Jaya Bachchan | जया बच्चन यांचा बदललेला स्वभाव पाहून पापाराझी थक्क; नेटकरी म्हणाले “आज सूर्य कुठे उगवला?”

बॉलिवूडचे प्रसिद्ध फॅशन डिझायनर अबू जानी आणि संदीप खोसला यांच्या नवीन कलेक्शनचा लाँचचा कार्यक्रम मुंबईत आयोजित करण्यात आला होता. याच कार्यक्रमाला जया बच्चन पोहोचल्या होत्या. यावेळी पापाराझीसुद्धा उपस्थित होते. मात्र या कार्यक्रमात असं काही घडलं, जे याआधी पहायला मिळालं नव्हतं.

Jaya Bachchan | जया बच्चन यांचा बदललेला स्वभाव पाहून पापाराझी थक्क; नेटकरी म्हणाले आज सूर्य कुठे उगवला?
Jaya Bachchan
Image Credit source: Instagram
| Updated on: Mar 03, 2023 | 11:57 AM

मुंबई : बॉलिवूडच्या ज्येष्ठ अभिनेत्री जया बच्चन यांना कॅमेरा आणि मीडिया यांच्याविषयी फार प्रेम नसल्याचं अनेकदा पहायला मिळालं. जया बच्चन यांच्यासमोर जेव्हा कधी पापाराझी जातात, तेव्हा त्या नेहमी चिडलेल्या दिसतात. अनेकदा त्यांना फोटोग्राफर्सवर ओरडतानाही पाहिलं गेलं आहे. अशा लोकांना नोकरीवरून काढा, असंही त्या एकदा पापाराझींसमोर म्हणाल्या होत्या. त्यामुळे त्यांचा चिडका स्वभाव पाहून फोटोग्राफर्स आणि पापाराझी त्यांच्यापासून चार हात लांबच राहतात. मात्र आता नुकत्याच एका कार्यक्रमात जया बच्चन यांचा बदललेला स्वभाव पहायला मिळाला. त्यांचा नेहमीपेक्षा वेगळा अंदाज पाहून पापाराझींसह नेटकरीसुद्धा थक्क झाले आहेत.

नेहमीच रागात आणि नाराज दिसणाऱ्या जया बच्चन यावेळी पापाराझींशी हसत-मस्करी करत बोलत होत्या. सोशल मीडियावर त्यांचा हा व्हिडीओ व्हायरल होतोय. या व्हिडीओमध्ये जया बच्चन यांचा नवीन अवतार पहायला मिळतोय. त्यांचा हा बदललेला अंदाज पाहून चाहत्यांनाही विश्वास होत नाहीये. बॉलिवूडचे प्रसिद्ध फॅशन डिझायनर अबू जानी आणि संदीप खोसला यांच्या नवीन कलेक्शनचा लाँचचा कार्यक्रम मुंबईत आयोजित करण्यात आला होता. याच कार्यक्रमाला जया बच्चन पोहोचल्या होत्या. यावेळी पापाराझीसुद्धा उपस्थित होते. मात्र या कार्यक्रमात असं काही घडलं, जे याआधी पहायला मिळालं नव्हतं.

जया बच्चन या पापाराझींवर ओरडल्या नाही आणि त्यांच्यावर नाराजसुद्धा झाल्या नाहीत. उलट त्यांनी हसत आणि मस्करी करत फोटोसाठी पोझ दिले. इतकंच नव्हे तर त्यांनी पापाराझींसोबत गप्पाही मारल्या. यावेळी पापाराझींशी बोलताना त्या म्हणाल्या, “अशा कार्यक्रमांदरम्यान फोटो क्लिक करण्यावर माझा काही आक्षेप नाही. मात्र माझ्या परवानगीशिवाय आणि कधी बाहेर लपूनछपून क्लिक केलेले फोटो मला आवडत नाहीत.”

त्यांच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतोय. ‘आज सूर्य कोणत्या दिशेला उगवला’, असा उपरोधिक सवालही नेटकऱ्यांनी केला आहे. तर काहींनी जया यांची बाजू घेतली. ते बरोबर म्हणत आहेत, असं नेटकऱ्यांनी म्हटलंय.

करण जोहरच्या शोमध्ये जया बच्चन यांची मुलं अभिषेक बच्चन आणि श्वेता बच्चन यांनी या गोष्टीचा खुलासा केला होता की त्यांची आई क्लॉस्ट्रोफोबिक आहे. त्यांना गर्दीचा सामना करताना खूप त्रास होतो. अचानक एकत्र बऱ्याच लोकांना पाहून त्या पॅनिक होतात.