हिरोपेक्षा कमी नाही जिमी शेरगिलचा मुलगा; 18 व्या वर्षीच बनवली अशी बॉडी

जिमी शेरगिलच्या मुलाने वेधलं नेटकऱ्यांचं लक्ष; स्टारकिड्सना देणार टक्कर?

हिरोपेक्षा कमी नाही जिमी शेरगिलचा मुलगा; 18 व्या वर्षीच बनवली अशी बॉडी
Jimmy Shergil
Image Credit source: Instagram
| Updated on: Nov 29, 2022 | 12:46 PM

मुंबई: बॉलिवूड इंडस्ट्रीत असे काही कलाकार आहेत, ज्यांनी मोजक्या भूमिका साकारल्या आहेत. मात्र त्याच भूमिकांमुळे त्यांनी प्रेक्षकांची मनं जिंकली. अशा काही अभिनेत्यांपैकी जिमी शेरगिलचं नाव आवर्जून घेतलं जातं. ‘मुन्नाभाई एमबीबीएस’, ‘मोहब्बतें’, ‘लगे रहो मुन्नाभाई’, ‘स्पेशल 26’, ‘तनू वेड्स मनू’, ‘अ वेडनस्डे’ यांसारख्या चित्रपटांमध्ये त्याने दमदार भूमिका साकारल्या. चित्रपट असो किंवा वेब सीरिज, जिमी शेरगील त्याच्या जबरदस्त अभिनयकौशल्याने विशेष छाप सोडतो. जिमी जवळपास गेल्या 26 वर्षांपासून बॉलिवूड इंडस्ट्रीत कार्यरत आहे. पण क्वचितच लोकांना माहीत असेल की त्याला 18 वर्षांचा मुलगा आहे.

जिमी शेरगिलने 2001 मध्ये प्रियांका पुरीशी लग्न केलं. प्रियांका आणि जिमीला एक मुलगा आहे. त्याचं नाव वीर शेरगिल असं आहे. इतर स्टारकिड्सप्रमाणे जिमीचा मुलगा फारसा सोशल मीडियावर सक्रिय नसतो. त्याच्या वाढदिवसानिमित्त जिमीने फोटो पोस्ट करत शुभेच्छा दिल्या. याच फोटोने नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं आहे.

’18 व्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा वीर शेरगिल.. माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे’, असं कॅप्शन लिहित जिमीने त्याचे दोन फोटो पोस्ट केले. जिमीला 18 वर्षांचा मुलगा आहे, हे बहुतेक चाहत्यांना माहीतच नव्हतं. त्यामुळे अनेकांनी त्या फोटोवर कमेंट करत आश्चर्य व्यक्त केलंय. काहींनी वीरचं कौतुक केलं, तर काही जण असंही म्हणतायत की वीर हा जिमी इतका हँडसम नाही.

जिमी शेरगिलने 1996 मध्ये ‘माचिस’ या चित्रपटातून करिअरची सुरुवात केली. त्यानंतर त्याने मोहब्बतें, मेरे यार की शादी है, दिल है तुम्हारा, हासिल, सिलसिले, टॉम डिक अँड हॅरी, बस एक पल, दस कहानियाँ, अ वेडनस्डे, माय नेम इज खान, तनू वेड्स मनू यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केलं. बॉलिवूडसोबतच त्याने काही पंजाबी चित्रपटांमध्येही भूमिका साकारल्या आहेत.