‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’ सिनेमाचा बनणार रिमेक? कजोल हिने दिलं उत्तर
९० दशकातील ब्लॉकबस्टर 'दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे' सिनेमाचा येणार चाहत्यांच्या भेटीला? डीडीएलजे सिनेमाच्या रिमेकबद्दल रंगणाऱ्या चर्चांवर कजोल हिचं मोठं वक्तव्य...

Dilwale Dulhania Le Jayenge : १९९० साली प्रदर्शित झालेला ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’ (Dilwale Dulhania Le Jayenge) सिनेमात अभिनेता शाहरुख खान (Shah rukh khan) आणि कजोल (Kajol) या जोडीने चाहत्यांच्या मनात घर केलं. आजही सिनेमा चाहत्यांमध्ये कायम चर्चेत असतो. आता सिनेमाच्या रिमेकबद्दल तुफान चर्चा रंगत आहे. गेल्या २८ वर्षांपासून सिनेमा चाहत्यांचं मनोरंजन करत आहे. आदित्य चोप्रा दिग्दर्शित सिनेमा आजही मराठा मंदीर सिनेमगृहात चाहत्यांचं मनोरंजन करताना दिसतो. एवढंच नाही तर १४ फेब्रुवारी म्हणजे प्रेमाच्या दिवसाच्या निमित्ताने अनेक सिनेमागृहात ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’ सिनेमा पुन्हा प्रदर्शित करण्यात आला होता. सिनेमातील शाहरुख आणि काजोल यांची लव्हस्टोरी चाहत्यांना प्रचंड आवडली.
दरम्यान, ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’ सिनेमाच्या रिमेकबाबत काजोल हिने मोठं वक्तव्य केलं आहे. अभिनेत्री म्हणाली ‘सिनेमाचा रिमेक येणार नाही, कारण पाहिलेल्या जादूचा एकदाच आनंद लूटता येतो…’ अभिनेत्रीच्या वक्तव्यानंतर चाहत्यांची काहीप्रमाणात निराशा होण्याची शक्यता आहे. कारण १९९० साली ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’ सिनेमाने सर्व रेकॉर्ड मोडले होते. (Dilwale Dulhania Le Jayenge remake)
‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’ सिनेमाच्या रिमेकमध्ये साऊथ सिनेविश्वातील सुपरस्टार विजय देवरकोंडा झळकणार असल्याची माहिती समोर आली. सिनेमाची निर्मिती आदित्य चोप्रा करणार होते. पण यशराज फिल्म्सने डीडीएलजेसाठी नकार देवू शकतात… या रंगणाऱ्या चर्चांनी काजोल हिने पूर्णविराम दिला आहे.
‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’ सिनेमाच्या रिमेक बद्दल अभिनेत्री म्हणाली, ‘मझ्या वैयक्तिक मतानुसार ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’ सारख्या सिनेमांचा रिमेक प्रेक्षकांचं मनोरंजन करु शकत नाही. डीडीएलजे, ‘मुझे कभी खुशी कभी गम’ या सिनेमांचे रिमेक प्रदर्शित व्हायला नकोत. असे सिनेमे फक्त एकदा प्रेक्षकांचं मनोरंजन करु शकतात.’
पुढे अभिनेत्री म्हणाली, ‘मुझे कभी खुशी कभी गम आणि डीडीएलजे सिनेमांचं रिमेक तयार करणं व्यर्थ आहे. शिवाय पहिला भाग पाहून प्रेक्षकांनी जे अनुभवलं आहे, ते दुसऱ्या भागामध्ये शक्त नाही. कितीही उत्तम पद्धतीत सिनेमा साकारण्यात आला तरी दुसरा भाग पाहून प्रेक्षक निराश होतील. कारण पाहिलेल्या जादूचा एकदाच आनंद लूटता येतो…’ असं देखील अभिनेत्री म्हणाली.
एक काळ असा होता जेव्हा काजोल आणि शाहरुख खान यांनी एकापेक्षा एक हिट सिनेमे देत चाहत्यांचं मनोरंज केलं. आजही शाहरुख आणि काजोल यांच्या सिनेमाची चर्चा तुफान रंगलेली असते. शिवाय त्यांच्या सिनेमातील गाण्यांना आजही तरुणांची पसंती असल्याचं पाहायला मिळतं. शाहरुख – कोजाल फक्त रिल लाईफमध्येच नाही तर, रिअल लाईफ मध्ये देखील चांगले मित्र आहेत.
