जॅकी श्रॉफवर 1 – 2 नाही इतक्या कुटुंबियांची जबाबदरी, प्रत्येक भिकाऱ्याकडे अभिनेत्याचा फोन नंबर कारण…

Jackie Shroff: ... म्हणून जॅकी श्रॉफने मुंबईतील प्रत्येक भिकारी आणि फुटपाथवरील मुलाला दिलाय स्वतःचा फोन नंबर..., जॅकी श्रॉफवर 1 - 2 नाही इतक्या कुटुंबियांची जबाबदरी कारण..., सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अभिनेत्याची चर्चा

जॅकी श्रॉफवर 1 - 2 नाही इतक्या कुटुंबियांची जबाबदरी, प्रत्येक भिकाऱ्याकडे अभिनेत्याचा फोन नंबर कारण...
| Updated on: Apr 21, 2025 | 3:01 PM

Jackie Shroff: झगमगत्या विश्वात असे अनेक स्टार आहेत जे गरिबीतून प्रसिद्धीझोतात आले. पण त्यांनी कधीच भूतकाळासोबत असलेलं त्यांचं नातं मोडलं नाही. अभिनेत्री जॅकी श्रॉफ देखील अशाच अभिनेत्यांपैकी एक आहेत. जॅकी श्रॉफ यांचं बालपण फार गरिबीत गेलं. अभिनेत्याचं कुटुंब मुंबईतील एका चाळीत राहत होतं. तेथे सात लहान – लहान इमारती आणि फक्त तीन बाथरूम होते. तिथे एक लहान खोली होती जिथे जॅकी आणि संपूर्ण कुटुंब राहत होतं. परिस्थिती अशी होती की रात्री झोपताना उंदीर बोटांना चावायचे. हे स्वतः जॅकी श्रॉफने एका मुलाखतीत सांगितलं आहे.

घरात गरिबी अशात जॅकी श्रॉफ यांनी प्रचंड मेहनत घेतली. पण एकदा बस स्टँडवर जॅकी श्रॉफ उभे असताना त्यांनी दिग्दर्शक सुभाष घाई यांनी पाहिलं आणि ‘हिरो’ सिनेमात काम करण्याची संधी दिली. त्यानंतर जॅकी श्रॉफ यांनी कधीच मागे वळून पाहिलं नाही. आज जॅकी श्रॉफ कुटुंबासोबत आनंदी आणि रॉयल आयुष्य जगत आहे.

बघता – बघता जॅकी श्रॉफ यांनी प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेता म्हणून स्वतःची ओळख निर्माण केलं. पण अभिनेता कधीच स्वतःचा भूतकाळ विसरला नाही. ज्या गरिबीच्या छायेत अभिनेता वाढला आणि यशस्वी होण्याचं स्वप्न पाहिलं, ती गरिबीही जॅकी श्रॉफ विसरला नाही. जॅकी श्रॉफ यांनी स्वतः गरिबीमुळे खूप त्रास सहन केला असल्याने, त्यांना त्याचं दुःख चांगलं समजतं.

गरिबीची जाणीव असल्यामुळे आज 100 कुटुंबियांची जबाबदारी जॅकी श्रॉफ यांनी घेतली आहे. गरिबांना मदत करण्यासाठी त्यांचं नानावटी रुग्णालयात खाते आहे, ज्यामध्ये ते पैसे जमा करतात आणि ते गरीब लोकांच्या उपचारांसाठी वापरतात.

जॅकी श्रॉफ स्वतःच्या कमाईतील 50 टक्के रक्कम गरिबांना आर्थिक मदत करण्यासाठी खर्च करतात आणि हे एकदा जॅकी श्रॉफ यांची पत्नी आयशाने सिमी ग्रेवालच्या चॅट शोमध्ये उघड केलं होतं. आयशाने सांगितले होतं की, जॅकी स्वतः गरीब आणि बेरोजगार असतानाही तो तिच्याकडून पैसे घेऊन भिकाऱ्यांना द्यायचा.

मुंबईतील तीन बत्ती वाळकेश्वर भागात जिथे जॅकी श्रॉफ त्यांच्या कुटुंबासह एका खोलीच्या घरात राहत होते ते पाली हिलमधील प्रत्येक भिकाऱ्यापर्यंत, प्रत्येक भिकाऱ्याकडे अभिनेत्याचा फोन नंबर आहे. फूटपाथवर राहणाऱ्या प्रत्येक मुलाकडे त्यांचा नंबर आहे.

फूटपाथवर राहणारे म्हणतात की, ‘जॅकी दादाने सांगितंल आहे की, रात्री भूक लागली तर मला फोन करा मी जेवण पाठवतो… कोणत्याही वेळी मला मदतीसाठी बोलवा मी येईल… त्यामुळे आम्हाला जेव्हा गरज भासते तेव्हा आम्ही जॅकी दादाला फोन करतो…’