AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जान्हवी कपूरचं शाही लग्न जामनगरमध्ये? खुद्द वडिलांनीच सस्पेन्स संपवला; होणार महाराष्ट्राची सून…

जान्हवी कपूर आणि शिखर पहारिया हे गेल्या बऱ्याच वर्षांपासून एकमेकांच्या रिलेशनशीपमध्ये आहेत. हे दोघेही कधी डिनर करताना तर कधी मंदिरात एकत्र दिसलेले आहेत. अनेक कार्यक्रमात जान्हवीनेदेखील शिखरसोबतच्या आपल्या रिलेशनशीपबद्दल सांगितलेलं आहे.

जान्हवी कपूरचं शाही लग्न जामनगरमध्ये? खुद्द वडिलांनीच सस्पेन्स संपवला; होणार महाराष्ट्राची सून...
shikhar pahariya and janhvi kapoorImage Credit source: tv9 marathi
| Updated on: May 04, 2026 | 9:48 PM
Share

Janhvi Kapoor Marriage : अभिनेत्री जान्हवी कपूर हिचे देशभरात लाखोंनी चाहते आहेत. तिचे सौंदर्य, कसदार अभिनय आणि सामाजिक जाण यामुळे तिच्यावर प्रेम करणाऱ्यांची संख्या खूप आहे. जान्हवी कपूर हिच्या अभिनयाची जशी चर्चा होती, अगदी तेवढीच तिच्या वैयक्तिक आयुष्याचाही चर्चा होते. ती लवकरच लग्न करणार असल्याचे बोलले जाते. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा नातू शिखर पहारिया याच्यासोबत गेल्या कित्येक वर्षांपासून ती रिलेशनशीपमध्ये आहे. लवकरच ते दोघे लग्न करणार असल्याचे बोलले जाते. त्यांच्या लग्नाबाबत वेगवेगळे दावेही केले जातात. दरम्यान, आता जान्हवीच्या वडिलांनीच तिच्या लग्नाचा सस्पेन्स संपवून टाकला आहे. जान्हवी लग्न नेमकं कधी करणार? लग्नाची तारीख ठरलेली आहे का? याबाबतची महत्त्वाची माहिती समोर आली आहे.

काही रिपोर्ट्सनुसार जान्हवी आणि शिखर या वर्षी सप्टेंबर….

जान्हवी कपूर आणि शिखर पहारिया हे गेल्या बऱ्याच वर्षांपासून एकमेकांच्या रिलेशनशीपमध्ये आहेत. हे दोघेही कधी डिनर करताना तर कधी मंदिरात एकत्र दिसलेले आहेत. अनेक कार्यक्रमात जान्हवीनेदेखील शिखरसोबतच्या आपल्या रिलेशनशीपबद्दल सांगितलेलं आहे. त्यामुळेच आता या वर्षी हे दोघेही विवाहबद्ध होणार आहेत, असे सांगितले जात होते. काही रिपोर्ट्सनुसार जान्हवी आणि शिखर या वर्षी सप्टेंबर किंवा ऑक्टोबर महिन्यात विवाह करू शकतात. जामनगरमध्ये एका पारंपरिक सोहळ्यात ते लग्नगाठ बांधतील असे सांगितले जात होते. याबाबत जान्हवीने मात्र अद्याप कोणतेही भाष्य केलेले नाही.

बोनी कपूर यांनी काय सांगितले?

आता जान्हवी आणि शिखर यांच्या विवाहाविषयी जान्हवीचे वडील बोनी कपूर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. टाईम्स ऑफ इंडियाशी बोलताना त्यांनी लग्नाच्या चर्चांना ब्रेक दिला आहे. लग्नाच्या होत असलेल्या चर्चा या केवळ अफवा आहेत, असे त्यांचे मत आहे. म्हणजेच या वर्षी जान्हवीचे लग्न होणार नाही, असे म्हटले जात आहे. दरम्यान, कामाच्या बाबतीत बोलायचे झाल्यास जान्हवीचा एक पेड्डी नावाचा सिनेमा येत आहे. या चित्रपटात तिच्यासोबत रामचरण हा मुख्य भूमिकेत असेल. हा चित्रपट 4 जून 2026 रोजी प्रदर्शित होणार आहे. याआधी जान्हवी ‘सनी संस्कारी की तुलसी कुमारी’ या चित्रपटात दिसली होती.

Follow Us
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले, शुगर असलेल्यांनीच...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ व्हायरल
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा..
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा मोठा दावा
ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
Disha Salian Case : ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी...
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी... सतीश सालियान यांनी दिला 7 दिवसांचा अल्टिमेटम
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं...
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम...
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम पावसाचा पर्याय
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, ‘डिजिटल सापळ्यात...
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, 'डिजिटल सापळ्यात’ नागरिकांना अडकवले
नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी
Nanded | नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी