
फिल्म इंडस्ट्रीमध्ये अनेकदा अभिनेत्रींसोबत ‘उप्स मोमेंट’ घडताना दिसतात. मग तो फॅशन शो असो, लाइव्ह कॉन्सर्ट असो किंवा एखादा कार्यक्रम असो अनेकदा अभिनेत्रींना कपड्यांमुळे अशा मोमेंट्सना सामोरं जावं लागतं. असाच काहीसा ‘उप्स मोमेंट’ घडला एका अभिनेत्रीसोबत. लाईव्ह कॉन्सर्टवेळी भर स्टेजवर सर्वांसमोर चक्क तिचा स्कर्ट निसटला. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
अभिनेत्री ‘उप्स मोमेंट’चा बळी
सार्वजनिक ठिकाणी अभिनेत्रींना ‘उप्स मोमेंट’चा बळी पडताना अनेकदा दिसून येते. यासाठी त्यांना अनेकदा ट्रोल केले जाते. अलिकडेच एका प्रसिद्ध हॉलिवूड स्टारसोबत असेच काहीसे घडले जेव्हा ती स्टेजवर लाईव्ह परफॉर्मन्स देत होती. ही प्रसिद्ध सेलिब्रिटी म्हणजे हॉलिवूडची प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री जेनिफर लोपेज. अलिकडेच एका कॉन्सर्ट दरम्यान जेनिफरचा स्कर्ट सर्वांसमोर खाली पडला.
कॉन्सर्ट दरम्यान स्कर्ट अचानक खाली पडला
25 जुलै रोजी हॉलिवूड गायिका आणि अभिनेत्री जेनिफर लोपेज पोलंडमधील वारसॉ येथे परफॉर्म करत होती. कॉन्सर्ट दरम्यान जेनिफरचा स्कर्ट अचानक निसटला आणि सर्वांसमोर खाली पडला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल
जेनिफरचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये जेनिफर स्टेजवर तिचा सर्वोत्तम परफॉर्मन्स देत होती. या दरम्यान, गायिकेने सोनेरी रंगाचा शॉर्ट स्कर्ट घातला होता, जो अचानक सैल झाला आणि स्टेजवर सर्वांसमोर खाली पडला. यामुळे ती खूप घाबरली, मात्र जेनिफरने हा प्रसंग फार चांगल्या प्रकारे हाताळला. आणि हसत हसत ती गमतीने म्हणाली, “मी इनरवेअर घातली आहे”
टीमने पटकन मदत केली
जेनिफरचा हा व्हिडिओ इंटरनेटवर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये दिसत आहे की हा प्रसंग घडल्यानंतर तिची टीम तिला पटकन स्कर्ट घालत आहे. अलीकडेच जेनिफरने तिचा 56 वा वाढदिवस साजरा केला. 56 वर्षांची झाल्यानंतरही जेनिफरचं सौंदर्य कमी झालेलं नाही.J