Jacqueline Fernandez: चौकशीदरम्यान जॅकलिन-पिंकीमध्ये बाचाबाची; शिवीगाळपर्यंत पोहोचलं प्रकरण

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: |

Updated on: Sep 15, 2022 | 6:31 PM

या चौकशीत सुकेश चंद्रशेखरची (Sukesh Chandrashekhar) सहकारी पिंकी इराणीलाही (Pinky Irani) पोलिसांसमोर हजर करण्यात आलं. सुकेश चंद्रशेखरप्रकरणी या दोघींना समोरासमोर बसवून त्यांची चौकशी करण्यात आली.

Jacqueline Fernandez: चौकशीदरम्यान जॅकलिन-पिंकीमध्ये बाचाबाची; शिवीगाळपर्यंत पोहोचलं प्रकरण
Jacqueline Fernandez: चौकशीदरम्यान जॅकलिन-पिंकीमध्ये बाचाबाची
Image Credit source: Instagram

अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसला (Jacqueline Fernandez) काल म्हणजेच 14 सप्टेंबर रोजी मनी लाँड्रिंग प्रकरणात EOW (इकॉनॉमिक ऑफेन्स सेल) कार्यालयात चौकशीसाठी बोलावण्यात आलं होतं. या चौकशीत सुकेश चंद्रशेखरची (Sukesh Chandrashekhar) सहकारी पिंकी इराणीलाही (Pinky Irani) पोलिसांसमोर हजर करण्यात आलं. सुकेश चंद्रशेखरप्रकरणी या दोघींना समोरासमोर बसवून त्यांची चौकशी करण्यात आली. पिंकी इराणीच्या माध्यमातून जॅकलिन आणि सुकेश यांचा संपर्क झाला होता. बुधवारी झालेल्या सुमारे आठ तासांच्या या चौकशीदरम्यान जॅकलिन आणि पिंकी यांच्यात अधिकाऱ्यांसमोर शाब्दिक बाचाबाची झाल्याचं कळतंय.

आर्थिक गुन्हे शाखेच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जेव्हा जॅकलिन आणि पिंकीची समोरासमोर चौकशी केली जात होती, तेव्हा ते जवळपास दोन तास वाद घालत होते. या दोघींनी एकमेकींवर आरोपदेखील केले. पिंकीने जॅकलिनवर आरोप केला की, ती सुकेशकडून सतत महागड्या भेटवस्तू स्वीकारत होती. पिंकीने सांगितलं, “जॅकलिनला माहीत होतं की सुकेश 200 कोटींच्या फसवणुकीच्या आरोपाखाली तुरुंगात शिक्षा भोगत आहे. तरीही ती भेटवस्तू स्वीकारत होती.” पिंकी हे आरोप करत असताना जॅकलिनने तिच्यावर खोटं बोलल्याचा आरोप केला. सुकेशच्या पार्श्‍वभूमीची मला कोणतीच कल्पना नव्हती असं तिने सांगितलं.

चौकशीदरम्यान दोघींनी एकमेकींना शिवीगाळही केली. अखेर त्यानंतर पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला. आठ तासांनंतर ही चौकशी संपली. आता गरज पडल्यास जॅकलिनला ईओडब्ल्यूकडून चौकशीसाठी बोलावण्यात येईल. या दोघींनाही पुढील चौकशीसाठी बोलावलं जाऊ शकतं.

हे सुद्धा वाचा

जॅकलिन आणि पिंकीच्या आधी अभिनेत्री नोरा फतेहीलही मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात समन्स बजावण्यात आलं होतं. या प्रकरणात या दोन अभिनेत्रींशिवाय इतरांचीही नावं समोर आली आहेत. नोराने सप्टेंबर-ऑक्टोबर 2021 मध्ये ईडीकडे आपला जबाब नोंदवला आहे.

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI