Anjali Arora: ‘कच्चा बदाम’ फेम अंजली अरोराचा ‘बेशर्म रंग’ गाण्यावर हॉट डान्स; दीपिकालाही टाकलं मागे

दीपिकाच्या 'बेशर्म रंग' गाण्यावर अंजली अरोराचा अफलातून डान्स; व्हायरल व्हिडीओवर कमेंट्सचा वर्षाव

Anjali Arora: कच्चा बदाम फेम अंजली अरोराचा बेशर्म रंग गाण्यावर हॉट डान्स; दीपिकालाही टाकलं मागे
Anjali Arora and Deepika Padukone
Image Credit source: Instagram
| Updated on: Dec 22, 2022 | 12:48 PM

मुंबई: ‘पठाण’ या चित्रपटातील ‘बेशर्म रंग’ हे गाणं प्रदर्शित झाल्यापासून तुफान चर्चेत आहे. या गाण्यावर तुम्ही आतापर्यंत इन्स्टाग्रामवर अनेक अभिनेत्रींच्या डान्सचे व्हिडीओ पाहिले असतील. यात प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्स यांचा समावेश आहे. एकीकडे या गाण्यावरून मोठा वाद निर्माण झाला असताना दुसरीकडे सेलिब्रिटी त्यावर डान्स करून सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट करत आहेत. ‘पठाण’च्या प्रमोशनाचाच हा एक भाग मानला जातोय. अशातच आता ‘कच्चा बदाम’ या गाण्यावरील डान्समुळे प्रसिद्ध झालेली अंजली अरोरा हिचासुद्धा व्हिडीओ व्हायरल होतोय.

अंजलीने ‘बेशर्म रंग’ या गाण्यावर जबरदस्त डान्स करत त्याचा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. या व्हिडीओत तिने दीपिकाचे काही स्टेप्ससुद्धा कॉपी केले आहेत. ‘बेशर्म रंग’ गाण्यात दीपिकाचा आतापर्यंतचा सर्वांत बोल्ड अंदाज पहायला मिळाला. त्याचप्रमाणे अंजलीनेही बोल्ड डान्स करण्याचा प्रयत्न केला आहे. या व्हिडीओवर चाहत्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतोय.

अंजली अरोराला सोशल मीडियातून प्रसिद्धी मिळाली. ‘कच्चा बदाम’ गाण्यावरील डान्समुळे रातोरात प्रकाशझोतात आल्यानंतर अंजलीला ‘लॉक अप’ या रिॲलिटी शोची ऑफर मिळाली. या शोमध्ये तिने तिच्या खासगी आयुष्याविषयी बरेच खुलासे केले होते.

अंजली आणि स्टँडअप कॉमेडियन मुनव्वर फारुखी यांच्यातील नातं लोकांना खूप आवडलं आणि दोघांच्या नावाने हॅशटॅगही बनवण्यात आला. इतकंच नव्हे तर अंजलीने मुनव्वरला प्रपोजही केलं होतं. मात्र शो संपल्यानंतर दोघांचा ब्रेकअप झाला. काही दिवसांपूर्वी अंजली तिच्या एमएमएस व्हिडीओ लीकमुळेही चर्चेत आली होती. इन्स्टाग्रामवर तिचे 12 दशलक्षांहून अधिक फॉलोअर्स आहेत.