Kangana Javed Dispute | जावेद अख्तर प्रकरणात कोर्टाकडून कंगना राणावत हिला मोठा झटका, थेट हे पाच आरोप…

बाॅलिवूड अभिनेत्री कंगना राणावत ही कायमच चर्चेत राहणारी अभिनेत्री आहे. अनेकदा कंगना राणावत ही मोठ्या वादात देखील सापडते. विशेष म्हणजे कंगना राणावत ही सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात सक्रिय दिसते. आता कंगना राणावत हिला मोठा झटका बसला आहे.

Kangana Javed Dispute | जावेद अख्तर प्रकरणात कोर्टाकडून कंगना राणावत हिला मोठा झटका, थेट हे पाच आरोप...
| Updated on: Jul 26, 2023 | 3:55 PM

मुंबई : बाॅलिवूड अभिनेत्री कंगना राणावत (Kangana Ranaut) आणि जावेद अख्तर यांच्यामधील वाद हा सर्वांनाच माहिती आहे. कंगना राणावत हिने जावेद अख्तर यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप केले. इतकेच नाही तर थेट यांचे प्रकरण हे कोर्टात गेले. कंगना ही सतत जावेद अख्तर यांच्यावर आरोप करताना दिसली आहे. जावेद अख्तर (Javed Akhtar) यांनी त्यांच्या घरी बोलून आपल्याला थेट ऋतिक रोशन यांनी त्यांच्या कुटुंबियांची माफी मागण्यास सांगितल्याचे कंगना हिने म्हटले होते. इतकेच नाही तर त्यावेळी त्यांनी आपला अपमान (Insult) केल्याचे देखील कंगना हिने सांगितले. यावेळी कंगना राणावत हिची बहीण रंगोली ही देखील सोबत असल्याचे सांगितले गेले.

आता कंगना राणावत हिला मोठा झटका हा कोर्टाकडून बसला आहे. कोर्टाने आता या प्रकरणात जावेद अख्तर यांना समन्स बजावले आहे. आता जावेद अख्तर यांना कोर्टामध्ये 5 ऑगस्टला हजर राहवे लागणार आहे. मात्र, असे असताना देखील कोर्टाकडून जावेद अख्तर यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

मुंबई दंडाधिकारी कोर्टाने जावेद अख्तर यांच्यावर कंगना हिने लावलेला खंडणी याच्यासह आणखी चार आरोप फेटाळून लावले आहेत. यामुळे हा जावेद अख्तर यांना अत्यंत मोठा दिलासा हा नक्कीच असणार आहे. दुसरीकडे कंगना हिने लावलेले ऐकून पाच आरोप हे कोर्टाकडून फेटाळून लावण्यात आल्याने तिला मोठा झटका बसला आहे.

विशेष म्हणजे कंगना राणावत आणि जावेद अख्तर यांचे हे सर्व प्रकरण 2016 मधील आहे. 2016 मध्ये जावेद अख्तर यांनी त्यांच्या खरी कंगना आणि तिच्या बहिणीला बोलावले होते. त्यावेळी कंगना आणि ऋतिक रोशन यांचा वाद हा सुरू होता. कंगना राणावत हिच्या म्हणण्याप्रमाणे जावेद अख्तर यांनी तिला गुन्हेगारी पद्धतीने धमकावले. इतकेच नाही तर बळजबरीने हृतिक रोशन याची माफी मागण्यास सांगितले.

आता जावेद अख्तर यांना कोर्टामध्ये 5 आॅगस्ट रोजी उपस्थित राहवे लागणार आहे. कोर्टाकडून जावेद अख्तर यांना समन्स बजावण्यात आलाय. आता या प्रकरणात पुढे काय होते हे पाहण्यासारखे ठरणार आहे. कंगना राणावत ही कायमच चर्चेत राहणारी अभिनेत्री आहे. विशेष म्हणजे कंगना राणावत ही सोशल मीडियावर नेहमीच आपले मत मांडताना दिसत आणि मोठ्या वादात सापडते.