरीनंतर पोस्टपार्टम डिप्रेशनमध्ये, नक्की काय असतो हा त्रास?
बॉलिवूडमधील एक कपल पुन्हा एकदा आई-बाब झाले आहेत. या अभिनेत्रीने सोशल मीडियावर आनंदाची बातमी शेअर केली आहे. मात्र याचवेळी अभिनेत्रीने तिच्या पहिल्या डिलीव्हरीनंतरचा अनुभवही सांगितला. ती डिलीव्हरीनंतर पोस्टपार्टम डिप्रेशन होती. यात तिला कसा त्रास झाला हे देखील तिने सांगितले आहे.

बॉलिवूडमधील एक कपल पुन्हा एकदा आई-बाब झाले आहेत. या अभिनेत्रीने सोशल मीडियावर आनंदाची बातमी शेअर केली आहे. तिच्या घरी एका गोंडस मुलीचा जन्म झाला आहे. ही बातमी समोर येताच सोशल मीडियावर अभिनंदनाचा वर्षाव झाला आहे. या जोडीला अभिनेत्यांसोबतच त्यांचे चाहतेही सोशल मीडियावर त्यांना खूप शुभेच्छा देत आहेत. मात्र पहिल्या डिलीवरीनंतर अभिनेत्री पोस्टपार्टम डिप्रेशनमध्ये होती. त्याचाही खुलासा तिने केला होता.
ही अभिनेत्री झाली दुसऱ्यांदा आई या अभिनेत्रीचं नाव आहे दृश्यम अभिनेत्री इशिता दत्ता. खरंतर, काही महिन्यांपूर्वी इशिता आणि वत्सल सेठ यांनी सोशल मीडियावर घोषणा केली होती की ते लवकरच पुन्हा आई-बाब होणार आहेत. इशिता दत्ताने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर हॉस्पिटलमधील एक हृदयस्पर्शी फोटो शेअर केला आहे, या फोटोमध्ये ती आणि वत्सल त्यांची मुलगी आणि मोठा मुलगा वायुसोबत दिसत आहेत. जरी त्यांनी अद्याप त्यांच्या मुलीचा चेहरा उघड केलेला नाही. इशिताने या फोटोसोबत एक गोंडस कॅप्शन देखील दिले आहे, “दोन ते चार हृदये एकत्र धडधडत आहेत. आमचे कुटुंब आता पूर्ण झाले आहे. देवाने आम्हाला एका सुंदर मुलीचा आशीर्वाद दिला आहे.” असं म्हणत तिने तिचा आनंद व्यक्त केला आहे.
पोस्टपार्टम डिप्रेशनमध्ये होती अभिनेत्री मात्र पहिल्या डिलीव्हरीनंतर झालेला त्रास ती कधीही विसरू शकत नाही. त्याचा उल्लेख करत ती म्हणाली ‘यावेळी अनुभव इतकाही वाईट नव्हता’ पहिल्या डिलीव्हरीनंतरच्या 15 दिवसांनी इशिता पोस्टपार्टम डिप्रेशनमध्ये होती. इशिताने तिच्या भावना व्यक्त करताना म्हटलं होतं की, ‘आज मी प्रसूतीनंतर नैराश्याबद्दल बोलणार आहे. पण इथे अनेक महिला टीका करतील की आम्ही 5-5 मुलांना जन्म दिला आहे. आम्हाला असे काहीही अनुभवलेले नाही. हे सर्व आजचे फॅड आहेत. पण मला माफ करा. पण मी तर यातून गेले आहे. मी फक्त हवेत बोलत नाही आहे. मला ते जाणवले आहे. म्हणून कृपया जर तुमची मुलगी, सून किंवा मैत्रीण भावनिक वाटत असेल तर तिला समजून घ्या’.
View this post on Instagram
तासन् तास विनाकारण रडायची इशिता पुढे म्हणाली ‘अशा अनेक महिला आणि माता आहेत ज्या यातून गेल्या आहेत आणि आताही जात आहेत. माझ्यासोबतही असे घडले आहे. मी तासन् तास विनाकारण रडत असे. मला खूप वाईट वाटायचे. पण जेव्हा माझ्या कुटुंबाने मला पाहिले तेव्हा त्यांनी मला बाहेर जाण्यास सांगितले, काही वेळ विश्रांती घेण्यास सांगितले. जरी ते फक्त 10 मिनिटांसाठी का असेनात.’
पतीने खूप साथ दिली
इशिताने सांगितले की, या काळात तिचा पती आणि अभिनेता वत्सल सेठने तिला खूप साथ दिली आहे. अभिनेत्री म्हणाली की “तो मला बाहेर घेऊन जायचा. पण कधीकधी मी जात नसे कारण मला माझ्या मुलाला सोडायचे नव्हते. पण वत्सल कसा तरी मला पटवून देत असे आणि मला बाहेर काढत असे. तो म्हणायचा की घरात इतरही लोक आहेत जे वायुची काळजी घेतील.” इशिताने तिचा अनुभव सांगत इतरांनाही सल्ला दिला की असा अनुभव जर कोणत्या महिलेला येत असेल तर तिच्या घरच्यांनी तिला समजून घ्यावं.
