Jaat Review: सनी देओलची जबरदस्त कामगिरी; 3 सीन्स पाहून व्हाल थक्क, जिंकली प्रेक्षकांची मनं

सनी देओलचा 'जाट' हा चित्रपट पाहिलेल्यांनी सोशल मीडियावर प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे. 'गदर 2'नंतर सनी देओलने पुन्हा एकदा प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. या चित्रपटातील त्याच्या कामगिरीचं सोशल मीडियावर खूप कौतुक होत आहे.

Jaat Review: सनी देओलची जबरदस्त कामगिरी; 3 सीन्स पाहून व्हाल थक्क, जिंकली प्रेक्षकांची मनं
Jaat
Image Credit source: Instagram
| Updated on: Apr 10, 2025 | 1:09 PM

अभिनेता सनी देओलचा बहुप्रतिक्षित ‘जाट’ हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. चाहत्यांना गेल्या दोन वर्षांपासून सनी देओलच्या या चित्रपटाची प्रतीक्षा होती. 2023 मध्ये ‘गदर 2’सारख्या ब्लॉकबस्टर चित्रपटानंतर आता सनीचा दुसरा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांमध्ये बरीच क्रेझ होती. परंतु ॲडव्हान्स बुकिंगमध्ये फक्त 37 हजार तिकिटं विकली गेली होती. त्यावरून ओपनिंग डेला फारशी कमाई होणार नाही असा अंदाज वर्तवला जात होता. हे आता पहिल्या दिवसाच्या कलेक्शनचे आकडे समोर आल्यानंतरच स्पष्ट होईल. परंतु सध्या सोशल मीडियावर ‘जाट’ला कसा प्रतिसाद मिळतोय, ते पाहुयात..

सनी देओलचा ‘जाट’ पाहिल्यानंतर प्रेक्षकांनी एक्स (ट्विटर) अकाऊंटवर प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे. थिएटरमधील काही व्हिडीओसुद्धा सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यामध्ये प्रेक्षक आनंदाने नाचताना आणि टाळ्या वाजवताना दिसत आहेत. ‘माझं वाक्य लिहून घ्या.. हा चित्रपट सर्व रेकॉर्ड मोडून काढणार. या चित्रपटाचा पूर्वार्ध ॲक्शन आणि भावनांनी परिपूर्ण आहे. मध्यांतरानंतर संपूर्ण थरार पहायला मिळतो’, असं एकाने लिहिलंय. तर ‘अमेरिकेतही नाचण्यापासून स्वत:ला रोखू शकलो नाही. मजा आली. सिकंदरचं दु:ख विसरून गेलोय. सनी पाजीचा नेहमीच चाहता राहीन’, असं दुसऱ्याने म्हटलंय.

’80 आणि 90 च्या दशकातील सनी देओल परत आलाय’, अशाही प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिल्या आहेत. सोशल मीडियावरील या सकारात्मक प्रतिक्रियांचा पुढे चित्रपटाच्या कमाईवरही चांगला परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ‘जाट’ हा चित्रपट जवळपास 200 कोटींच्या बजेटमध्ये बनला आहे. यामध्ये सनी देओलसोबत रणदीप हुड्डा, रम्या कृष्णन, उपेंद्र लिमये, विनीत कुमार सिंह, उर्वशी रौतेला, रेजिना कॅसेंड्रा यांच्याही भूमिका आहेत.

‘गदर 2’च्या ब्लॉकबस्टर यशानंतर सनी देओलचा हा पहिला चित्रपट प्रदर्शित होतोय. 200 कोटी रुपये बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटासाठी सनी देओलने 42 वर्षांमध्ये सर्वाधिक फी आकारली आहे. सनी देओलने या चित्रपटातील भूमिकेसाठी 50 कोटी रुपये मानधन स्वीकारल्याची माहिती समोर येत आहे. ‘गदर 2’नंतर सनी देओलचं नशीब फळफळलं आहे. याचाच फायदा घेत त्याने ‘जाट’साठी तगडं मानधन घेतलं आहे.