AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

करीना कपूरचं थेट जसप्रीत बुमराहला चॅलेंज; क्रिकेटरने दिलेलं उत्तर वाचून तुम्हीही व्हाल खुश!

अभिनेत्री करीना कपूरने क्रिकेटर जसप्रीत बुमराहला चॅलेंज केलं होतं. त्यावर आता बुमराहनेही उत्तर दिलं आहे. या दोघांमधील मजेशीर संवादाने सोशल मीडियावर नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं आहे. बुमराहने काय उत्तर दिलं, ते वाचा..

करीना कपूरचं थेट जसप्रीत बुमराहला चॅलेंज; क्रिकेटरने दिलेलं उत्तर वाचून तुम्हीही व्हाल खुश!
Kareena Kapoor and Jasprit BumrahImage Credit source: Instagram
| Updated on: Jun 24, 2026 | 11:40 AM
Share

अभिनेत्री करीना कपूर सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असते. कधी स्वत:चे तर कधी पती- मुलांसोबतचे फोटो आणि व्हिडीओ ती चाहत्यांसोबत शेअर करत असते. नुकताच तिने इन्स्टा स्टोरीमध्ये मोठा मुलगा तैमुरसोबत क्रिकेट खेळतानाचा एक फोटो पोस्ट केला. त्यावर मजेशीर कॅप्शन लिहित तिने भारतीय क्रिकेट टीमचा स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराहला चॅलेंज केलं. करीना कपूरच्या या चॅलेंजला आता बुमराहने उत्तर दिलं आहे. त्याची ही पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आली आहे.

नेमकं काय घडलं?

करीना कपूरने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये एक फोटो पोस्ट केला होता. या फोटोमध्ये ती तैमूरसोबत क्रिकेट खेळताना दिसत आहे. तैमूर बॅटिंग करत असतो, तर करीना बॉलिंग करत असते. या फोटोवर तिने गमतीने लिहिलं, ‘माझ्या टॅलेंटला (प्रतिभेला) कमी लेखू नका, मी बुमराहलाही टक्कर देऊ शकते.’ करीनाच्या या पोस्टवर बुमराहनेही मस्करी केली. त्याने रिल्पाय देत म्हटलं, ‘मला अजिबात त्यावर संशय नाही. तू खूपच प्रतिभावान आहेस.’ यासोबतच त्याने हसण्याचा इमोजी पोस्ट केला आहे. करीना आणि बुमराहमधील हा संवाद सोशल मीडियावर चाहत्यांकडून खूप पसंत केला जातोय.

करीनाच्या पोस्टवर बुमराहचं उत्तर

भारतीय क्रिकेट टीमचा सर्वांत अनुभवी आणि वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आयपीएल 2026 पासून टीमबाहेर आहे. त्याला अफगाणिस्तानविरुद्धच्या कसोटी आणि तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतून विश्रांती देण्यात आली आहे. आयर्लंडविरुद्धच्या दोन टी-20 सामन्यांसाठी आणि इंग्लंडविरुद्धच्या पाच टी-20 सामन्यांसाठी त्याला टीमबाहेर करण्यात आलं आहे. बीसीसीआयने नुकतीच इंग्लंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय टीमची घोषणा केली, ज्यात बुमराहला स्थान मिळालं आहे. आता बुमराह इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत खेळताना दिसणार आहे.

दुसरीकडे तैमुरला क्रिकेटची खूप आवड आहे. सैफचे वडील मन्सूर अली खान पतौडी हे सुद्धा भारतीय क्रिकेटर आणि भारतीय क्रिकेट टीमचे माजी कर्णधार होते. तैमुरचे क्रिकेट खेळतानाचे व्हिडीओ पाहून तोसुद्धा त्याच्या आजोबा आणि पणजोबांच्या पाऊलांवर पाऊल टाकत क्रिकेट क्षेत्रात करिअर करणार, असं नेटकरी म्हणतात.

Follow Us
कर्जमाफीचा दुसरा हप्ता जारी ६.३६ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात पैस जमा
शेतकरी कर्जमाफीचा दुसरा हप्ता जारी: ६.३ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात ५,०८६ कोटी रुपये जमा
वडेट्टीवारांचं विधान: फडणवीसांना २०२९ पर्यंतच पंतप्रधान होण्याची संधी
वडेट्टीवारांचे मोठे विधान: फडणवीसांना २०२९ पर्यंतच पंतप्रधान होण्याची संधी
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार...
आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब
Chandrashekhar Bawankule : आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब, बावनकुळेंनी दिली महायुती बैठकीची माहिती
विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
'विद्यार्थी भीक नाही हक्क मागतायत', पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
Dharashiv | धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
निधीवरुन मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा काढला जाणार
महायुतीच्या समन्वय समितीची बैठक: निधीवरून मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा, फडणवीस-शिंदेंकडे अंतिम निर्णय
पुण्यात राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीने मांडले आदिवासींचे प्रश्न
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोर विद्यार्थीनीनं आदिवासींच्या समस्यांचा पाढा वाचला