AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Jana Nayagan Cast Fees: शेवटचा चित्रपट म्हणून अक्षरश: निर्मात्यांचा खिसा कापला; सुपरस्टारच्या मानधनाचा आकडा वाचून व्हाल थक्क!

करिअरमधल्या शेवटच्या चित्रपटासाठी या सुपरस्टारने भरभक्कम मानधन स्वीकारलं आहे. या चित्रपटात बॉबी देओल आणि पूजा हेगडे यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका असून येत्या 9 जानेवारी रोजी तो थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.

Jana Nayagan Cast Fees: शेवटचा चित्रपट म्हणून अक्षरश: निर्मात्यांचा खिसा कापला; सुपरस्टारच्या मानधनाचा आकडा वाचून व्हाल थक्क!
साऊथ सुपरस्टारImage Credit source: Facebook
| Updated on: Jan 07, 2026 | 2:02 PM
Share

अभिनयातून राजकारणाकडे वळलेल्या साऊथ सुपरस्टार थलपती विजयच्या करिअरमधील शेवटचा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्याच्या या चित्रपटाचं नाव ‘जन नायकन’ असून यानंतर तो पुन्हा कोणताच चित्रपट करणार नाही. समाजकार्य आणि राजकारण यावर पूर्णपणे लक्ष केंद्रीत करण्यासाठी त्याने असा निर्णय घेतला आहे. एकीकडे या चित्रपटाविषयी प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता असताना थलपती विजयने त्याच्या करिअरमधील शेवटच्या चित्रपटासाठी तगडं मानधन घेतलं आहे. अक्षरश: त्याने निर्मात्यांचा खिसाच कापला आहे, असं म्हणायला हरकत नाही. नुकताच या चित्रपटाचा बहुचर्चित ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला असून त्याला दमदार प्रतिसाद मिळाला. थलपती विजयचा दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत मोठा चाहतावर्ग आहे. त्यामुळे त्याच्या करिअरमधला शेवटचा चित्रपट म्हटल्यावर, चाहते आपसूकच गर्दी करतील, असा विश्वास निर्मात्यांना आहे. म्हणून त्यांनीही अभिनेत्याची ही मागणी पूर्ण केली आहे.

‘मूव्ही तमिळ’ या एक्स अकाऊंटवर ‘जन नायकन’चा एकूण बजेट आणि त्यातील कलाकारांच्या मानधनाविषयीची माहिती देण्यात आली आहे. ‘जन नायकन’चा बजेट 380 कोटी रुपये आहे. हा सर्वांत तगडा बजेट असलेल्या तमिळ चित्रपटांपैकी एक आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन करण्यासाठी एच. विनोद यांना 25 कोटी रुपये आणि संगीत दिग्दर्शक अनिरुद्ध रविचंदरला 13 कोटी रुपये मानधन मिळालं आहे. ‘जन नायकन’मध्ये बॉलिवूड अभिनेता बॉबी देओल आणि पूजा हेगडे यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. परंतु बॉबी आणि पूजाला तुलनेनं फारच कमी मानधन मिळालं आहे. या दोघांना फक्त 3 कोटी रुपयांवरच समाधान मानावं लागलं आहे.

थलपती विजयने त्याच्या करिअरमधील शेवटच्या चित्रपटासाठी तब्बल 220 कोटी रुपये मानधन स्वीकारल्याचं कळतंय. तर याआधी GOAT (Greatest Of All Time) या चित्रपटाला त्याला 200 कोटी रुपये मिळाले होते. त्याआधी 2023 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘वारिसु’साठी थलपती विजयला 110 ते 125 कोटी रुपयांदरम्यान मानधन मिळालं होतं. तर ‘लियो’साठी त्याने 120 कोटी रुपये स्वीकारले होते.

‘जन नायकन’साठी सर्वांत कमी फी अभिनेत्री ममिता बैजूला मिळाल्याचं समजतंय. तिला फक्त 60 लाख रुपये मिळाले आहेत. ‘मूव्ही तमिळ’ने दिलेल्या माहितीनुसार शूटिंगदरम्यान 48 कोटी रुपये, सेट बनवण्यासाठी 15 कोटी रुपये आणि CGI वर 5 कोटी रुपये खर्च करण्यात आले. हा चित्रपट येत्या 9 जानेवारी रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.

सत्ता आमच्यासाठी नकोय, पण...; राज ठाकरे स्पष्टच बोलले
सत्ता आमच्यासाठी नकोय, पण...; राज ठाकरे स्पष्टच बोलले.
... ते मुंबईत जन्मल्यावर समजेल; राज ठाकरेंनी व्यक्त केल्या भावना
... ते मुंबईत जन्मल्यावर समजेल; राज ठाकरेंनी व्यक्त केल्या भावना.
आमदार फोडायला 200 कोटी 2 हजार कोटी कर्ज काढून आणले? राज ठाकरेंचा दावा
आमदार फोडायला 200 कोटी 2 हजार कोटी कर्ज काढून आणले? राज ठाकरेंचा दावा.
राजकारणातील पैशांचा ड्रग्सशी संबंध? राज ठाकरेंनी केला खळबळजनक दावा
राजकारणातील पैशांचा ड्रग्सशी संबंध? राज ठाकरेंनी केला खळबळजनक दावा.
मुंबईकर म्हणून मला लाज वाटते! महेश मांजरेकरांनी केलं मोठं विधान
मुंबईकर म्हणून मला लाज वाटते! महेश मांजरेकरांनी केलं मोठं विधान.
ससाने जागा अदानीच्या तोंडात घालतायत! उद्धव ठाकरेची सरकारवर टीका
ससाने जागा अदानीच्या तोंडात घालतायत! उद्धव ठाकरेची सरकारवर टीका.
मराठी माणूस एकत्र येऊ नये यासाठी राजकारण सुरू - राज ठाकरे
मराठी माणूस एकत्र येऊ नये यासाठी राजकारण सुरू - राज ठाकरे.
महाराष्ट्राला 20 वर्ष वाट का पहावी लागली ? काय म्हणाले ठाकरे बंधू ?
महाराष्ट्राला 20 वर्ष वाट का पहावी लागली ? काय म्हणाले ठाकरे बंधू ?.
6 पती-पत्नी निवडणुकीच्या रिंगणात, सांगली पालिकेच्या निवडणुकीची चर्चा!
6 पती-पत्नी निवडणुकीच्या रिंगणात, सांगली पालिकेच्या निवडणुकीची चर्चा!.
...त्याचाच राग उद्धव ठाकरे यांनी धरला अन्.. संतोष धुरी यांचा नवा आरोप
...त्याचाच राग उद्धव ठाकरे यांनी धरला अन्.. संतोष धुरी यांचा नवा आरोप.