AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

खाच खळग्यातून वाट काढत.. ‘झिम्मा 2’च्या शूटिंगदरम्यानचा मनाला भावणारा व्हिडीओ

दोन वर्षांपूर्वी जेव्हा 'झिम्मा' हा चित्रपट प्रदर्शित झाला होता, तेव्हा प्रेक्षकांची या चित्रपटाशी वेगळीच मैत्री झाली होती. म्हणूनच झिम्माच्या सीक्वेलची अनेकांना प्रचंड उत्सुकता होती. दिग्दर्शक हेमंत ढोमेनं आता शूटिंगदरम्यानचा पडद्यामागील एक व्हिडीओ पोस्ट केला आहे.

खाच खळग्यातून वाट काढत.. 'झिम्मा 2'च्या शूटिंगदरम्यानचा मनाला भावणारा व्हिडीओ
झिम्मा 2Image Credit source: Twitter
| Updated on: Nov 25, 2023 | 3:26 PM
Share

मुंबई : 25 नोव्हेंबर 2023 | हेमंत ढोमे दिग्दर्शित ‘झिम्मा 2’ हा चित्रपट 24 नोव्हेंबर रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटाला प्रेक्षकांकडून दमदार प्रतिसाद मिळतोय. पहिल्याच दिवशी ‘झिम्मा 2’ने 1.20 कोटी रुपयांचा गल्ला जमवला. प्रेक्षकांकडून मिळणारं हे पाहून हेमंतने सोशल मीडियावर शूटिंगदरम्यानचा एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या चित्रपटाचं शूटिंग परदेशी पार पडलं आणि त्यावेळी त्याने पत्नी आणि सहकलाकार क्षिती जोगला कशा प्रकारे मदत केली, ते या व्हिडीओमध्ये पहायला मिळतंय. ‘झिम्मा’चा पहिला भागसुद्धा बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरला होता. त्यानंतर प्रेक्षकांना दुसऱ्या भागाची प्रचंड उत्सुकता होती.

शूटिंगदरम्यानचा हा व्हिडीओ पोस्ट करत हेमंतने लिहिलं, ‘हे असंच एकमेकांना साथ देत, खाच खळग्यातून वाट काढत, कधी अडखळत तर कधी हसत खेळत, ‘झिम्मा 2’चा संपूर्ण प्रवास झाला. पण या प्रवासाची प्रचंड मजा घेत आम्ही आपला ‘झिम्मा 2′ पूर्ण केला. माझ्या संपूर्ण टीमची साथ नसती तर हे शक्य झालं नसतं.’ या व्हिडीओमध्ये खडकांमधून चालताना हेमंत क्षितीची मदत करताना दिसतोय.

पहा व्हिडीओ

हेमंत आणि क्षितीने 2012 मध्ये लग्न केलं. सावधान शुभमंगल या नाटकाच्या तालमीदरम्यान दोघांची पहिली भेट झाली होती. त्याआधीच हेमंत क्षितीला ओळखत होता. पण सावधान शुभमंगल या नाटकाच्या रिहर्सलच्या वेळी दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले. क्षिती ही हेमंतपेक्षा तीन वर्षांनी मोठी आहे. त्यामुळे लग्नाआधी हेमंतच्या घरी काही प्रश्न विचारले गेले. “याच फिल्डमधील मुलगी आहे. तुझ्यापेक्षा वयाने थोडी मोठी आहे, असा काही त्यांचा सूर होता. पण जेव्हा क्षितीला माझे कुटुंबीय भेटले, तेव्हा त्यांनी होकार दिला”, असं हेमंतने एका मुलाखतीत सांगितलं होतं.

‘झिम्मा 2’च्या निमित्ताने पुन्हा एकदा सात जणी एकत्र सहलीला निघाल्या आहेत. मात्र यावेळी दोन नवीन पात्रं या चित्रपटात पहायला मिळतात. त्यापैकी एक म्हणजे निर्मलाची सून तान्या (रिंकू राजगुरू) आणि दुसरी म्हणजे वैशालीची भाची मनाली (शिवानी सुर्वे). ‘झिम्मा’चा पहिला भाग थिएटरमध्ये जवळपास 50 पेक्षा अधिक दिवस होता. 50 दिवसांत या चित्रपटाने तब्बल 14 कोटी रुपयांचा गल्ला जमवला होता.

शरद पवार जे ठरवतील तेच माझ्यासाठी... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या..
शरद पवार जे ठरवतील तेच माझ्यासाठी... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या...
ठाकरेंच्या नेत्याने भाजपाच्या मुंबई अध्यक्षालाच घेरलं; बाहुली म्हणत...
ठाकरेंच्या नेत्याने भाजपाच्या मुंबई अध्यक्षालाच घेरलं; बाहुली म्हणत....
ठाकरे बंधूंची युती जाहीर...घोषणेनंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप
ठाकरे बंधूंची युती जाहीर...घोषणेनंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप.
जागावाटपाचा फॉर्म्युला फिक्स! शिंदे-चव्हाणांमध्ये 5 तास खलबतं
जागावाटपाचा फॉर्म्युला फिक्स! शिंदे-चव्हाणांमध्ये 5 तास खलबतं.
काँग्रेसचा सर्वात मोठा निर्णय, महत्त्वाच्या पक्षाशी थेट युतीची घोषणा
काँग्रेसचा सर्वात मोठा निर्णय, महत्त्वाच्या पक्षाशी थेट युतीची घोषणा.
राज ठाकरे अन् उद्धव ठाकरेंच्या युतीची घोषणा अन् मनसेला पहिला धक्का
राज ठाकरे अन् उद्धव ठाकरेंच्या युतीची घोषणा अन् मनसेला पहिला धक्का.
हे बडवे, कारकून कोण? 'लाव रे तो व्हिडीओ' म्हणत शेलारांचा ठाकरेंना सवाल
हे बडवे, कारकून कोण? 'लाव रे तो व्हिडीओ' म्हणत शेलारांचा ठाकरेंना सवाल.
नितेश राणे, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी
नितेश राणे, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी.
बाप, औकात अन ओम फट स्वाहा, मुंबईतील 'त्या' बॅनरनं राजकीय वर्तुळात खळबळ
बाप, औकात अन ओम फट स्वाहा, मुंबईतील 'त्या' बॅनरनं राजकीय वर्तुळात खळबळ.
ठाकरे बंधूंच्या युतीवर चित्रा वाघ यांची बोचरी टीका, बघा काय केलं ट्विट
ठाकरे बंधूंच्या युतीवर चित्रा वाघ यांची बोचरी टीका, बघा काय केलं ट्विट.