अंकिता, हिना, रुपाली नव्हे तर 23 वर्षीय ‘ही’ तरुणी ठरली टीव्हीवरील सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री
अंकिता लोखंडे, हिना खान, रुपाली गांगुली यांसारख्या मोठमोठ्या अभिनेत्रींना मागे टाकत 23 वर्षीय तरुणी टेलिव्हिजनवरील सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री ठरली आहे. या अभिनेत्रीचे इन्स्टाग्रामवर शाहरुखनपेक्षाही जास्त फॉलोअर्स आहेत.

एकेकाळी टीव्हीवर, मालिकांमध्ये काम करणाऱ्या कलाकारांना मोठ्या पडद्यावरील कलाकारांच्या तुलनेत कमी मानलं जायचं. मात्र तो काळ आता फारसा अस्तित्वात नाही असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. कारण पैसा, प्रसिद्धी, पुरस्कार या सर्वांच्या बाबतीत टीव्हीवरील कलाकार चित्रपटांमधील कलाकारांना तगडी टक्कर देत आहेत. वयाच्या अवघ्या 23 व्या वर्षी टीव्हीवरील एक प्रसिद्ध अभिनेत्री सर्वांनाच मागे टाकत भरभक्कम फी घेत आहे. ही अभिनेत्री दुसरी-तिसरी कोणी नसून जन्नत झुबैर आहे. कमी वयातच जन्नतला स्टारडम मिळाला असून इन्स्टाग्रामवर तिचे लाखो फॉलोअर्स आहेत. मानधनाच्या बाबतीत जन्नतने टीव्हीवरील इतरही मोठ्या कलाकारांना मागे टाकलं आहे.
जन्नत झुबैरचा जन्म 29 ऑगस्ट 2021 रोजी झाला. ‘काशी- अब ना रहे तेरा कागज कोरा’ या मालिकेत काशीची भूमिका साकारून जन्नत घराघरात पोहोचली. त्यानंतर तिने ‘फुलवा’, ‘तू आशिकी’ यामध्येही काम केलं. जन्नतने ‘खतरों के खिलाडी’ या शोच्या एका एपिसोडसाठी तब्बल 18 लाख रुपये मानधन घेतल्याचं म्हटलं जातं. तर ‘लाफ्टर चॅलेंज’च्या एका एपिसोडसाठी ती 2 लाख रुपये मानधन घ्यायची. इतकंच नव्हे तर सोशल मीडियावरील एका पोस्टसाठी ती दीड ते दोन लाख रुपये फी घेत असल्याचंही कळतंय. यामुळे जन्नतला टीव्हीवरील सर्वांत श्रीमंत अभिनेत्री म्हटलं जातंय. वयाच्या 23 व्या वर्षीच जन्नतची कोट्यवधींची संपत्ती आहे. सोशल मीडियावर जन्नतचा मोठा चाहतावर्ग आहे. इन्स्टाग्रामवर तिचे शाहरुख खानपेक्षाही अधिक फॉलोअर्स आहेत. इन्स्टावर जन्नतचे 49.7 दशलक्ष फॉलोअर्स आहेत, तर शाहरुखचे 47.7 दशलक्ष फॉलोअर्स आहेत.
View this post on Instagram
टेलिव्हिजन इंडस्ट्रीत इतरही असे काही कलाकार आहेत, जे तगडं मानधन घेण्यासाठी ओळखले जातात. यात अंकिता लोखंडेचं नाव अग्रस्थानी आहे. ‘बिग बॉस’मधील एका आठवड्यासाठी तिने 11 ते 12 लाख रुपये मानधन घेतल्याचं समजतंय. ‘अनुपमा’ फेम अभिनेत्री रुपाली गांगुलीसुद्धा सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक आहे. मालिकेच्या एका एपिसोडसाठी ती 3 लाख रुपये मानधन घेते. ‘बिग बॉस’ फेम तेजस्वी प्रकाशने दर आठवड्याला 10 लाख रुपये स्वीकारले होते. टेलिव्हिजनवरील आणखी एक लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे हिना खान. एका एपिसोडसाठी ती दीड ते दोन लाख रुपये मानधन घेते.
