किस करू? म्हणत ‘तारक मेहता..’च्या निर्मात्यांकडून अभिनेत्रीचा छळ; संतापलेल्या ‘बबिता’ने सुनावलं

'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेत मिसेस रोशन सोढीची भूमिका साकारलेल्या अभिनेत्री जेनिफर मिस्त्रीने निर्मात्यांवर गंभीर आरोप केले आहेत. निर्मात्यांनी माझा छळ केला, अशी तक्रार तिने केली. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत ती याविषयी व्यक्त झाली.

किस करू? म्हणत तारक मेहता..च्या निर्मात्यांकडून अभिनेत्रीचा छळ; संतापलेल्या बबिताने सुनावलं
Munmun Dutta
Image Credit source: Instagram
| Updated on: Jul 29, 2025 | 10:07 AM

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही टेलिव्हिजनवरील सर्वांत लोकप्रिय मालिका आहे. गेल्या 16 – 17 वर्षांपासून ही मालिका प्रेक्षकांचं मनोरंजन करतेय. परंतु गेल्या काही वर्षांत ही मालिका वादाच्या भोवऱ्यातही सापडली आहे. या मालिकेच्या निर्मात्यांवर कलाकारांकडून गंभीर आरोप झाले आहेत. या मालिकेत मिसेस रोशन सोढीची भूमिका साकारणारी अभिनेत्री जेनिफर मिस्त्रीने 2023 मध्ये ही मालिका सोडली होती. त्यावेळी तिने निर्माते असित कुमार मोदी यांच्यावर गैरवर्तनाचा आरोप केला होता. इतकंच नव्हे तर वेळेवर मानधन न मिळाल्याची तक्रार तिने केली होती. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत जेनिफरने निर्मात्यांवर आणखी गंभीर आरोप केले आहेत.

‘पिंकविला’ या वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत जेनिफरने सांगितलं की, 2018 जेव्हा ऑपरेशन हेड सोहेल रमानी तिला शिवीगाळ करत होते, तेव्हा मदत मागण्यासाठी ती असित कुमार मोदी यांच्याकडे गेली होती. “मी सोहेलची तक्रार करण्यासाठी असितजींकडे गेली होती. परंतु माझी समस्या न ऐकता ते वेगळंच काहीतरी बोलू लागले होते. ते मला म्हणाले की, तू खूप सेक्सी दिसतेय.” इतकंच नव्हे तर 2022 मध्येही त्यांच्याशी शाब्दिक बाचाबाची झाल्याचा खुलासा तिने केला.

त्यावेळी स्वित्झर्लंडला जाण्यासाठी जेनिफरला मालिकेच्या प्रॉडक्शन टीमकडून एक पत्र हवं होतं. परंतु टीमकडून सहकार्य केलं जात नव्हतं. याविषयी तिने पुढे सांगितलं, “असितजी मला फोनवर बरंच काही म्हणाले होते. मला म्हणाले की, तू काय रडत बसतेय? तू इथे असती तर मी तुला मिठी मारली असती. तुला माझी पर्वाच नाही. 2019 मध्येही सिंगापूर शूटदरम्यान असितजी मला म्हणाले होते, तुझी रुममेट रोज बाहेर जाते, मग तू एकटी काय करतेस? माझ्या रुममध्ये ये, आपण व्हिस्की घेऊयात. तुला एकटीला कंटाळा येत नाही का? मग तिसऱ्या दिवशी एका कॉफी शॉपमध्ये ते माझ्याजवळ येऊन म्हणाले, तुझे ओठ खूप सेक्सी आहेत. तुला किस करायची इच्छा होते.”

“हे सर्व ऐकून मी स्तब्ध झाले होते. मी घाबरले होते. या सर्व गोष्टी मी मुनमुन दत्ताला सांगितल्या होत्या. तेव्हा तिने असित मोदींना खूप सुनावलं होतं. ती खूप स्ट्राँग महिला आहे. असितजी मुनमुनला घाबरतात”, असं जेनिफरने स्पष्ट केलं. मुनमुन या मालिकेत बबिताजीची भूमिका साकारते.