सारा, क्रिती, जान्हवी नाही तर, काजोलने केलं या अभिनेत्रीचे तोंडभरून कौतुक, म्हणाली ‘तिने स्वत:ला सिद्ध केलं…’
काजोलने एका मुलाखतीदरम्यान बॉलिवूडच्या एका अभिनेत्रीचे तोंडभरून कौतुक केलं आहे. या अभिनेत्रीचं कौतुक करताना काजोलने म्हटलं की "तिने स्वत:ला सिद्ध केलं आहे."

सध्या बॉलिवूडमधील एका अभिनेत्रीच्या चित्रपटाची सर्वात जास्त चर्चा आहे ती म्हणजे काजोलची. तिचा ‘माँ’ चित्रपट हा नुकताच थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान काजोलने अनेक मुलाखती दिल्या. एका मुलाखतीदरम्यान जेव्हा काजोलला विचारले गेले की तिला नवीन अभिनेत्रींमध्ये तिची प्रतिमा कोणत्या अभिनेत्रीमध्ये दिसते का? तेव्हा तिने नकार दिला. पण याचवेळी काजोलने एका अभिनेत्रीचे आवर्जून कौतुक केले.
काजोलसारखं कोणीच नाही. काजोलला एका मुलाखतीत तिला विचारण्यात आले की, नवीन पिढीतील अशी कोणी अभिनेत्री आहे का जी तिला 90 च्या दशकातील काजोलची आठवण करून देते? यावर काजोल म्हणाली, ‘मला हे सांगायला आनंद होत आहे की असं कोणीही नाही. पण प्रत्येक अभिनेत्रीने स्वतःचे जग निर्माण केले आहे. ते कोणाच्या पावलावर पाऊल ठेवत नाहीत आणि त्यांनी तसे करू नये. हे एक वेगळे जग आहे. तसेच त्यांची प्रत्येकाची ओळखही वेगळी आहे.’
View this post on Instagram
या अभिनेत्रीचे कौतुक काजोलने सध्याच्या आणि पूर्वीच्या चित्रपटसृष्टीतील फरकही सांगितला. काजोल म्हणाली की आजच्या कलाकारांकडे अधिक माहिती आहे आणि ते त्यांच्या आवडीनुसार निर्णय घेतात. तिने अनेक नवीन कलाकारांचे कौतुक केले आणि विशेषतः तिने एका अभिनेत्रीचे आवर्जून कौतुक केले आणि ती अभिनेत्री म्हणजे आलिया भट्ट. काजोल म्हणाली, ‘मला वाटते की आलियाने स्वतःला बऱ्याच प्रमाणात सिद्ध केले आहे. यानंतर अनन्या, जान्हवी, सारा इत्यादी आहेत.’
आलिया भट्ट फिल्मोग्राफी 1999 मध्ये आलेल्या संघर्ष या चित्रपटात आलिया भट्टने बाल कलाकाराची भूमिका साकारली होती. त्यानंतर 2012 मध्ये तिने मुख्य अभिनेत्री म्हणून पदार्पण केले. त्यानंतर तिचे ‘हायवे’ आणि ‘2 स्टेट्स’ हे चित्रपट प्रदर्शित झाले. ‘हायवे’मधील तिच्या अभिनयाचे कौतुक झाले, त्यानंतर आलियाने उडता पंजाब, राजी, गली बॉय आणि गंगूबाजी यासारख्या चित्रपटांमधून एक मजबूत अभिनेत्री म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली.
