Jawan | शाहरुखच्या ‘जवान’ने 24 तासांत मोडला ‘पठाण’चा विक्रम; ॲडव्हान्स बुकिंगला जबरदस्त प्रतिसाद

शाहरुख खानचा 'जवान' हा चित्रपट त्याच्या 'पठाण'पेक्षाही वरचढ ठरणार आहे. ॲडव्हान्स बुकिंगद्वारे अवघ्या 24 तासांत या चित्रपटाची हजारो तिकिटं विकली गेली आहेत. ॲडव्हान्स बुकिंगच्या बाबतीत शाहरुखच्या 'जवान'ने 'पठाण'लाही मागे टाकलं आहे.

Jawan | शाहरुखच्या 'जवान'ने 24 तासांत मोडला 'पठाण'चा विक्रम; ॲडव्हान्स बुकिंगला जबरदस्त प्रतिसाद
JawanImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Sep 02, 2023 | 1:45 PM

मुंबई | 2 सप्टेंबर 2023 : जवळपास चार वर्षांच्या ब्रेकनंतर शाहरुख खानने ‘पठाण’ या चित्रपटाद्वारे मोठ्या पडद्यावर पुनरागमन केलं. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान हिट ठरला. त्यानंतर आता काही महिन्यांतच शाहरुखच्या दुसऱ्या प्रोजेक्टची घोषणा झाली. ‘जवान’ हा चित्रपट येत्या 7 सप्टेंबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर लाँच करण्यात आला. या ट्रेलरला प्रेक्षकांकडून दमदार प्रतिसाद मिळाला. आता ‘जवान’च्या ॲडव्हान्स बुकिंगबद्दल महत्वपूर्ण माहिती समोर येत आहे. शुक्रवारी 1 सप्टेंबरपासून भारतात या चित्रपटाच्या ॲडव्हान्स बुकिंगला सुरुवात झाली. त्यानंतर अवघ्या काही तासांत या चित्रपटाची 165 हजार तिकीटं विकली गेली आहेत.

24 तासांत विकली गेली इतकी तिकिटं

अवघ्या 24 तासांत इतक्या मोठ्या प्रमाणावर ॲडव्हान्स बुकिंग झालेला हा भारतातील पहिला बॉलिवूड चित्रपट ठरला आहे. ॲडव्हान्स बुकिंगद्वारे पहिल्या 24 तासांत ‘जवान’ या चित्रपटाची तब्बल 305 हजार तिकीटं विकली गेली आहेत. त्यातून चित्रपटाने दहा कोटी रुपये कमावले आहेत. तर पीव्हीआर, आयनॉक्स आणि सिनेपोलीस या नॅशनल चेन्समध्ये चित्रपटाची 165 हजार तिकीट विकली गेली आहेत. शाहरुखच्या ‘जवान’ने ‘पठाण’चा रेकॉर्ड मोडला आहे. पठाण या चित्रपटाची 24 तासांत 117 हजार तिकीटं विकली गेली होती.

‘बाहुबली 2’ला टाकणार मागे?

ॲडव्हान्स बुकिंगच्या बाबतीत शाहरुख खानचा ‘जवान’ हा चित्रपट एस. एस. राजामौली यांच्या ‘बाहुबली 2’ या चित्रपटालाही मागे टाकणार असं चित्र दिसून येत आहे. प्रदर्शनापूर्वी ‘बाहुबली 2’ची ॲडव्हान्स बुकिंगद्वारे तब्बल 650 हजार तिकीटं विकली गेली होती. ‘जवान’ या चित्रपटाच्या माध्यमातून साऊथचा दिग्दर्शक अटलीने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे. यामध्ये शाहरुख खानसोबतच नयनतारा आणि विजय सेतुपती यांच्या मुख्य भूमिका आहेत. त्यासोबतच दीपिका पादुकोण, सान्या मल्होत्रा, प्रियामणी, योगी बाबू आणि सुनील ग्रोवर यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. हा चित्रपट तब्बल 300 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनवला गेला आहे. शाहरुखचा हा आतापर्यंतचा सर्वात महागडा चित्रपट मानला जात आहे.

हे सुद्धा वाचा

‘जवान’ या चित्रपटानंतर शाहरुख खान हा सलमान खानच्या ‘टायगर 3’ या चित्रपटात पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत झळकणार आहे. यामध्ये दोघंही ॲक्शन सीन करताना दिसणार आहेत. शाहरुख आणि सलमानला पुन्हा एकदा पडदावर एकत्र पाहणं चाहत्यांसाठी पर्वणी ठरणार आहे. याशिवाय शाहरुख खान हा राजकुमार हिरानी दिग्दर्शित डंकी या चित्रपटातूनही प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा चित्रपट येत्या डिसेंबरमध्ये प्रदर्शित होणार आहे.

Non Stop LIVE Update
राहुल गांधींची ट्रेन कशी? त्याला फक्त इंजिन अन् डब्बे..फडणवीसांची टीका
राहुल गांधींची ट्रेन कशी? त्याला फक्त इंजिन अन् डब्बे..फडणवीसांची टीका.
कोल्हेंचं अजित दादांच्या टीकेला प्रत्युत्तर, कार्यसम्राट की नटसम्राट..
कोल्हेंचं अजित दादांच्या टीकेला प्रत्युत्तर, कार्यसम्राट की नटसम्राट...
शरद पवार महायुतीत येणार? 4 जूननंतर... प्रफुल्ल पटेलांचं मोठं वक्तव्य
शरद पवार महायुतीत येणार? 4 जूननंतर... प्रफुल्ल पटेलांचं मोठं वक्तव्य.
नारायण राणे वेडा माणूस, त्याचा चेहरा..., ठाकरे गटाच्या नेत्याची टीका
नारायण राणे वेडा माणूस, त्याचा चेहरा..., ठाकरे गटाच्या नेत्याची टीका.
... हा नारायण राणेंचा अपमान नाही का? वैभव नाईक यांचा उपरोधीक टोला
... हा नारायण राणेंचा अपमान नाही का? वैभव नाईक यांचा उपरोधीक टोला.
73 वर्षीय तरूण उमेदवार लोकसभेच्या रिंगणात, मी निवडून आलो तर...
73 वर्षीय तरूण उमेदवार लोकसभेच्या रिंगणात, मी निवडून आलो तर....
जरांगे पाटील 4 जूनपासून उपोषणाला बसणार? मराठा आरक्षणासाठी दिली डेडलाईन
जरांगे पाटील 4 जूनपासून उपोषणाला बसणार? मराठा आरक्षणासाठी दिली डेडलाईन.
तुम्हाला कार्यसम्राट खासदार पाहिजे की नटसम्राट..दादांची कोल्हेंवर टीका
तुम्हाला कार्यसम्राट खासदार पाहिजे की नटसम्राट..दादांची कोल्हेंवर टीका.
किडनीत शिंदे गट, लिव्हरमध्ये...निंबाळकरांचा मल्हार पाटलांना खोचक टोला
किडनीत शिंदे गट, लिव्हरमध्ये...निंबाळकरांचा मल्हार पाटलांना खोचक टोला.
दोन दिवस प्रतीक्षा, नाहीतर सांगलीतून विशाल पाटील अपक्ष म्हणून लढणार?
दोन दिवस प्रतीक्षा, नाहीतर सांगलीतून विशाल पाटील अपक्ष म्हणून लढणार?.