Janhvi Kapoor : महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्यांच्या नातवाशी जान्हवी कपूर कधी करणार लग्न ? ‘कॉफी विथ करण’ मध्ये थेट सांगितली तारीख

Janhvi Kapoor Relationship : जान्हवी कपूर नुकतीच 'कॉफी विथ करण' या चॅट शोमध्ये आली होती. या एपिसोडमध्ये तिने शिखर पहारियासोबतच्या तिच्या नात्याला अधिकृत दुजोरा दिला आहेतसेच तिच्या लग्नाचे प्लान्सही जान्हवीने थेट सांगितले.

Janhvi Kapoor : महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्यांच्या नातवाशी जान्हवी कपूर कधी करणार लग्न ? कॉफी विथ करण मध्ये थेट सांगितली तारीख
| Updated on: Oct 29, 2026 | 6:59 PM

Janhvi Kapoor Relationship : बॉलीवूड अभिनेत्री जान्हवी कपूर आणि शिखर पहारिया हे दोघेही गेल्या अनेक वर्षांपासून रिलेशनमध्ये आहेत. दोघं अनेकदा एकत्र दिसले आहेत, मात्र त्यांनी आत्तापर्यंत आपल्या नात्याबद्दल खुलेपणे भाष्य केलं नव्हतं. मात्र नुकतीच ‘कॉफी विथ करण’मध्ये आलेल्या जान्हवी शिखरसोबतच्या नात्याबद्दल मोकळेपणे बोलली. एवढंच नव्हे तर ती शिखरशी लग्न कधी करणारा हेही तिने स्पष्टपणे सांगितलं.

‘कॉफी विथ करण’च्या लेटेस्ट एपिसोडमध्ये जान्हवी कपूर ही अभिनेता वरूण धवन आणि तिचा भाऊ, अभिनेता अर्जुन कपूर याच्यासोबत आली होती. त्यावेळी करण जोहरने जान्हवीला विचारलं की तू शिखरल ऑफिशिल डेट करत आहेस का ? त्यावर जान्हवीने ‘हो’ असं उत्तर दिलं. एवढंच नव्हे तर याच एपिसोडमध्ये जान्हवीला तिच्या लग्नाबद्दलही प्रश्न विचारण्यात आला, त्यावरही जान्हवीने अगदी स्पष्टपणे उत्तर दिलं.

Loading...

नात्याबद्दल काय म्हणाली जान्हवी ?

” आमच्या नात्याला (कोणाची) नजर लागावी असं मला वाटतं नाही. मी माझ्या खासगी आयुष्याबद्दल गरजेपेक्षा जास्त बोलू इच्छित नाही. पण कोणालाही , काहीच कळलं नाही पाहिजे, असं सतत म्हणणं देखील योग्य नाही, ते जरा जास्तच होतं. प्रत्येक गोष्ट लपवून ठेवणं आणि नात्याबद्दल अगदी जपून-जपून बोलणं बोरिंग होतं. ही काही एवढी मोठी गोष्ट नाहीये”, असं जान्हवी म्हणाली.

या दरम्यान वरुण धवनने देखील शिखरबद्दल जान्हवीच्या पसंतीचा उल्लेख केला. त्याने विमान प्रवासातील एक किस्सा सांगितला. प्रवासादरम्यान परिस्थिती थोडी कठीण झाली होती आणि त्यावेळी मी त्या दोघांनाही सांभाळत होतो, असं वरुणने गंमतीने म्हटलं.

शिखरशी कधी करणार लग्न ?

यानंतर करण जोहरने जान्हवीला लग्नाबाबत प्रश्न विचारला. त्यावर अभिनेत्रीने स्पष्टच उत्तर दिलं – आणखी 2-3 वर्ष तरी बिलकूल नाही. सध्या ती आणि शिखर त्यांच्या नात्यात आनंदी आहेत. त्यांच्या आजूबाजूला अनेकांचे नातेसंबंध तुटत असले, तरी दोघांचं नातं सध्या चांगल्या टप्प्यावर आहे, असंही जान्हवीने पुढे सांगितलं.

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us