मोहब्बत नहीं, मौत का जश्न… प्रत्येक लग्नात वाजणाऱ्या गाण्याचा अर्थ आजपर्यंत कोणाला कळलाच नाही…

नव्या जोडप्यासाठी सर्रास इन्स्टाग्राम स्टोरीसाठी वापरलं जातं कैलाश खेर यांचं 'हे' गाणं... पण गाणं लग्नाचा सोहळा नाही तर, आहेत मृत्यूनंतरच्या वेदना... खरा अर्थ आजपर्यंत कोणाला कळलाच नाही...

मोहब्बत नहीं, मौत का जश्न... प्रत्येक लग्नात वाजणाऱ्या गाण्याचा अर्थ आजपर्यंत कोणाला कळलाच नाही...
गायक कैलाश खेर
| Updated on: Jan 03, 2026 | 10:09 AM

सुफी संगीतापासून ते शास्त्रीय संगीतापर्यंत, प्रेम आणि आपुलकीने भरलेली गाणी फक्त गाणी नसतात, तर भावना असतात. पण जेव्हा गायक कैलाश खेर यांच्या गाण्यांची चर्चा रंगते तेव्हा, त्यांच्या गाण्यातील प्रत्येक ओळीत मोठा अर्थ दडलेला असतो… त्यांचा आवाज आणि त्यांची गाणी थेट भावनांना स्पर्श करतात… 700 गाण्यांपेक्षा अधिक गाण्यांना आपला आवाज देणारे कैलाश खेर यांना आज कोणत्याच ओळखीची गरज नाही. ‘अल्लाह के बंदे हंस दे’ आणि ‘रब्बा इश्क न होवे’ यांसारखी एकापेक्षा एक गाणी गात त्यांनी रसिकांच्या मनावर राज्य केलं… पण त्यांच्या ‘आज मेरे पिया घर आवेंगे’ या गाण्याचा अर्थ कोणालाच माहिती नाही. हे गाणं रोमँटिक नाही तर स्पिरिचुअल गाणं आहे..

प्रत्येक लग्नात ‘आज मेरे पिया घर आवेंगे‘ हे गाणं वाजतंच. एवढंच नाही तर, अनेकांच्या इन्स्टाग्राम स्टोरीला देखील ‘आज मेरे पिया घर आवेंगे’ गाणं असतं. लोकांना असं वाटतं की, नवरी पूर्ण शृंगार करुन बसली आणि तिच्या नवऱ्याची प्रतीक्षा करत आहे… पण या गाण्याचा अर्थ असा नाही.. हे गाणं आत्मा आणि परमात्मा यांचं मिलन दर्शवतं.

गाण्याच्या पहिल्या ओळीबद्दल सांगायचं झालं तर, ‘हे री सखी मंगल गाओ री, धरती अंबर सजाओ री, आज उतरेगी पी की सवारी’ याचा अर्थ असा होतो की, शरीर सोडलेला आत्मा त्याच्या परम अस्तित्वाला, म्हणजे परमात्याला भेटण्यास उत्सुक आहे. आत्मा स्वतःचं शृंगार करत आहे, वाईट कर्मापासून मुक्त होत, त्याच्या परमात्याच्या भेटीस तयार असतो…

कैलाश खेर यांना मृत्यूपासून मिळाली या गाण्याची प्रेरणा

कैलाश खेर म्हणाले, ’21 नोव्हेंबर माझे वडील जोर – जोरात हरे राम आणि देवाचे भाजण ओरडून गात होते… जे पाहायला सामान्य वाटत होतं… ते देवात मग्न होते आणि ओठांवर फक्त देवाचं नाव होतं… मी त्यांना विचारलं बाबा, तुम्ही ठिक आहात ना? पण त्याच क्षणी त्यांनी शेवटचा श्वास घेतला… त्यांच्या चेहऱ्यावर सुख आणि शांती होती… जसं की ते त्यांच्या परमात्यामाला भेटून पूर्ण झाले आहेत…’

खेर पुढे म्हणाले, ‘मझ्या वडिलांना त्यांच्या मृत्यूची चाहूल लागली होती की, ते आज परमात्याला भेटणार आहेत आणि ते आनंदी होते…’ पण वडिलांच्या निधनानंतर कैलाश खेर यांना दुःख झालं होतं. कारण संगीताचं ज्ञान त्यांना वडिलांकडून मिळालं होतं… वडिलांच्या निधनाच्या दिवशी देखील कैलाश खेर यांनी कार्यक्रम केला होता…

वडिलांच्या मृत्युनंतरच त्यांनी आत्मा आणि परमात्म्यामधील हे नातं शब्दांद्वारे टिपलं आणि एक हृदयस्पर्शी गाणं तयार केलं. गायकानं म्हटलं की, हे गाणे त्यांच्यासाठी खूप खास आहे कारण ते त्यांना त्यांच्या वडिलांची आठवण करून देतं.