Junior Mehmood यांची 5 रुपये होती पहिली कमाई, ‘तो’ खास दिवस येताच झाले सर्वात महागडे स्टार

Junior Mehmood : वयाच्या 9 व्या वर्षी ज्युनियर महमूद यांना मिळालं आयुष्य जगण्याचं कारण... पहिली कमाई होती फक्त 5 रुपये, त्यानंतर नशीब चमकलं आणि झाले महागडे सुपरस्टार, निधन मात्र हृयद्रावक... सर्वत्र ज्युनियर महमूद यांच्या निधनाची चर्चा...

Junior Mehmood यांची 5 रुपये होती पहिली कमाई, 'तो' खास दिवस येताच झाले सर्वात महागडे स्टार
Follow us
| Updated on: Dec 08, 2023 | 10:39 AM

मुंबई | 8 डिसेंबर 2023 : बॉलिवूडमध्ये काम करावं, स्वतःचं नाव कमवावं, बक्कळ पैसा कमवावा अशी अनेकांची इच्छा असते… काही लोकांची ही इच्छा सहज पूर्ण होते, काहींना प्रचंड मेहनत करावी लागते… पण काहींना तर बॉलिवूडमध्ये करियर करण्याची देखील परवानगी नसते… अनेक जण मोठी स्वप्न पाहात मायानगरीत येतात… पण सगळ्यांना यश मिळत नाही… काही मात्र सर्वत्र चमकतात… असंच काही अभिनेते ज्युनियर महमूद (junior mehmood) यांच्यासोबत देखील झालं आहे. ज्युनियर महमूद आज या जगात नसले तरी, त्यांच्या अनेक आठवणी चाहत्यांच्या मनात कायम राहातील.

बॉलिवूडमध्ये एक काळ असा होता, जेव्हा ज्युनियर महमूद यांचं हिंदी कलाविश्वावर वर्चस्व होतं. पण ‘मेरा नाम जोकर’, ‘परवरिश’, ‘हाथी मेरे साथी’ यांसारख्या सिनेमामध्ये महत्त्वाची भूमिका साकारणाऱ्या ज्युनियर महमूद यांचं खरं नाव नईम सैय्यद असं आहे. पहिल्या सिनेमानंतर नईम सैय्यद यांना ज्युनियर महमूद असं नाव पडलं.

तर ज्युनियर महमूद यांच्या निधनानंतर जाणून घेऊ त्यांच्या नावामागे नक्की काय रहस्य होतं. नईम सैय्यद यांचा जन्म 1956 साली झाला. वयाच्या 9 व्या वर्षी ज्युनियर महमूद यांनी बालकलाकार म्हणून केली. त्यानंतर 1968 साली ‘सुहाग की रात’ सिनेमा प्रदर्शित झाला आणि या सिनेमात ज्युनियर महमूद यांना अभिनेते आणि गायक महमूद यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली.

‘सुहाग की रात’ सिनेमातील ज्युनियर महमूद यांच्या भूमिकेला चाहत्यांनी डोक्यावर घेतलं. त्यानंतर गायक महमूद यांनी ज्युनियर महमूद यांनी लेकीच्या वाढदिवसासाठी घरी बोलावलं. तेव्हा ज्युनियर महमूद यांनी ‘हम काले हैं तो क्या हुआ…’ गाण्यावर भन्नाट डान्स केला आणि गायम महमूद यांच्या मनावर राज्य केलं. तेव्हा महमूद यांनी नईम सैय्यद यांना ज्युनियर महमूद असं नाव दिलं.

गायक महमूद यांनी दिलेल्या नावानंतर अभिनेत्याने देखील स्वतःचं नाव बदललं नाही. नईम सैय्यद यांनी ज्युनियर महमूद म्हणून स्वतःची इंडस्ट्रीमध्ये ओळख निर्माण केली. पहिल्या सिनेमानंतर ज्युनियर महमूद यांनी कधीही मागे वळून पाहिलं नाही. एक काळ असा होता जेव्हा ज्युनियर महमूद यांनी बॉलिवूडवर राज्य केलं.

ज्युनियर महमूद यांना कसा मिळाला पहिला सिनेमा?

ज्युनियर महमूद यांचे मोठे भाऊ सिनेमांच्या सेटवर फोटोग्राफी करायचे. त्यामुळे ज्युनियर महमूद अनेकदा सेटवर भावासोबत जायचे. एकदा ज्युनियर महमूद ज्या सेटवर गेले होते, त्या सेटवर एका बालकलाकाराच्या भूमिकेसाठी शुटिंग सुरु होती. पण त्या बालकलाकाराला डायलॉय जमत नव्हते.

शुटिंग सुरु असताना ज्युनियर महमूद उभे राहिले आणि म्हणाले एवढंच तर बोलायचं आहे… तेवढ्यात दिग्दर्शकाचं लक्ष ज्युनियर महमूद यांच्याकडे गेलं आणि ती सुवर्ण संधी ज्युनियर महमूद यांना मिळाली. वयाच्या 9 व्या वर्षी ‘मोहब्बत जिंदगी है’ सिनेमात ज्युनियर महमूद यांनी भूमिका साकारली आणि अभिनयात करियरला सुरुवात केली.

Non Stop LIVE Update
नामर्द म्हणत शिवसेनाचा अर्थ सांगून गुलाबराव पाटलांचा राऊतांवर हल्लाबोल
नामर्द म्हणत शिवसेनाचा अर्थ सांगून गुलाबराव पाटलांचा राऊतांवर हल्लाबोल.
ईव्हीएम ठेवलेल्या स्ट्राँगरूममध्ये CCTV चा डिस्प्ले 24 तास बंद अन् ...
ईव्हीएम ठेवलेल्या स्ट्राँगरूममध्ये CCTV चा डिस्प्ले 24 तास बंद अन् ....
मुंबईत आज 2 मोठ्या जाहीर सभा, दिग्गज नेते दिसणार एकाच मंचावर
मुंबईत आज 2 मोठ्या जाहीर सभा, दिग्गज नेते दिसणार एकाच मंचावर.
अजितदादा महायुतीच्या प्रचारातून गायब? पुन्हा राजकीय भूकंपाचे संकेत?
अजितदादा महायुतीच्या प्रचारातून गायब? पुन्हा राजकीय भूकंपाचे संकेत?.
युती तुटली, तेव्हा मातोश्रीत नेमकं काय घडलं? उद्धव ठाकरेंचा गौप्यस्फोट
युती तुटली, तेव्हा मातोश्रीत नेमकं काय घडलं? उद्धव ठाकरेंचा गौप्यस्फोट.
बाळासाहेबांच्या खोलीत नेमकी काय चर्चा झाली? उद्धव ठाकरेंचा मोठा खुलासा
बाळासाहेबांच्या खोलीत नेमकी काय चर्चा झाली? उद्धव ठाकरेंचा मोठा खुलासा.
'आताही बॅगा घेऊन आलोय', राऊतांच्या आरोपावर एकनाथ शिंदेंचं उत्तर
'आताही बॅगा घेऊन आलोय', राऊतांच्या आरोपावर एकनाथ शिंदेंचं उत्तर.
मोठी बातमी : नाशिकमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बॅगांची तपासणी
मोठी बातमी : नाशिकमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बॅगांची तपासणी.
Monsoon Update:नागरिकांची उकाड्यापासून सुटका, यंदा मान्सून लवकर धडकणार
Monsoon Update:नागरिकांची उकाड्यापासून सुटका, यंदा मान्सून लवकर धडकणार.
पैसा फेको तमाशा देखो हाच शिंदे गटाचा जाहीरनामा : संजय राऊत
पैसा फेको तमाशा देखो हाच शिंदे गटाचा जाहीरनामा : संजय राऊत.