Jackie Shroff Wife : जॅकी श्रॉफची पत्नी आयेशाची फसवणूक, लाखो रुपयांची फसवणूक झाल्याचा केला दावा

अभिनेता जॅकी श्रॉफची पत्नी आयेशा श्रॉफ यांची लाखो रुपयांची फसवणूक झाली आहे. याप्रकरणी अभिनेत्रीने तक्रार दाखल केली असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

Jackie Shroff Wife : जॅकी श्रॉफची पत्नी आयेशाची फसवणूक, लाखो रुपयांची फसवणूक झाल्याचा केला दावा
| Updated on: Jun 09, 2023 | 5:49 PM

Jackie Shroff Wife : चित्रपट अभिनेता जॅकी श्रॉफची पत्नी (Jackie Shroff wife) आणि अभिनेता टायगर श्रॉफची आई आयेशा श्रॉफची (Ayesha Shroff) लाखो रुपयांची फसवणूक झाली आहे. या प्रकरणी त्यांनी मुंबईतील सांताक्रूझ पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. ॲलन फर्नांडिस नावाच्या व्यक्तीने त्यांची ५८ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी पोलिसांनी ॲलन फर्नांडिस नावाच्या व्यक्तीविरुद्ध भादंवि कलम ४२०, ४०८, ४६५, ४६७ आणि ४६८ नुसार गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे मुंबई पोलिसांनी सांगितले.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, ॲलन यांची एमएमए मॅट्रिक्स कंपनीमध्ये 2018 मध्ये डायरेक्टर ऑफ ऑपरेशन्स म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. एमएमए मॅट्रिक्स जिम हे टायगर श्रॉफ आणि त्याची आई आयेशा यांच्या मालकीचे आहे.

भारतात आणि भारताबाहेर 11 टूर्नामेंट आयोजित करण्यासाठी आरोपींनी खूप पैसे घेतल्याचे बोलले जात आहे. यामध्ये डिसेंबर 2018 ते जानेवारी 2023 पर्यंत कंपनीच्या बँक खात्यात 58,53,591 रुपये शुल्क म्हणून जमा करण्यात आले. मात्र, आयेशा श्रॉफच्या बाजूने अद्याप याबाबत काहीही सांगण्यात आलेले नाही.

 

पैशांवरून साहिल खान याच्याशीही झाला होता वाद

आयेशा श्रॉफ हिचा अभिनेता आणि इन्फ्लुएन्सर साहिल खानसोबतही पैशांवरून वाद झाला आहे. 2015 मध्ये आयेशा श्रॉफने साहिल खानविरुद्ध फसवणूक आणि गुन्हेगारी धमकीचा आरोप करत तक्रार दाखल केली होती. 4 कोटी रुपयांचे हे प्रकरण नंतर परस्पर वाटाघाटीद्वारे निकाली काढण्यात आले आणि एफआयआर रद्द करण्यात आला.

आयेशा श्रॉफ ही तिच्या काळातील अभिनेत्री आणि मॉडेल होती. लहान वयातच ती जॅकी श्रॉफच्या प्रेमात पडला आणि दोघांनी लग्न केले. लग्नानंतर आयेशा मोठ्या पडद्यापासून दूर राहिली होती. आयेशाने नंतर निर्माती म्हणूनही काम केले आणि अनेक चित्रपटांची निर्मिती केली.